Vrutant Lekhan in Marathi Language : Today, we are providing article on वृत्तांत लेखन मराठी मधे For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12...
Vrutant Lekhan in Marathi Language: Today, we are providing article on वृत्तांत लेखन मराठी मधे For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Vrutant Lekhan in Marathi Language to complete their homework.
वृत्तांत लेखन मराठी मधे Vrutant Lekhan in Marathi Language
वृत्तपत्रांतून आपण वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या वाचतो. वृत्तांतलेखनात घडून गेलेल्या सभा, समारंभ, संमेलन, शिबिरे, प्रदर्शने इ. चा थोडक्यात अहवाल लिहिला जातो, या लेखनात कल्पनेला वाव नसतो.
वृत्तांत लिहिताना...
• घटना कोठे, केव्हा घडली ते स्थळ आणि वेळ सांगणे.
• घडलेल्या प्रसंगाचे अत्यंत वास्तव आणि मोजक्या शब्दांत वर्णन करावे.
• वर्णन भूतकाळात केलेले असावे.
• वर्णन सुरुवातीकडून शेवटाकडे जाणारे असावे.
• घडलेल्या प्रसंगाचे अत्यंत वास्तव आणि मोजक्या शब्दांत वर्णन करावे.
• वर्णन भूतकाळात केलेले असावे.
• वर्णन सुरुवातीकडून शेवटाकडे जाणारे असावे.
गुरुपौर्णिमा वृत्तांत लेखन
दि. ३ जुलै रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, भोर येथे गुरुपौर्णिमा उत्सव थाटात साजरी झाली. इयत्ता दहावी 'अ'च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालनापासून ते समारोपापर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व्यास पौर्णिमा का साजरी करतात हे सांगून, विद्यार्थ्यांच्या भाषणांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीफळ आणि गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
अभिनव विद्यालयात हिंदी दिन वृत्तांत-लेखन
अभिनव विद्यालय, हडपसर येथे १४ सप्टेंबर रोजी 'हिंदी दिन' साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी 'आपली राष्ट्रभाषा हिंदी असल्याने आपल्या सर्वांना ती भाषा अवगत असली पाहिजे,' असे मत प्रतिपादित केले. संपूर्ण कार्यक्रम हिंदीतून सादर झाला. हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धांचे आयोजन केले होते. दोन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
COMMENTS