Tuesday, 18 February 2020

शिक्षिकेचे आभार मानणारे पत्र लिहा Thank You Letter to Teacher in Marathi

Thank You Letter to Teacher in Marathi : Today, we are providing मराठी आभार पत्र article on शालेय शिक्षणासाठी मदत करणाऱ्या शिक्षकाचे / शिक्षिकेचे आभार मानणारे पत्र लिहा. For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Thank You Letter to Teacher in Marathi to complete their homework.

शिक्षिकेचे आभार मानणारे पत्र लिहा Thank You Letter to Teacher in Marathi

प्रगती गायकवाड, कोल्हापूर.
२० मार्च २०१२
मा. नाकील मॅडम,
स.न.वि.वि.
पत्र लिहिण्यास कारण की, आजच इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर संपवून मी घरी आले. सगळे पेपर्स छान गेले. त्यामुळे निकालही छान लागेलच, याची खात्री आहे.
मॅडम, आज मला इथपर्यंत आणण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. नाहीतर पाचवीनंतर माझे शिक्षण बंद करून शाळेतून दाखला काढून घेण्यासाठी माझे बाबा शाळेत आलेच होते. नानात-हेने समजावल्यावरही ते आपले म्हणणे सोडत नव्हते. त्यावेळी तुम्ही माझ्या मदतीला देवासारख्या धावून आलात आणि "प्रगती हुशार मुलगी आहे, तिच्या आयुष्याचे नुकसान करू नका, हवं तर मी हिच्या शिक्षणाचा सगळा खर्च करते,” असं म्हणालात आणि माझे वडील तेथून दाखला न घेता निघून गेले.
तेव्हापासून आजपर्यंत मला आपली सर्वोतोपरी मदत झाली, मात्र इथून पुढे मी कुठेतरी अंशवेळ काम करून माझे शिक्षण नक्की पूर्ण करीन. आपले उपकार मी कधीच विसरू शकत नाही; परंतु आपले ऋण मानून त्यातून उतराई होण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल.
पुढच्या आठवड्यात समक्ष भेटीस येईन. सरांनाही माझा नमस्कार सांगा.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: