Monday, 16 September 2019

एक रम्य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

Ek Ramya Pahat Marathi Nibandh : Today, we are providing एक रम्य पहाट मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Ek Ramya Pahat Nibandh / Essay in Marathi Language to complete their homework

एक रम्य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

माझा वर्गमित्र किशोर कालच मुंबईहून वाईला माझ्या घरी चार दिवस राहवयास आला होता. भल्या पहाटे उठावे, स्नानादी कर्मे आटोपून थोड्या अंतरावर असलेल्या पाचगणी घाटात जावे आणि प्रभातीचा प्रसन्न काळ त्या निसर्गरम्य परिसरात घालवावा असा बेत ठरला.

दुसऱ्या दिवशी आम्ही जागे झालो तेव्हा अजून बाहेर अंधारच होता. आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा काळोखाचा पडदा दूर होऊ लागला होता. सर्वत्र नि:स्तब्ध, नीरव शांतता होती. दिशादिशातून जणू मंगलतेचे मोती उधळले जात होते. वाईच्या शिवेवरील असलेल्या संगमरवरी सुंदर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि झपाट्याने पाय उचलत आम्ही घाटातील वळणांचा रस्ता पार करू लागलो. Read also : मी केलेली सहल मराठी निबंध

सभोवती वृक्षलतांचे हिरवे पिवळे रंग बहरले होते. पायदळीची व सभोवतीची तृणपणे नटलेली होती. मंद समीरण उल्हासाची तार छेडत होता. सभोवतीचे वातावरण अत्यंत प्रसन्न होते. निसर्गात एक अबोल संगीत मोहरून येत होते. माझ्या मनात काव्यपंक्ती घुमू लागल्या,

ते गीत नवे मज रोज हवे ।।
नव धरतीचे । नव किरणांतुन ।
रंग रसातुन । सात स्वरांतुन, फुलून ये ।
गीत नवे मज रोज हवे ।।

डोईवर निळेभोर आकाश. पूर्वक्षितिजावर जणू लाल-गुलाबी रंगाची सुंदर पखरण झालेली. त्याच वेळी बालकवींच्या पद्यपंक्ती आठवल्या,"हिरवे हिरवे गार गालिचे । हरित तृणांच्या मखमालींचे ।Read also : Aamchi Sahal Nibandh Marathi

अंधार दूर होऊन रम्य, प्रसन्न पहाट उजळून निघत होती. निसर्गात केवढे सौंदर्य दडले आहे त्याचा प्रत्यय आम्ही घेत होतो. एक वळण ओलांडले की एक नवेच दृश्य आमच्या डोळ्यांपुढे येत असे ! निसर्गातील ही अप्रतिम रंगसंगती मन मोहवीत होती. उगवणाऱ्या कळ्यांतून आणि फुलांतून मंद गंध तर दरवळत होताच; पण कोणी मन मोहविणारे संगीत गात आहे असा भास होत होता. डोईवरील निळ्याभोर गगनात पूर्ण क्षितिजावर आता सूर्य वर येऊ लागला होता. त्याच्या स्वागतासाठी समोरचा सुंदर तलाव व सभोवतीच्या वृक्ष-लता, विविध रंगांचे अलंकार घालून सजले होते. तरु-नभ सजले होते, आनंदाने मोहरून गेले होते. प्राचीचा थाट काय वर्णावा? तेथील सर्वत्र बहरून आलेले सौंदर्य वर्णन करण्यास माझे शब्दही अपुरे पडत आहेत. Read also : सूर्य संपावर गेला तर निबंध

एका कवीने पहाटेचे वर्णन केले आहे.
"पहा उषेच्या मधु स्मितातुन ।
फुलला गहिऱ्या अन् कमलांतुन ।
दिशादिशांतुन रंग गुलाबी ।।
आगमनाची आस | आला प्रकाश ।।"

आता वृक्ष - लतांच्या पानाफुलांतून विविध पक्ष्यांच्या कोमल स्वरांनी आसमंत गजबजून उठला. त्या प्रसन्न वातावरणाने आमचे भान हरपून गेले. वेळ कसा गेला कळलाही नाही. आम्ही परत फिरलो तेच मुळी नवा उत्साह, आनंद घेऊन. वाटेत परतताना दत्तमंदिर लागले. त्याच्या मंजुळ घंटानादाने आम्ही भानावर आलो. आज आम्हाला बालकवींच्या काव्यातला सौंदर्याचे साज चढवून नटलेला निसर्ग पाहवयास मिळाला. ती रम्य पहाट आमच्या जीवनातील एक सुंदर स्मृती ठरली !!

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: