Sunday, 16 February 2020

शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mashiti and Nibandh

शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mashiti and Nibandh

Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mahiti and Nibandh : Today, we are providing शिवाजी महाराज मराठी निबंध, माहिती, भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mahiti and Nibandh to complete their homework. 

शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Mashiti and Nibandh

"प्रपन्ननाम परित्राता।
प्रजानाम तु प्रियकर :।।"
प्रजेच्या संकटाचाच परिहार करणारा आणि प्रजेमध्ये अत्यंत प्रिय असलेला असा राजा.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर शिवाजीराजे जन्माला आले. तीन-साडेतीन शतकानंतरही ज्यांचे नाव घेतले असता समाजात नवचैतन्य निर्माण होते, ते शिवाजी महाराज महाराष्ट्रीय लोकांचे दैवत.
Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
समर्थ रामदास शिवाजी महाराजांबद्दल लिहितात -
"शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।
शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे ।
शिवरायांचे सलगी देणे । कैसी असे ।"
शिवरायांना लोकाभिमुख राजा म्हणता येईल. लोकशिक्षण हा शिवरायांच्या कर्तृत्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. या लोकशिक्षणाच्या जोरावरच शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.
शिवराय स्वतः ध्येयनिष्ठा, योजकता, अष्टावधानी, धर्माभिमानी, अष्टपैलू, कुशल सेनानी, युद्धतज्ज्ञ, प्रजादक्ष, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारे, असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले, वडीलधारे व साधुसंतांविषयी आदर बाळगणारे, स्त्रीदाक्षिण्य असणारे, उद्योगशील जाणता राजा होते. आदर्श राजाची सर्व गुणवैशिष्ट्ये त्यांच्या ठायी होती.
Read also : राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध
शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य आधार म्हणजे त्यांनी कोळी, मावळे, रामोशी, मराठे, ब्राह्मण, प्रभू, भंडारी या सर्व हिंदूबरोबरच इतर धर्मीय जसे मुस्लिम, ख्रिश्चन, सर्वांनाच बरोबरीने घेतले. शिवाजी महाराजांनी मुसलमानांनाही औदार्याने वागविले.
त्यांचा सर्वधर्म सहिष्णुता हा विचार निव्वळ प्रचारासाठी विचार नव्हता. सर्वच मंदिरे, मशिदी, दर्गे यांची दिवाबत्ती, पूजाअर्चा यांची व्यवस्था त्यांच्या खजिन्यातून रोख रूपाने होई.
जवळजवळ १४ साधुसंतांना आपले गुरू मानून ते आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कृपाप्रसादाला देत असत.
दयाळूपणा आणि लोककल्याणी वृत्ती यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली.
शिवाजी महाराजांची योग्यता स्वयंसिद्ध आहे. डौलदार आणि वैभवसंपन्न अशी त्यांची राहणी होती.
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्म परायणतेचे व परधर्म सहिष्णुतेचे होते.
६ जून, १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी सुवर्णतुला होऊन गरिबांना सुवर्ण होन वाटण्यात आले.
रयतेची काळजी घेणारे, रयतेवर जिवापाड प्रेम करणारे, एक शिस्तप्रिय, कर्तव्य कठोर असे महाराजांचे वर्णन करता येईल. रयतेची काळजी घेताना ते भावुक होतात. “आपल्या राज्यात जर जनता उपाशी राहिली, तिच्यावर अन्याय, जुलूम झाला तर आपण मोगल मुलकात आलो, असे लोक म्हणतील."
वृक्षसंवर्धनाबाबतही महाराज जागरूक होते. आपल्या एका आज्ञापत्रात ते लिहितात, "झाडे तोडताना विचार व्हावा, रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिली यावरी त्यांचे दुःखास पारावार काय?"
Read also : मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
शेतीचा धंदा ही फक्त त्या-त्या रयतेची जबाबदारी नसून शेतीचे उत्पन्न वाढविल्याने व पडीक जमीन लागवडीखाली आणल्याने सर्व राज्याची भरभराट होते; हा दूरवरचा विचार अमलात आणत शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत देण्यासंबंधी सरकारी अधिकाऱ्यांना ते सूचना देत.
शिवाजी महाराज धार्मिक होते; पण धर्मभोळे नव्हते. कठोर होते; पण क्रूर नव्हते. साहसी होते; पण आततायी नव्हते. व्यवहारी होते; पण ध्येयशन्य नव्हते.
अशा जाणत्या राजाने राजमुद्रेतून 'शहाजीचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे,' अशी लोकांना ग्वाही दिली आहे.
Read also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
३ एप्रिल, १६८० मध्ये महाराजांना देवाज्ञा झाली. समर्थ रामदासांनी अत्यंत समर्पक शब्दात महाराजांचे केलेले हे वर्णन;
"निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी
यशवन्त, कीर्तिवन्त । सामर्थ्यवन्त, वरदवन्त
पुण्यवन्त, नीतिवन्त । जाणता राजा ।।"
राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language

राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language

Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language : Today, we are providing राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध, माहिती, भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language  to complete their homework. 

राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध Rajarshi Shahu Maharaj Nibandh in Marathi Language

जेव्हा समाजात 'अधर्म' माजतो तेव्हा धर्मरक्षणार्थ सत्पुरुषांचा जन्म होतो, असं म्हणतात.
थोर समाजसुधारक, बहुजन समाजाचा उद्धारक व कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती पावलेले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे २६ जुलै १८७४ रोजी झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि आई राधाबाई.
Read also : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च, १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर राज्याचे छत्रपती शाहू महाराज झाले.
शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व धिप्पाड होते. उंची ५ फूट ९ इंच आणि वजन १९७ पौंड होते. चालण्याची ढब मर्दानी ऐटबाज अशी होती.
आत्मसंयम आणि आत्मनिश्चय हे शाहू महाराजांचे दुर्मीळ गुण होते. अत्यंत चाणाक्ष, विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेले; पण शांत स्वभावाचे ते राजे होते.
"महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे.” महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराजांच्या कार्याबद्दल दिलेली ही पावती किती बोलकी आहे.
Read also : छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
'लोकांचा राजा' ही जनतेनेच त्यांना दिलेली पदवी होती. कोल्हापूर संस्थानचे अधिपति, बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणारे समाजसुधारक दलितांचा उद्धार करणारे, पुरोगामी दृष्टी असल्याने 'द्रष्टे पुरुष' म्हणून शाहू महाराज मान्यता पावले होते.
आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच देशाच्या उन्नतीसाठी उद्योग या दोन्ही क्षेत्रात सहकाराने आपण विकास साधू शकतो, हा 'द्रष्टा' विचार त्यांनी लोकांना दिला.
युरोपचा दौरा करून आल्यानंतर तेथील भौतिक प्रगती, शेती सुधारणा, उद्योगधंदे, धरणे, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, लोकशाही, जीवनपद्धती, वैज्ञानिक प्रगती, सार्वजनिक शिस्त, देशभक्तीची भावना या सर्वांचा महाराजांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
खासबाग येथील कुस्त्यांचा आखाडा, नाटकासाठी भव्य पॅलेस थिएटर, भोगावती नदीवर बांधलेले राधानगरी धरण अशा मोठ्या प्रकल्पांची सुरुवात युरोप दौयानंतरच झाली.
Read also : लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध
नाटक, नृत्य इ. कला तसेच शाळेमधील व्यावसायिक शिक्षण, धार्मिक शिक्षण, संस्कार, सूतकताई, मातकाम, शेतकी, विणकाम इ. कडे स्वतः शाहू महाराज जातीने लक्ष घालत.
शूद्रातिशूद्रांच्या प्राथमिक शिक्षणाच्या बिकट प्रश्नास हात घालणाऱ्या म. जोतीराव फुल्यांनंतर राजर्षी शाहू महाराजांचेच नाव घेता येईल. शिक्षण ही सर्व प्रकारच्या सुधारणांची गुरुकिल्ली आहे, या विचारावर त्यांची नितांत श्रद्धा होती.
स्वावलंबन, स्वदेशी बलोपासना, राष्ट्रप्रेम यांचे संस्कार कीर्तनाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. स्वतः कीर्तन करून लोकशिक्षण करणारा हा राजा! कीर्तनाची कथानके छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून गुंफलेली असत.
महाराजांचे शैक्षणिक कार्य महाराष्ट्रभर पसरले होते. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, उत्तमोत्तम शिक्षक आपल्या शिक्षण संस्थांवर त्यांनी नेमले. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा शाहू महाराजांनी पुरस्कार केला.
१९१७ मध्ये पुनर्विवाह कायदा तर १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा करून तसे विवाहही घडवून आणले.
Read also : वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध
कै. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांनी मोठ्या दिलाच्या, आदर्श राज्यकर्ता शाहू महाराजांना काव्यातून वाहिलेली ही श्रद्धांजली
"हिरे, माणके, सोने उधळा, जयजयकार करा।
जय राजर्षी शाहूराजा, तुजला हा मुजरा।
महाराष्ट्राचा उद्धारक तू, रयतेचा राजा।
पददलितांचा कैवारी तु, श्रमिकांचा राजा।
पराक्रमी तु, उज्ज्वल दैवत शूर मराठ्यांचे।
स्वातंत्र्याचे तूच मनोहर स्वप्न भारताचे।"
अशा या शिक्षणमहर्षीचे निधन ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language

Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language : Today, we are providing डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language to complete their homework. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Essay on Babasaheb Ambedkar in Marathi Language

गाठिले संघर्षातून
उंच ज्ञानाचे शिखर
ज्ञान तेज होते भीमाचे
सूर्य तेजाहून प्रखर
सर्व भारतभूमीवर
पोलादापरी कणखर
असा होता एक नर
त्याचे नाव होते
भीमराव रामजी आंबेडकर.
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य भारतातील महू या ठिकाणी रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले, ज्याचे नाव ठेवले भीमराव. भीमराव हे हिंदू समाजातील अस्पृश्य जातीत जन्मलेल्या आपल्या आईवडिलांचे चौदावे अपत्य होते.
रामजी यांनी भीमरावांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे चारित्र्य उत्तम घडावे म्हणून रामायण, महाभारताबरोबरच उत्तमोत्तम ग्रंथ वाचावयास दिले.
Read also : महात्मा गांधी निबंध मराठी
त्याकाळी शूद्रांना समाजात राहून शिक्षण घेण्याचा किंवा धनसंपत्ती मिळविण्याचा अधिकार नव्हता. जातिभेदांवर आधारलेली हिंदू समाजाची चौकट तोडून टाकल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होणार नाही, हे त्यांनी ओळखले.
गौतम बुद्ध, कबीर आणि जोतिबा फुले हे त्यांचे तीन गुरू होते.
बौद्ध धर्म जातपात मानत नाही. फक्त बौद्ध धर्मच जगाचं कल्याण करू शकेल, असा बाबासाहेबांचा विश्वास होता; म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
जोतिबांनी सामाजिक प्रवाहाविरुद्ध जाऊन असाध्य धैर्य गाठले. समाजात नवविचार जागृत करून त्याला पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचे महान कार्य केले.
Read also : मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती
'ज्ञान म्हणजे सामर्थ्य, हे सामर्थ्य पुरेपूर आत्मसात केल्याशिवाय अस्पृश्यांना जखडून ठेवणाऱ्या बंधनातून, गुलामगिरीतून मुक्त करणे अशक्य. हे ओळखून स्वतः बाबासाहेबांनी हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि इस्लाम या धर्मांचा सखोल अभ्यास केला.
माणसाला जगण्यासाठी जेवढी अन्नाची गरज आहे, तेवढीच विद्येचीही आहे. कोणाचीही याचना न करता स्वाभिमानाने जगण्याची शिकवण बाबासाहेबांनी समाजाला दिली. तसेच माणसाने शीलसंवर्धन करायला हवे. दगाबाजी, फसवणूक, व्यसने अशा गोष्टींपासून दूर राहावे, हेही सांगितले.
अस्पृश्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून ३१ जानेवारी, १९२० रोजी 'मूकनायक' या नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश, पुणे करार, धर्मांतराची घोषणा, राज्यघटना, धर्मांतर असे अनेक महत्त्वाचे टप्पे बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित आहेत.
Read also : किरण बेदी मराठी निबंध
दलितांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि आत्मसन्मान बाबासाहेबांनीच मिळवून दिला.
त्यांनी अमेरिकेत जाऊन धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा, इतिहास अशा अनेक विषयांचा प्रगाढ अभ्यास केला.
इ.स. १९९० साली भारताच्या राज्यघटनेच्या या शिल्पकाराला 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.
आपल्या बांधवांना प्रगतीचा, प्रकाशाचा, समानतेचा आणि मानवतेचा नवा मार्ग दाखवणाऱ्या या महामानवाचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले.
गांधीजींनी भारताला 'सत्याग्रह' शिकविला, लोकमान्यांनी 'कर्मयोगा'चा मार्ग दाखवला. त्याचप्रमाणे 'समता योग' हा डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचा महान संदेश आहे.
चांदण्याची छाया, कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया
आंतरराष्ट्रीय कायदेपंडित, बॅरिस्टर, डॉक्टरेट पदवीधारक, सुसंस्कृत, बुद्धिवान, कर्तृत्ववान, भारतरत्न, क्रांतिसूर्य, दलितांचे बाबा, राज्यघटनेचे शिल्पकार अशी बिरुदावली असणाऱ्या बाबासाहेबांना माझे कोटी-कोटी प्रणाम!

Saturday, 15 February 2020

सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan

सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan

Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan : Today, we are providing सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan to complete their homework. 

सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan

“ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?"
असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला. लहानपणापासून खेळकर, खोडकर आणि धीट स्वभावाच्या सावित्रीचा वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये जोतिबांबरोबर विवाह झाला.
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
धूळपाटीवरील धुळाक्षरांनी त्यांची शिक्षणास सुरुवात झाली. मुलींना शिक्षण देणे हे सामाजिक परिवर्तनाचे मूलगामी साधन आहे, हे द्रष्ट्या सावित्रीबाईंनी जाणले.
भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालू ठेवले. मुलींना शिकवायला स्त्री-शिक्षिका असेल तरच शाळेत पाठवू, ही अट ऐकून काळाची गरज म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकविले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, हे जाणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे सावित्रीबाईंपासून केली.
१ जानेवारी, १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली; ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, सावित्रीबाई!


१५ मे, १८४८ रोजी महारवाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात महारवाड्यात शाळा काढणे, हे एक दिव्यच होते. मागास समाजातील शाळेत सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला.
त्या काळी मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नसत. त्यांना ते धर्माविरुद्ध वाटे; पण सावित्रीबाईंनी पालकांची समजूत काढून मुलींवर प्रेमाचे संस्कार करून त्यांना शाळेची गोडी लावली. या कामात त्यांना सगुणाबाईंची खूप मदत झाली. प्रतिकूल परिस्थितीतही न घाबरता पाच वर्षांत त्यांनी पुणे व परिसरात अठरा शाळा सुरू केल्या. त्यांच्या कार्याने भारावून जाऊन मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी फुले पती-पत्नीचा महावस्त्रे देऊन आदरपूर्वक सत्कारही झाला.
सावित्रीबाईंनी केवळ शिक्षण क्षेत्रात काम केले असे नाही, तर विधवा स्त्रिया, अनाथ मुले यांच्याही त्या माऊली झाल्या.


१८५१ मध्ये अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७६ आणि १८९६ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. दानशूरांच्या मदतीने हजारो लोकांच्या जेवणाची सोय केली. समाजकार्याच्या अहोरात्र व्यापातून सावित्रीबाईंनी साहित्याची फुलबाग फुलवली.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिबांच्या निधनानंतरही त्या कार्यरत राहिल्या. जोतिबांचे सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन त्यांनी पुढे चालू ठेवले. अद्भुत चिकाटी, अतुलनीय धैर्य, अपूर्व तत्त्वनिष्ठा आणि असामान्य बुद्धिमत्ता या गुणांनी परिपूर्ण असं सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं.
१८९७ मध्ये पुणे परिसरात प्लेग रोगाची साथ आली होती. तेव्हा सावित्रीबाई आपले वय विसरून दीन-दलितांच्या, अपंगांच्या झोपड्यांमध्ये जाऊन अहोरात्र सेवा करीत राहिल्या. हे बहुमोलाचे कार्य करीत असताना त्यांनाही प्लेग या रोगाची बाधा झाली आणि स्वतः प्लेगची शिकार झाल्या. १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले; पण जाताना आपला दत्तकपुत्र डॉक्टर यशवंतलाही समाजसेवेची मोलाची शिकवण देण्यास त्या विसरल्या नाहीत. “मानवता हाच धर्म आहे. गरीब, अशिक्षित, दलित, अपंगांना मदत करायला कधीही मागेपुढे पाहू नकोस." त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून आपणही त्यांचा वारसा असाच पुढे चालू ठेवू या.
भारतातील पहिल्या महिला सावित्रीबाईंचे कार्य शिक्षिकाइतकेच मर्यादित नसून अनाथ मातांच्या कैवारी, विश्वविवाहाच्या पुरस्का , बालहत्या प्रतिबंधक संगोपनाच्या माता, स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या प्रणेत्या होत्या.
आपल्या काव्यातून समाजजागृती करून अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्यही त्यांनी केले. त्या जशा उत्तम साहित्यिका होत्या तशाच त्या प्रभावी वक्त्याही होत्या.


सावित्रिबाई एक बुद्धिमान लेखिका व प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. त्यांचा हा गुण अनेकांसाठी अपरिचित राहिला. १८५४ साली 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह, १८९२ मध्ये 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे सावित्रीबाईंचे साहित्य. त्यांच्या अनेक कवितांतून त्यांचं निसर्गप्रेम व भावसौंदर्य व्यक्त होतं. 'मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी' नावाचे पुस्तक १८९१ मध्ये प्रसिद्ध झाले. १८९२ मध्ये 'जोतिबांची भाषणे' या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले.
महात्मा फुले यांच्या कार्यावर अढळ निष्ठा ठेवून सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिली स्त्री आहेत.
आजच्या पिढीला फुले पती-पत्नीचं जीवन आदर्श व प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही.
मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh

Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh : Today, we are providing मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh to complete their homework. 

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh

'ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले घावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी घावीत.'
मॅडम वर्गात कविता शिकवत होत्या. मॅडमनी शिकवायला सुरुवात करतानाच सांगितले, “आज मी तुम्हाला मानवता धर्म म्हणजे काय? तो कुठे दिसतो? तो कुठे शोधायचा, हे सांगणार आहे."
साने गुरुजींनी अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत 'मानवता धर्माचं' वर्णन केलंय.
'खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे'
मानव ही एकच जात मानून कोणताही जातिभेद, वर्णभेद न करता सर्वांशी समान नात्याने, प्रेमाने, आपुलकीने, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत वागले तर मानवाचे दुःख फार मोठ्या प्रमाणात नाहीसे होईल.
Read also : मानवता धर्म मराठी निबंध
संपूर्ण जगातच शांतता, सुख, समृद्धी नांदावी यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा आपण अवलंब करायला हवा. असे वर्तन करणे म्हणजेच 'मानवता धर्म निभावणे.
दसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे प्राण गमावणाऱ्या बापू गायधनीने निभावला, तो मानवता धर्म.
ससाण्याचे प्राण वाचवण्यासाठी, ससाण्याच्या वजनाएवढे मांस आपली मांडी कापून शिकायला देणारा शिबी राजा निभावतो, तो मानवता धर्म.
आनंदवनात कुष्ठरोग्यांची सेवा करत आपले आयुष्य खर्ची घालणारे बाबा आमटे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय निभावतात, तो मानवता धर्म.
Read also : शक्ती गौरव मराठी निबंध
'क्षमेशिवाय खरे प्रेम असूच शकत नाही' असा संदेश देणाऱ्या, दीनदुबळ्या, दलित, अपंग, निराधार, परित्यक्ता अशा अनेक स्त्रियांची आधार बनलेली 'मदर तेरेसा यांनी निभावला, तो मानवता धर्म.
स्वतः अनाथ असतानाही हजारोंची 'माय' बनून त्यांचे अश्रू पुसणाऱ्या सिंधुताई सपकाळ निभावतात, तो मानवता धर्म.
“जीव वाचोनं पुन्य, जीव घेनं पाप."
असा महान विचार देत संत गाडगेबाबा मानवता धर्माचीच शिकवण देतात बरं! विचारांना खोली आली की कवीच्या काव्यातून ती झिरपताना दिसते.
'अनंता येवढे घावे, फुलांचे रंग न जावे।
उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे।।
जीवनात जगावे कसे, वागावे कसे, हे मानवताधर्म आपल्याला शिकवतो.
'ज्या वर्तनाने समस्त मानवजातीचे कल्याण होईल ते वर्तन शिकवणारा विचार, तो खरा धर्म.'
Read also : मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती
मानवता धर्माला काळिमा फासणारी, इतिहासात घडून गेलेली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाने माणसाकडूनच माणसांचा आणि माणुसकीचा संहार त्याच्याच अनुयायांनी उधळून लावला.
ज्ञानेश्वरीचा समारोप करताना अठराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी विश्वेश्वराकडे पसायदान मागितले आहे. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानदेवांचे उत्तुंग, अतुलनीय असे व्यक्तिमत्त्व प्रकट होते. 'पसाय' म्हणजे प्रसाद. परमेश्वराचा कृपाप्रसाद मिळावा, ही त्यांची मागणी. त्यांनी हा प्रसाद स्वतःसाठी नव्हे तर अखिल जगतासाठी मागितला आहे. त्यात कुठेही स्वार्थाचा लवलेश नाही. उलट सर्व समाजाचे, जगाचे, विश्वाचे हित साधावे, कल्याण व्हावे म्हणून केलेली ही प्रार्थना आहे.
'जो जे वाछिल तो ते लाहो । प्राणिजात ।'

Friday, 14 February 2020

शक्ती गौरव मराठी निबंध Shakti Gaurav Essay in Marathi Language

शक्ती गौरव मराठी निबंध Shakti Gaurav Essay in Marathi Language

Shakti Gaurav Essay in Marathi Language : Today, we are providing शक्ती गौरव मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Kalpana Chawla Essay and Detail in Marathi to complete their homework. 

शक्ती गौरव मराठी निबंध Shakti Gaurav Essay in Marathi Language

संकल्प :शक्ती गौरवाचा ।
शक्तीने पावती सुखे । शक्ती नसता विटंबणा ।
शक्तीने नेटका प्राणी । वैभवे भोगिता दिसे ॥
श्रेष्ठ संत कवी समर्थ रामदासांच्या 'शक्ती गौरव' या कवितेतील या ओळी मानवी जीवनातील शक्तीचे महत्त्व सांगतात.
राष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी बलसंपन्न समाजाची आवश्यकता आहे म्हणूनच समर्थांनी बलोपासनेस प्राधान्य दिले. बलाच्या दैवताची म्हणजेच मारुतीची ११ मंदिरे सुयोग्य ठिकाणी स्थापून त्या देवळाला लागूनच तालमीची स्थापना त्यांनी केली.
शरीर हे सर्व सुखाचे साधन आहे. जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी साधन म्हणजे शरीर चांगल्या स्थितीत, तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
निसर्गाने आपल्याला जन्मतःच समृद्ध बनवून या पृथ्वीवर पाठवलं आहे. आपले शरीर एक मानवीयंत्र आहे. या यंत्रातील एक एक पार्ट बदलायचा म्हटला तर येणारा खर्च, आपण विचारात घेत नाही. होय ना?
एक किडनी म्हणजे मूत्रपिंड बदलायचे म्हटले तर दोन- तीन लाख, निसर्गाने दिलेल्या कॅमेरात लेन्स बसवण्यासाठीही काही हजार, गुडघे सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी लाखांमध्ये खर्च, हृदयामधील झडपा बंद झाल्या तर त्या उघडण्यासाठीही लाखांमध्ये खर्च, दंतारोपण, केशारोपण, अस्थिरोपणासाठी लागणारा खर्च वेगळाच!
मग अशा या मानवी यंत्राची आपण देखभाल करण्यासाठी किती टाळाटाळ करतो ना?
सायकल, गाडी, टीव्ही, फ्रीज या सगळ्यांची आपण काळजी घेतो; पण आपल्या अनमोल शरीरासाठी विशेष काय करतो?
सतत काम, अभ्यास आणि शारीरिक / मानसिक ताण याला आपलं शरीर सामोरं जात असतं. ज्या शरीरानं मिळविलेलं वैभव उपभोगायचं ते शरीरच कुरकुर करेल तर? म्हणूनच मित्रांनो, वेळीच जागे व्हा! आपल्या शरीरयंत्राची काळजी घ्या.
सकाळी लवकर उठून शुद्ध हवेत या शरीरयंत्राला फिरवून आणा; जेणेकरून हृदयविकार, वजन वाढणे, अतिरक्तदाब, अपचन, अतिरिक्त ताण या यंत्राला त्रास देणार नाहीत.
शरीररूपी यंत्राला प्रमाणातच अन्नरूपी इंधनसाठा पुरवा. खूप काम करून खूप पैसे मिळवाल; पण ज्याच्यामुळं काम आणि ज्याच्यासाठी काम ते शरीर सांभाळा.
आयुष्यात 'गती'ला महत्त्व आलंय; पण 'गती'मुळं पळता-पळता तुमची दमछाक होऊ नये म्हणून हे सारं प्रवचन.
शक्ती तो सर्व ही सुखे । शक्ती आनंद भोगावी।
साजिरी शक्ती तो काया । काया 'माया' ची वाढवी ।।
जीवनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येक यौद्धा सज्ज हवा ना?
कोण पुसे अशक्ताला? शक्तीने मिळती राज्ये।
सारं संसार शक्तीने । शक्तीने शक्ती भोगिजे ।
मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती Mother Teresa Chi Mahiti Marathi Madhe

मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती Mother Teresa Chi Mahiti Marathi Madhe

Mother Teresa Chi Mahiti Marathi Madhe : Today, we are providing मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mother Teresa Chi Mahiti Marathi Madhe to complete their homework. 

मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती Mother Teresa Chi Mahiti Marathi Madhe

"देवा माझ्या हातून तुझ्यासाठी अजूनही काहीतरी सुंदर घडू दे. जेव्हा मी उपाशी होते तेव्हा तू मला खायला दिलंस. जेव्हा मी तृषार्त होते तेव्हा तू मला पाणी दिलंस. दीन-दुबळ्या, अनाथ, गरीब, पीडित व्यक्तींमध्ये तूच राहतोस. त्यांची सेवा म्हणजे तुझीच सेवा.
Read also : महात्मा गांधी निबंध मराठी
मला बळ दे. माझ्या श्रमांना आणि श्रद्धेला तुझा दैवी आशीर्वाद दे."
मदर हाऊसमध्ये कोलकात्याचं आणि सर्व जगाचंच ओझं शिरावर घेऊन गुडघे टेकून ती ताठ बसते. डोळे मिटते आणि थेट देवाशीच संवाद सुरू करते.
उत्तर मॅसिडोनिया म्हणजे अल्बेनियामधील स्कोपेजे राजधानीमध्ये निकोला व ड्रेनाफिल या जोडप्याच्या पोटी २६ ऑगस्ट, १९१० रोजी एक सुदृढ बालिका जन्माला आली. तिचं नाव अग्नेस ठेवलं. तिची आई गोरगरिबांची सेवा करायची. त्याचा प्रभाव अॅग्नेसवर पडला. वयाच्या १२व्याच वर्षी तिने 'नन' होण्याचा निश्चय केला. १९२८ मध्ये आपले कुटुंब, देश, सर्वस्वाचा त्याग करून युगोस्लाव्हियात जन्मलेली एक युरोपियन मुलगी नन व्हायला भारताकडे निघाली. कर्मभूमी म्हणून तिनं भारताची निवड केली. कारण भारत ही सत्कार्य रुजवून घेणारी भूमी! आणि म्हणून कोलकात्याजवळ एन्टलीच्या सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. गरिबांवर होणारे अत्याचार, गरिबांचा कोंडमारा, त्यांच्या यातना पाहून त्या दुःखी झाल्या.
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
हे सर्व पाहून आपला जन्म दीन-दलितांच्या सेवेसाठी आहे, हे त्यांना उमगले. झोपडपट्टीत राहणारी अर्धनग्न बालके, कुपोषित मुले व अस्वच्छता पाहून याच गोरगरिबांना सर्वस्व अर्पण करायचे त्यांनी ठरविले. मदरने दीन-दुबळ्यांसाठी शाळा सुरू केल्याचे समजताच शाळेसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. गरीब, निराश्रित स्त्रियांना मायेनं जवळ केलं. त्यांच्यासाठी 'निर्मल हृदय' नावाची संस्था स्थापन केली.
खोडकर, उपद्व्यापी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांसाठी 'निर्मल शिशुभवन' स्थापन केले.
गरिबांच्या सेवेचा विडा त्यांनी उचलला होता. त्यांची अविरत काम करण्याची क्षमता पाहून रेडक्रॉसचे अधिकारीही थक्क व्हायचे. १९८२ मध्ये बैरूतमधील स्फोटक परिस्थितीत त्यांनी अनेक मुलांची काळजी घेतली.
Read also : हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध
क्षमा हा मदर तेरेसांच्या संदेशाचा गाभा आहे. त्या म्हणतात 'क्षमेशिवाय खरे प्रेम जगात असूच शकत नाही. आपल्या सेवाभावी कार्याने मदर तेरेसा सगळ्यांची विश्वमाता बनल्या. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. त्या भारतातील पहिल्या महिला नोबेल पारितोषिक विजेत्या ठरल्या. पहिला 'राजीव गांधी सद्भावना पुरस्कार' भारत सरकारनं त्यांना दिला.
मदर तेरेसा यांनी कुष्ठरोग्यांना आश्रय देऊन त्यांची मनोभावे सेवाशुश्रूषा केली. कुष्ठरोग्यांना औषधोपचार करून स्वयंरोजगारही उपलब्ध करून दिला. ११९ कुष्ठधाम केंद्रे त्यांनी चालवली.
१९६२ मध्ये रेमन मॅगसेसे,१९७२ मध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्कार, युनेस्को शांतता पुरस्कार, भारत शिरोमणी, भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. १९८३ चा ब्रिटिश राजघराण्याचा 'ऑर्डर ऑफ मेरिट' हा बहुमान मदर तेरेसांना मिळाला. टेपलटन या अमेरिकन उद्योगपतीने धर्मासाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या मदर तेरेसांना हा पुरस्कार जाहीर केला. सर्व धर्माच्या पलीकडे गेलेला 'मानवता धर्म' त्यांनी निवडला होता म्हणून!
Read also : किरण बेदी मराठी निबंध
जगातील सर्वांत जास्त पारितोषिक मिळविणारी व्यक्ती म्हणून मदर तेरेसांचा उल्लेख होतो.
निःस्पृह मनाने केलेल्या कार्याबद्दल त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या कार्याचा गौरवच आहेत. त्यांनी केलेले कार्य त्यांच्या पारितोषिकांपेक्षा कितीतरी पटींनी मोठे आहे. प्रेम, उत्कट इच्छा, परिश्रम, प्रभूवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या महान समाजसेविका ५ सप्टेंबर, १९९७ रोजी स्वर्गवासी झाल्या. आज भारतात मिशनरीज ऑफ चॅरिटीचे २५ शहरांमध्ये मिळून १४६ हाउसेस आहेत. त्यातील ९७ कोलकता येथे आहेत, तर जगातल्या ७१ देशांमध्ये मिळून ३५० हाउसेस आहेत.
हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay

Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay : Today, we are providing हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay to complete their homework. 

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध Hunda Ek Samajik Samasya Marathi Essay

'हुंड्यासाठी सुनेचा छळ, सासू, सासरे, नणंद, नवरा यांना अटक'
वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या आजही 'ब्रेकिंग न्यूज' ठरतात. यावर विश्वास बसत नाही; पण हे सत्य आहे. दूरदर्शनच्या माध्यमातून आमीर खानने आपल्या भारतातील एकेका समस्येवर चर्चा करत खया भारताचे धक्कादायक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे.
सुशिक्षित, उच्चभ्रू, परदेशात वास्तव्य असणाऱ्या, श्रीमंत लालची कुटुंबातील व्यक्ती सुनेने माहेराहून पैसे, दागिने, फर्निचर, गाडी आणावी म्हणून तिचा शारीरिक, मानसिक छळ करतात. ही उदाहरणे पाहून आपण याच्या विरोधात काहीच करू शकत नाही का? असा प्रश्न आपल्याला सतावतो.
समाजसुधारकांनी आपल्याकडील अनेक वाईट प्रथा, रूढी बंद केल्या; पण वर्षानुवर्षे चालत आलेली 'हुंड्या'सारखी अनिष्ट प्रथा मात्र अजूनही चालूच आहे.
ज्यांना शक्य आहे ती श्रीमंत, पैसेवाली माणसे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करीत जावयाला गाडी, बंगला, सोने-नाणे घेऊन देतात; पण मरण होते गरिबाचे! जावयाचा हट्ट पुरवताना ते बिचारे कर्जबाजारी होतात.
मुलींना लग्नात द्याव्या लागणाऱ्या हुंड्याची जमवाजमव तिच्या जन्मापासूनच सुरू होते. स्त्रीभ्रूण हत्येचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
हुंडा ही समाजाला लागलेली एक कीड आहे. या अनिष्ट प्रथेविरुद्ध आता मुलींनीच लढले पाहिजे. १८व्या शतकात हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्नच करणार नाही, असं आपल्या सासरच्या मंडळींना आनंदीबाई शिर्केनी ठणकावून सांगितलं. आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
मुलांप्रमाणे मुलीही उच्च शिक्षण घेतात. नोकरी करून पैसे मिळवितात. आपल्या संसाराला हातभार लावतात. मग त्यांच्या आईवडिलांकडून सासरची मंडळी का अपेक्षा करतात बरं?

'स्त्री'लाच आता ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढचं पाऊल उचलावं लागेल, तरच ही प्रथा बंद होईल.

Thursday, 13 February 2020

कल्पना चावला माहिती मराठी निबंध Kalpana Chawla Essay and Detail in Marathi

कल्पना चावला माहिती मराठी निबंध Kalpana Chawla Essay and Detail in Marathi

Kalpana Chawla Essay and Detail in Marathi : Today, we are providing कल्पना चावला माहिती मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Kalpana Chawla Essay and Detail in Marathi to complete their homework. 

कल्पना चावला माहिती मराठी निबंध Kalpana Chawla Essay and Detail in Marathi

चाँद तारे तोड लाऊँ
सारी दुनिया पर मैं गऊँ
बस, इतनासा ख्वाब है!
१ जुलै, १९६१ रोजी दिल्लीजवळच्या कर्नाल नावाच्या खेड्यात जन्माला आलेल्या कल्पनानं पाहिलेलं स्वप्न तिन सत्यातही उतरवलं!
शाळेत असताना कल्पनाने एकदा आकाशाचे मोठे चित्र काढले. त्या चित्रामध्ये ग्रह, तारे, आकाशात उडणारी विमाने, अवकाशयानही रेखाटले. पर्यावरणासंबंधीचा हा प्रकल्प, जणू तिच्या स्वप्नाचे प्रतीक!
लहानपणापासूनच कल्पना साहसी होती. सर्वसामान्य मुलींसारखं बाहुल्या खेळण्यापेक्षा सायकलवरून गावामधून वेगाने भटकायला तिला आवडे. शाळेत असताना भरतनाट्यम्बरोबरच ती कराटेही शिकली. खेळांप्रमाणेच अभ्यासातही रुची होतीच.
Read also : किरण बेदी मराठी निबंध
मोठेपणी आपण कोण व्हायचं, हे तिनं लहानपणीच ठरवलं होतं. आपल्या मुलीने डॉक्टर किंवा प्राध्यापक व्हावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा; पण “मला इंजिनिअरच व्हायचंय" असं ठामपणे सांगितल्याने आई-वडिलांनी तिचे म्हणणे मान्य केले.
चंदीगडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कल्पनाने प्रवेश घेतला, त्यावेळी अख्ख्या कॉलेजमध्ये फक्त सात मुली होत्या. 'एरॉनॉटिक्स' हाच विषय हट्टाने घेऊन पंजाब विद्यापीठामध्ये ती पहिली आली.
उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तिथंही एम.एस.च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम राखली.
Read also : सुमंत मुळगावकर माहिती मराठी
'एरोस्पेस इंजिनिअरिंग' या विषयात वयाच्या फक्त २७ व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. आता तिचं स्वप्न तिच्या नजरेच्या टप्प्यात आलं होतं. नासामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी पात्रता तिनं जिद्दीनं प्राप्त केली होती. अत्यंत कठीण चाचण्यांनंतर 'नासा'ने संशोधक म्हणून तिची निवड केली. विमानांना हवा असलेला विशिष्ट वेग कमीत कमी वेळात गाठणे, या विषयावर तिने संशोधन केले.
या संशोधनानंतर अवकाशयान विभागातून 'अवकाशयात्री' विभागात तिनं प्रवेश मिळविला. ह्युस्टन येथील प्रशिक्षणानंतर कोलंबियाच्या अवकाश मोहिमेसाठी तिची निवड झाली. आणि १९ नोव्हेंबर १९९७ रोजी तिने 'कोलंबिया' यानासोबत अवकाशात झेप घेतली. १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असे तब्बल १६ दिवस ती अंतराळात होती. अंतराळात 'भरारी' घेण्याचं तिचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं होतं.
Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध
पहिली भारतीय महिला अवकाशयात्री बनण्याचा 'बहुमान' तिला मिळाला. अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले तरी स्वतःची ओळख ती 'भारतीय कन्या' म्हणूनच करून देई.
“आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवू शकतो, त्यासाठी सतत परिश्रम करावे लागतात, त्याची तयारी ठेवा" असा संदेश देणारे, विमान उड्डाणांचा पाया रचणारे, जे आर. डी. टाटा, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे तिचे आदर्श होते.
त्यानंतर 'नासा'ने पुढच्या अंतराळ मोहिमेसाठी डॉ. कल्पना चावलाची मोहीम विशेषज्ञ' म्हणून नेमणूक केली. १६ जानेवारी, २००३ या दिवशी कोलंबिया यान अवकाशात झेपावले. १६ दिवसांच्या मोहिमेनंतर परतीचा प्रवास करताना फक्त ६० कि. मी. उंचीवर असताना यानामध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते हवेतच जळून नष्ट झाले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत कल्पनाही १ फेब्रुवारी, २००३ रोजी अवकाशात विरून गेली.
Read also : प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी
अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यामध्ये कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठणारी आकाशकन्या-कल्पना चावला तरुणांसाठी 'आदर्श' बनली.
'दिव्यत्वाची जेथे प्रचीती
तेथे कर माझे जुळती'
भारतीय हवामान खात्याची नवी वेबसाईट भारतीय मेटसेटचे नामकरण 'कल्पना' असे करण्यात आले. त्यामुळे अवकाश वीरांगना कल्पना चावला या जगात अमर झाली.
किरण बेदी मराठी निबंध Kiran Bedi Essay in Marathi and Speech

किरण बेदी मराठी निबंध Kiran Bedi Essay in Marathi and Speech

Kiran Bedi Essay in Marathi and Speech : Today, we are providing किरण बेदी मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh and Speech to complete their homework. 

किरण बेदी मराठी निबंध Kiran Bedi Essay in Marathi and Speech

धडाडी म्हणजे काय, याचं जिवंत उदाहरण म्हणजेच किरण बेदी. भारतातील पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी डॉ. किरण बेदी.
पहिलेपणाची खुमारी काही औरच असते. अर्थात हे पहिलेपण निभावणं नेहमीच सोपं, सुलभ ठरत नाही; विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. एखादी गोष्ट मिळणारी किंवा करणारी पहिली स्त्री असं आपण म्हणतो, तेव्हा त्यामागे असते ती प्रचंड मेहनत आणि जिद्द; पण त्यातून घडत असतो तो इतिहास.
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
९ जून १९४९ रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या किरण बेदी यांनी कला शाखेतील पदवी तसेच राज्यशास्त्राची पदवी घेतली. समाजशास्त्रात तर पीएच.डी. केली.
किरण बेदी रीतसर प्रशिक्षण घेऊन पोलीस दलात दाखल झाल्या. कॉलेजमध्ये असतानाच किरण बेदी एन.सी.सी.मध्ये सहभागी झाल्या. एन.सी.सी.मधील बेस्ट कॅडेट अवॉर्डही त्यांनी मिळवले.
किरण यांना टेनिस खेळाची आवड होती. आपल्या बहिणीसह त्यांनी टेनिसची अनेक बक्षिसे जिंकली होती.
१९७२ मध्ये त्यांची आय.पी.एस.मध्ये निवड झाली. मुलाखतीच्या वेळी त्यांना पोलीस खाते हे पुरुषांचे क्षेत्र आहे, त्याचे शिक्षण खडतर व कठीण आहे म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडू नये, असं वारंवार सांगण्यात आलं; पण त्यांचा निश्चय ठाम होता.
Read also : मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध
माऊंट अबू येथील प्रशिक्षणानंतर उत्तम यश मिळवून १९७५ पासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. अनेक संघर्षमय प्रसंगाना तोंड देताना त्यांची चिकाटी, जिद्द दिसून आली.
त्यांनी विशेषतः लोकाभिमुख कार्य केलं. स्त्रियांचे प्रश्न, तुरुंग सुधारणा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, तस्करी रोखणे यावर व अशा अनेक प्रश्नांवर आशियाई देशात व संयुक्त राष्ट्रसंघात भरलेल्या परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
तिहार तुरुंगात महानिरीक्षक म्हणून नेमणूक ही कमी प्रतीची मानली जायची, तिथं किरण यांची नेमणूक झाली. आपल्या वागणुकीने त्यांनी तेथील कैद्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या तक्रारींना दाद दिली. कैद्यांसाठी अभ्यासवर्ग, योगासने, विणकाम, शिवणकाम, दूरदर्शन दुरुस्ती इ. गोष्टी सुरू केल्या.
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
कैद्यांच्या अडचणी सोडवत असतानाच 'अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार' या विषयात संशोधन करून 'डॉक्टरेट' मिळवली.
दिल्ली येथील नवज्योत पाठशाळेत झोपडपट्टीतील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात स्त्रियांसाठी साक्षरता व व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
त्यांच्या सामाजिक भरीव कार्यामुळेच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.
रेमन मॅगसेसे फाउण्डेशनचा 'शांतता' पुरस्कार, सर्वांगीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील व्यवस्थापनासाठी जोसेफ बायस फाउण्डेशनचा (स्वित्झर्लंड) पुरस्कार. तसेच भारतातील न्यायव्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणू शकेल असे कार्य केल्याबद्दल 'मॅरिसन टॉम गिशॉफ' पुरस्कार, मानव कल्याण, स्त्रियांचे हक्क, विशेष सेवा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या बांधिलकीसाठी 'प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कार, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 'पोलीस शौर्य पदक', मद्य, मादक पदार्थ, एडस् आणि तंबाखू सेवन या विरुद्ध मोहीम उघडून लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारल्याबद्दल 'इंटरनॅशनल इक्युमेनिकल फोरम' या असोसिएन ऑफ ख्रिश्चन कॉलेजेस ऑण्ड युनिव्हर्सिटीजतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि २००५ मध्ये 'मदर टेरेसा अवॉर्ड.'
Read also : मी निसर्ग बोलतोय मराठी निबंध
प्रामाणिकपणे आपली कारकीर्द पूर्ण करणाऱ्या किरण बेदी समाजसेवक अण्णा हजारेबरोबर सामाजिक प्रश्न सोडविण्यात हिरिरीने, त्याच उत्साहाने जनतेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहतात. संवेदनशील मनाच्या किरण बेदी 'व्हॉट वेंट राँग?' सारखं पुस्तक पुढच्या व्यक्तीस अपराधी बनण्यापासून वाचवणे (टू सेव्ह द नेक्स्ट व्हिक्टीम) या उदात्त हेतूने लिहितात.
अशा तडफदार आणि खंबीर 'आद्य' महिला आय.पी.एस. अधिकारी डॉ. किरण बेदी यांना मानाचा सॅलूट!