भ्रमणध्वनी / मोबाइल : शाप की वरदान मराठी माहिती। Essay on Mobile in Marathi Language

Admin
0

भ्रमणध्वनी / मोबाइल : शाप की वरदान मराठी माहिती। Essay on Mobile in Marathi Language

गरज ही शोधाची जननी आहे', ह्या उक्तीनुसार मानवाने गरजेपोटी आपल्या बुद्धि व विज्ञानाच्या आधारे निरनिराळे क्रांतिकारक शोध लावले. त्यापैकीच एक भ्रमणध्वनीचा शोध हा सर्वात महान शोध म्हणावा लागेल. `कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत या भ्रमणध्वनीने जघच पादाक्रांत केलेले दिसते. श्रीमंतांपासून ते तळा-गाळातील वर्गापर्यंत या भ्रमणध्वनीचा प्रसार आाणि प्रचार झालेला दिसतो आहे.

अगदी अल्पावधीतच सर्वच वयोगटातील लोक या भ्रमणध्वनीच्या पूर्ण आहारी गेले आहेत. कुठेही जा, लोक भ्रमणध्वनीवरून कोणाशी ना कोणाशी तरी बोलत असतातच. गाड्यांतून प्रवास करताना, रस्त्याने चालताना, गाडी चालवत असतानाही लोक बोलत असतात. त्यामुळे अपगाताचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहिल्याने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र-मंडली यांच्या सहवासातील संवादाचे सुख दुरापास्त झाले आहे. यामुळे माणसे भावानिकदृष्टया एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. दिवसातील जास्तीत जास्त वेळ भ्रमणध्वनीमध्ये घालवल्यामुळे आज माणसाला स्वत:कडेही निवांतपणे पाहता येत नाही.

या भ्रमणध्वनीचे शारीरिक दुष्पारिणामही तेवढेच गंभीर आहेत. सतत भ्रमणध्वनी कानाला लावून बोलत असल्याने किंवा गाणी ऐकत राहिल्यामुळे, त्यातून निघणान्या किरणोत्सर्गाचा मेंदूवर विपरीत पारिणाम होतो. इतरांना बदनामी-कारक मजकूर पाठवले जातात. त्यामुळे माणसातील विकृतीला वाव मिळून गुन्ह्यांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. बरेचदा समाजात अफवांचे पीक वाढवण्यास समाजकंटक याच भ्रमणध्वनीचा उपयोघ करतात. हे सर्व बघता असे वाटते की, भ्रमणध्वनीचा हा शोध शाप तर नाही ना?

मात्र भ्रमणध्वनीला शाप म्हणणे म्हणजे एकाच पैलूचा विचार केल्यासारखे होईल. कारण खरे पाहता भ्रमणध्वनी हे कमी वेळात व कमी खर्चात दूरवर असलेल्या व्यक्तींशी संपर्क  साधण्याचे एक उत्तम माध्यम आहे. भ्रमणध्वनी नसता तर आपल्याला पूर्णपणे पोस्ट खात्यावर अवलंबून रहावे लाघले असते. सण समारंभ व इतर आनंदाच्या प्रसंगी आपण आपल्या माणसांपासून दूर असलो, तरी भ्रमणध्वनीमुळे त्यांना शुभेच्छा देता येतात. त्यांची खुशाली विचारता येते. म्हणजेच ही नाती जपण्यासाठी भ्रमणध्वनी महत्त्वाची भूामिका बजावतो. भ्रमणध्वनीवर छायाचित्र गेण्याची सोय असते. त्यामुळे आपण सुंदर स्थळांची व आविस्मरणीय ठरणान्या प्रसंगांची छायाचित्रे घेऊ शकतो. ती छायाचित्रे एकमेकांना पाठवण्याची सोय यात असल्यामुळे आपल्या आप्तेष्टांनाही या गोड आठवणींचा भाघ होता येते.

आधुानिक काळातील गतिमान जीवनशैलीचा भ्रमणध्वनी हा एक आविभाज्य भाग बनलेला आहे. या भ्रमणध्वनीमुळे घरबसल्या बिलांची माहिती मिळते. नाटक, सिनेमा, रेल्वे, विमान यांची तिकीटे खरेदी करणे सहज शक्य होऊन लांबच लांब रांगा लावण्याचा त्रास कमी होतो. भ्रमणध्वनी नसता तर आपल्याला पूर्णपणे संगणकावर अवलंबून रहावे लाघले असते. भ्रमणध्वनी हा संगणकाच्या तुलनेत हलका असल्यामुळे तो हाताळणे सोपे जाते व सहज कुठेही नेणे शक्य होते.

भ्रमणध्वनी हा सघळ्या उपयुक्त साधनांचा जणू पेटाराच आहे. भ्रमणध्वनीत संपर्कसाठी, संदेश पाठवण्यासाठी सोय तर असतेच, पण छायाचित्र घेण्यासाठी कॉमेरा , वेळ पाहण्यासाठी घड्याळ, तारीख व वार बघण्यासाठी दिनदर्शिका अशा सघळ्या सोयी एकत्र उपलब्ध असतात, त्यामुळे या सघळ्या गोष्टी वेघवेघळ्या सोबत बाळघण्याची आवश्यकता रहात नाही.

भ्रमणध्वनीचे फायदे आहेतच ! पण तोटेही असले तरी तो भ्रमणध्वनीचा दोष नसून ते उपकरण वापरणान्या माणसाचा दोष आहे. तेव्हा भ्रमणध्वनीला केवळ शाप म्हणून कसे चालेल?

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !