Thursday, 15 August 2019

मी केलेली सहल / आमची सहल मराठी निबंध / माझी पहिली सहल मराठी निबंध

Today, we are publishing मी केलेली सहल / आमची सहल मराठी निबंध / माझी पहिली सहल मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (mi keleli sahal / aamchi sahal marathi nibandh / Majhi Pahili Sahal Marathi Nibandh) in completing their homework and in competition.

  मी केलेली सहल / आमची सहल मराठी निबंध

  सहल म्हणजे आनंद. सहल म्हणजे जागा बदल, सहल म्हणजे निसर्ग, पशू, पक्षी, झाडे, पाने, फुले, डोंगरकडे यांच्याशी झालेली ओळख. त्यामुळे वर्षातून एकदा तरी एखादी कौटुंबिक सहल करायचीच असे माझ्या बाबांनी ठरवलेले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीत आम्ही सगळ्यांनी मिळून कन्याकुमारीला जायचे ठरवले. कन्याकुमारी म्हणजे भारताचे शेवटचे टोक.

  कन्याकुमारीला जाण्यासाठी आम्ही ४ वाजता नागरकॉइल एक्सप्रेसने निघालो ते थेट तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता नागरकॉइलला पोहाचलो. नंतर लक्झरी बसने आम्ही सकाळी ७ वाजता कन्याकुमारीला हॉटेल चाणक्यम् येथे पोहोचलो. हॉटेल सागर किनाऱ्याजवळच होते. रूममधून समुद्राचे विलोभनीय दर्शन घडत होते.
  आमच्या हॉटेलपासून जवळच एक-दोन किलोमीटर अंतरावर स्वामी विवेकानंद स्मारक, तामीळ कवी धीरूवालूवार स्मारक, कन्याकुमारी मंदिर, गांधी स्मारक आणि कामराजभवन ही सर्व ठिकाणे जवळ जवळच होती.

  सकाळी प्रथम स्वामी विवेकानंद स्मारक पहायचे ठरले. समुद्राच्या आत एका प्रचंड खडकावर विवेकानंदांचे स्मारक उभे आहे. प्रथम तिथे फक्त पुतळा होता. कालांतराने त्यावर मंदिर बांधण्यात आले. स्मारक जिथे आहे तिथे बोटीने जावे लागते.
  विवेकानंद स्मारकाचे संपूर्ण बांधकाम लाल दगडात केलेले असून बाजूने फरशी व कठडे बसवले आहेत. तिथून सागराचा देखावा फारच सुंदर दिसतो. मुख्य स्मारकासमोर दुसरी एक इमारत असून तेथे स्वामी विवेकानंदांच्या पायाचा ठसा असलेले मंदिर आहे.

  मंदिराच्या खालच्या बाजूस ध्यानमंदिर आहे. तिथे नीरव शांतता असते. आम्ही सगळे त्या ठिकाणी पाच मिनिटे डोळे मिटून ध्यानस्थ बसलो. त्या शांत, पवित्र व आल्हाददायक वातावरणातून उठू नये असे वाटत होते. चित्त आणि मन अनंतात विलीन झाल्यासारखे वाटत होते. एका वेगळ्याच अनुभूतीचा प्रत्यय त्या ठिकाणी आला, मंदिराच्या चारही बाजूला समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा खडकावर येऊन आदळत होत्या. याच ठिकाणी अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालचा उपसागर एकत्र आलेले आहेत.
  विवेकानंदाच्या स्मारकाशेजारी २०० फूट उंचीचा धीरूवालवार या कवीचा पुतळा आम्ही पाहिला.

  दुसऱ्या दिवशी आम्ही कन्याकुमारीच्या दर्शनाला गेलो, कन्याकुमारीचे देऊळ अतिशय प्रशस्त आहे. वातावरण अतिशय प्रसन्न होते. बांधकाम द्रवडी पद्धतीचं असून अखंड दगडात कोरलेले आहे. देवीच्यासमोर चकाकणान्या पितळेच्या असंख्य दीपमाला तेवत होत्या आणि हातात वरमाला घेऊन सलज्ज कन्याकुमारी उभी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही गांधीभवन आणि कामराजभवन पाहिले.

  भारताच्या शेवटच्या टोकावरून पुन्हा परत येण्याची इच्छाच होत नव्हती. पण आपला गाव पण खुणावत होता. म्हणून तीन सागराच्या संगमाला डोळ्यात, मनात साठवत आम्ही परतीचा रस्ता पकडला.

  माझी पहिली सहल मराठी निबंध

  भावाच्या कुटुंबियांसोबत प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याचा योग आला होतो. पहिलीच दूरची सहल होती. कोणतीही गोष्ट प्रथम करताना त्या गोष्टीचे अप्रूप आणि उत्सुक्ता फारच असते. ग्रामीण भागातून छोट्याशा खेड्यातून व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेला एक मी खेडूत मुलगी प्रथमच तालुक्याच्या गावी शेहचाळीस वर्षांपूर्वी आले होते. तेव्हा त्या तालुक्याच्या गावाचे मला फारच नवल वाटले होते. सपाट मऊ मऊ रस्ते, रात्रीसुद्धा दिवसासारखा विजेच्या दिव्यांचा उजेड, रोजची बाजारपेठ, वाहनांची वर्दळ, सारेच वेगळे, खेड्यातील वातावरणापेक्षा निराळे, त्याच गावाकडच्या मातीत वाढलेल्या, ग्रामीण संस्कार अंगाखाद्यावर आलेल्या मनावर ठसलेल्या मुलीने लग्नानंतर झेप घेतली, ती थेट मायावी मुंबई नगरीत. वय अवघे पंधरा वर्षांचे. माणसे परिसर शहर सारेच नवखे. जिकडे पाहावे, तिकडे माणसे आणि वाहने, पण परिचयाचे कोणीही नाही. पण तेव्हा ती काही सहल नव्हती. मुलगी म्हणून झालेले ते स्थलांतर होते. त्यानंतर अशी बरीच स्थलांतरे या ना त्या कारणाने झाली. नवी गावे, नवी माणसे भेटली. काही विसरली, काही कायमची स्मृती पटलावर कोरली गेली.

  आपल्याच प्रपंचाच्या रामरगाड्यात इतरत्र निरीक्षण करण्यास सवड कोणाला असते? ती निरीक्षणे करण्यासाठी सहलीत निवांतपणे काढलेला वेळ असतो. प्रत्येकजण हे निरीक्षण सहलीच्या दरम्यान करत असतो. त्या आठवणी गाठीशी बांधून ठेवत असतो. आणि मग रिकामपणी त्या आठवणीला उजाळा देत असतो. त्या आठवणीत असतात सहली दरम्यान प्रवासात, हॉटेलात मुक्कामाच्या ठिकाणी , सोबत असणारी विविध स्वभावाची माणसे, त्यांच्या स्वभावातील गमतीजमती पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची मनोहरी मोहक दृष्ये। अशी प्रत्येक सहलीची मौज न्यारीच असते. असे असले तरीही प सहलीचा आनंद अवर्णनीयच असतो.
  This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

  SHARE THIS

  Author:

  I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

  0 comments: