Sunday, 21 July 2019

विनोदाचे महत्त्व / मानवी जीवनातील विनोदाचे स्थान / Laughter is The Best Medicine Essay in marathi

दोस्तों आज हमने "मानवी जीवनातील विनोदाचे स्थान" पर मराठी निबंध प्रस्तुत किया है। यह निबंध कक्षा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 और 12 के लिए उपयुक्त है। Here you will find essays and paragraph on laughter is the best medicine in marathi for students.

विनोदाचे महत्त्व / मानवी जीवनातील विनोदाचे स्थान / Laughter is The Best Medicine Essay in Marathi

`सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे'
भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढाविणान्या संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे हे बोल आहेत. आयुष्यात प्रत्येकाला दु:खाचे डोंघर पार करावे लागतात,  तेव्हा अल्प असे सुख त्याच्या वाट्याला येते. मानवी जीवनातील पर्वताएवढ्या दु:खाने भरडून जाताना विनोदाचा आधार मोलाचा ठरतो. विनोदामुळे हास्य निर्माण होते; आाणि `हास्य' ही माणसाची सहजप्रवृत्ति आहे. म्हणूनच तर मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पूर्वी राजे-महाराजांच्या काळात राजदरबारी विदूषकाची नेमणूक करत असे. नित्याच्या कामकाजातून राजाची व दरबाराची करमणूक व्हावी, हे त्यामागचे कारण असे. विनोदाने घटकाभर का होईना, पण दु:खाचा विसर पडतो आणि त्या दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग सुसह्य होतो. 

मानवी जीवनातील विनोद हा बरेचदा शब्दांच्या, अर्थांच्या, प्रसंगांच्या अथवा कल्पनेच्या चमत्कृतीपूर्ण वापरामुळे होतो. मानवी जीवनातील अनेक तन्हेच्या विसंगती हे विनोदाचे  उगमस्थान आहे. 

मराठी साहित्यातील विनोदी लेखनाचे दालन अनेक मान्यवर विनोदी लेखकांनी समृद्ध केलेले आहे. चि. वि. जोशी (चिमणरावांचे चन्हाट), प्र. के. अत्रे (झेंडूची फुले), पु. ल. देशपांडे (व्यक्ती आणि वल्ली), द. मा. मिरासदार (माझ्या बापाची पेंड), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (सुदाम्याचे पोहे), राम गणेश गडकरी (संपूर्ण बाळकराम) अशी बरीच नामावली आपणास सापडते. या सर्वांच्या लेखनातून व्यक्त होणारा विनोद वेगवेगळ्या प्रकारातील असला, तरी त्यामागे हेतू हाच की माणसाला त्याच्या आयुष्यातील चार सुखाचे क्षण या विरंगुळ्यातून मिळावेत. बरेचदा लोक आपल्या आयुष्यातील दु:खाचा विसर पडून क्षणभर दैनंदिन ताण-तणावांतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून विनोदी साहित्य अगदी आवडीने वाचतात. यामुळे आपण थोडे अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

यापूर्वीचेही जर संत वाड्मय आपण पाहिले, तर त्यातसुद्धा विनोदाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ लिखित `मला दादला नको ग बाई....' सारखी समाज प्रबोधनपर विनोदी अंगाने जाणारी `भारूड' ही काव्य रचना. या रचनेत केवळ हसवणे, मनोरंजन करणे हेच विनोदाचे उाद्दिष्ट मर्यादीत न राहता त्यातून लोकजागृतीही घडताना दिसते. 

आजच्या स्पर्धच्या युगात जगताना ज्या ताण-तणावातून जावे लागते, त्यात थोडा विसावा, विरंगुळा म्हणून दूरदर्शन, खाजगी टी.व्ही. चनेल्सवरसुद्धा विविध विनोदी कार्यक्रमांची मेजवानीच आपल्याला मिळते आहे. अशा वेळी जेव्हा घरातील लहान-थोर मंडळी एकत्र बसून मनमुराद हसतात, तेव्हा कुटुंबातील सर्व ताण-तणाव नाहिसे झाल्यासारखे वाटतात आणि एक वेघळा निरपेक्ष, निखळ आनंद सर्वांनाच अनुभवायला मिळतो. विनोदामुळे जीवनाला प्रवाहीपणा येऊन जीवनाचा आनंद खन्या अर्थाने खेळकरपणाने उपभोगण्याची लज्जत वाढते, म्हणूनच `विनोद' हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे, तर `हसा आाणि लठ्ठ व्हा' हा सुखी जीवनाचा मंत्र आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: