Sunday, 15 September 2019

सूर्य संपावर गेला तर निबंध - Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi Language

Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi : Today, we are providing सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Surya Ugavala Nahi Tar Essay / Nibandh in Marathi Language to complete their homework.

सूर्य संपावर गेला तर निबंध - Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi Language

आमच्या एका विज्ञाननिष्ठ आजींनी त्यांच्या अंगणात सूर्यचूल मांडली होती. ती पाहण्यासाठी आम्ही आजींकडे गेलो होतो. आजींनी आम्हाला चुलीचे प्रात्यक्षिक दाखविले आणि मग आजी म्हणाल्या, “आता गॅसवाल्यांनी संप केला तरी चिंता नाही." Read also : Vij Nasti Tar Nibandh in Marathi LanguageMarathi Nibandh

आजीचं वाक्य संपलं नाही तोच चिमुरडी पिंकी म्हणाली, “पण आजी, सूर्यानेच संप केला तर गं?"

पिंकीचे हे वाक्य ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावरचे स्मित क्षणकाल लोपल्यासारखे भासले. सूर्याने संप केला तर आजींची सूर्यचूल पेटणार नाही हेच तर खरं पण सूर्याच्या संपामुळे इतर अनंत प्रश्न निर्माण होतील.

सूर्याचा संप बेमुदत चालू राहिला तर भूलोकावरील मानवी जीवन दुःसह होईल. अहो, सूर्याचा प्रकाश नाही म्हणजे चंद्रालाही प्रकाश नाही. कारण चंद्र पडला परप्रकाशी. सूर्याने सांडलेले तेजोकण वेचून हे रावजी रूबाब दाखविणार. चंद्रप्रकाशाच्या अभावी कवींच्या काव्याला स्फूर्ती कोठून येणार ? बागेतील फुले, तळ्यातील कुमुदिनी कशा फुलणार ? प्रेमिकांना सुंदर स्थळे कोठे गवसणार ? एक मात्र खरे की, यामुळे फावेल फक्त चोरांचे. कारण त्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या अंधाराचेच साम्राज्य सर्वत्र असेल. Read also : जर परीक्षा नसत्या तर मराठी निबंध

सूर्याने संप केला तर आळशी माणसाला मात्र ती पर्वणीच वाटेल. कारण सूर्य आकाशात येणार नाही म्हणजे दिवस उगवणार नाही. रात्रीचे राज्य संपणारच नाही. मनसोक्त लोळत पडावे. पण अहो लोळणार तरी किती ? आणि लोळत पडलो तरी भूक लागायची ती लागणारच. म्हणजेच उठायला हे हवेच. दिवे लावून कामाला सुरुवात केली, तरी असं किती वेळ दिवे लावणार ? शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, घरोदारी सगळीकडे सतत विजेचा वापर केल्याने लवकरच विजेचा तुटवडा भासू लागेल. Read also : Essay on Lion in Marathi Language

चंद्र, चांदण्या, कवी आणि त्यांच्या कविता या झाल्या साऱ्या रम्य गोष्टी. त्याच्याविना फार मोठे अडणार नाही. पण सूर्याच्या या बेमुदत संपामुळे हळूहळू या भूलोकावर थंडी वाढू लागेल. कृत्रिमरित्या आवश्यक तापमान, ऊब निर्माण करणारी संशोधन सुरू होईल.

सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे वनस्पती खुरटतील. पाने, फुले, फळे गळू लागतील. वनस्पती सकन जातील. निसर्गाचा समतोल ढासळेल. सूर्याचे ऊन नाही म्हणजे बाष्पीभवन होणार नाही. त्यामुळे पाऊसही पडणार नाही. पुन्हा ही वसुधा म्हणजे वैराण मरूभूमी बनेल. कोणी गायत्री मंत्राचा जप करतील आणि या साऱ्या प्रार्थना व आर्जवे यांनी प्रसन्न होऊन सूर्य पुन्हा आकाशात तळपू लागला की सारी सृष्टी चैतन्यमय होईल. Read also : Janseva Hich Ishwar Seva Marathi Nibandh

सूर्य संपावर गेला तर सर्व चैतन्यमय वातावरण हे एक निराशजनक बनून जाईल. मग आपणा सर्वांना वाट पाहावी लागेल की, सूर्याचा संप केव्हा पूर्ण होतो ? मानवाच्या अनेक अशा प्रकारच्या गरजा आहेत. यापैकी एक जरी त्याची गरज पूर्ण झाली नाही तर त्यात अपूर्णता निर्माण राहील. आणि मग त्याच्याजवळ अनेक समस्या प्रश्नचिन्ह म्हणून डोळ्यांपुढे उभ्या राहतील. काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा त्याला समजणार नाही. आपण साधारणपणे जरी एवढी कल्पना केली तरी केवढ्या यातना होतात, तेव्हा तो जर खरंच संपावर गेला तर आपणा सर्वांचे कसं होईल ? तेव्हा सूर्य संपावर जाऊ नये याकरता तरी आपण आवश्यक तेवढा त्याचा वापर करून बाकी ऊर्जा साठवणेही आवश्यक आहे.

हे सर्व टाळायचे म्हणजे सूर्यानं संप मागे घेतला पाहिजे. त्यासाठी कोणाशी बोलणी करायची ? विचारवंत विचार करू लागतील. त्यासाठी अंतराळाचा वेध घेतला जाऊ लागेल. नवीन एखादा सूर्य सापडतो का ? नाहीतर आपणच एखादा सूर्य तयार करावा का? Read also : Pavsacha Nibandh Marathi Madhe

लोक सूर्याची मनोभावे पूजा करतील. कोणी सूर्यनमस्कार घालून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतील. कोणी गायत्री मंत्राचा जप करतील आणि या साऱ्या प्रार्थना व आर्जवे यांनी प्रसन्न होऊन सूर्य पुन्हा आकाशात तळपू लागला की सारी सृष्टी चैतन्यमय होईल.

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: