श्रीनिवास रामानुजन यांची माहिती मराठी। Essay on Srinivasa Ramanujan in Marathi

Admin
0

श्रीनिवास रामानुजन यांची माहिती मराठी। Essay on Srinivasa Ramanujan in Marathi

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडू प्रांतातील इरोड या गावी झाला. त्यांच नाव संत रामानुजा यांच्यावरुन ठेवण्यात आल होत. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार एका कापडाच्या व्यापारीकडे नोकरी करत होते. त्या व्यवसायातील प्राप्ती अत्यंत तुटपुंजी असल्याने त्यांनी आपला मुक्काम कुंभकोणम या टुमदार शहरात हलवला आणि एका व्यापार्‍याकडे मुनिमाची नोकरी करण्यास सुरुवात केली.

श्रीनिवास रामानुजन यांची माहिती मराठी। Essay on Srinivasa Ramanujan in Marathi
रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते व त्यातील बहुतेक त्यांनी स्वतःच प्राप्त केलेले होते. परंपरित अपूर्णांकासंबंधी यापूर्वी काय विकसित केले गेलेले आहे यासंबंधी त्यांना आजिबात माहिती नव्हती, तरीही या विषयातील त्यांचे प्राविण्य त्या काळच्या इतर गणितज्ञांच्या तुलनेने अनन्यसाधारण होते. विवृत्तीय समाकल [⟶ अवकलन व समाकलन ], अतिगुणोत्तरीय श्रेढी [⟶ श्रेढी ], रीमान श्रेढी, झीटा फलनाची समीकरणे व त्यांचा स्वतःचा अपसारी श्रेढींसंबंधीचा सिद्धांत हे त्यांनी स्वतः संशोधन करून शोधून काढले. याउलट गणितातील पद्धतशीर प्रशिक्षण न मिळाल्याने किंवा उत्तम दर्जाच्या ग्रंथालयाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या ज्ञानातील वैगुण्येही तितकीच आश्चर्यकारक होती. गणितीय सिद्धतेविषयीची त्यांची कल्पना अतिशय संदिग्ध होती. 

मद्रासच्या श्रीनिवास रामानुजन या एका सामान्य कारकुनाचं असामान्य गणिती ज्ञान मद्रासचा इंग्रज कस्टम ऑफिसर ट्रिनीटी कॉलेजमधील जी. एच. हार्डी या गणितज्ञाच्या लक्षात आणून देतो. हार्डी त्याला १९१३ साली केंब्रिजला बोलावून घेतो. रामानुजनची विधवा सनातनी आई समुद्रपर्यटन निषिद्ध मानणारी असते. तिची समजूत घालून आणि तरुण पत्नीला घरी सोडून रामानुजन इंग्लंडला पोचतो. रामानुजनचे निर्भेळ गणिती सिद्धान्त बरोबर असले तरी त्यासाठी इतर गणितज्ञांना पटतील असे पुरावे देण्याचा आग्रह हार्डी धरतो. त्यावरून दोघांमध्ये वाद होतात. रामानुजनचे सिद्धान्त केम्ब्रिजच्या दृढ्ढाचार्यांना मान्य करायला लावून त्याला रॉयल सोसायटीचा फेलो करण्याचा हार्डीचा पहिला प्रयत्न असफल होतो, पण दुसऱ्या खेपेस यशस्वी होऊन रामानुजनला फेलो होण्याचा मान मिळतो.

रामानुजनच्या मते प्रत्येक समीकरण ईश्वराशी निगडित असतं, तर हार्डी पडला पूर्ण नास्तिक. पण ही मतभिन्नता त्यांच्या बौद्धिक किंवा वैयक्तिक मैत्रीच्या आड येत नाही. हे होत असताना पाच वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात रामानुजनला क्षयाची सुरुवात झालेली असते. शाकाहारी रामानुजनच्या जेवणाचेही हाल होतात. भारतात परतल्यावर एका  वर्षातच वयाच्या ३२ व्या वर्षी तो मृत्यू पावतो. इंग्लंडमधील टॅक्सीत बसण्याच्या वेळेस तिचा १७२९ हा नंबर दोन घनांची बेरीज असलेला सर्वांत लहान आकडा आहे हे रामानुजन दाखवून देतो. गणितातल्या अशा काही विक्षिप्त संख्यांना आजही taxicab numbers असं संबोधलं जात.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !