निमंत्रण पत्रिका मराठी नमुना Invitation Letter in Marathi Language

Admin
0

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना Invitation Letter in Marathi Language

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना Invitation Letter in Marathi Language : एखाद्या समारंभाकरिता नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यासाठी तयार केलेली पत्रिका म्हणजे निमंत्रणपत्रिका. लग्नसमारंभ, स्नेहसंमेलन, पुरस्कार समारंभ इ. कारणांसाठी निमंत्रणपत्रिका तयार केली जाते. निमंत्रणपत्रिकेमधून निमंत्रकाचा जिव्हाळा दिसून येतो.

निमंत्रणपत्रिका तयार करताना (करणे)

  1. निमंत्रणपत्रिकेच्या मध्यभागी आपल्या श्रद्धेनुसार देवाचे नाव, प्रतीकात्मक चिन्हे टाकावीत.
  2. समारंभाची दिनांक, स्थळ, वेळ याचा स्वतंत्र व स्पष्ट उल्लेख करून कार्यक्रमाच्या स्वरूपाचे थोडक्यात विवेचन करावे.
  3. निमंत्रणपत्रिकेच्या शेवटी आपला कृपाभिलाषी किंवा स्नेहाभिलाषी, आपला नम्र यासारखे अभिवादनपर शब्द वापरून निमंत्रिकांची नावे द्यावीत.

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना-१

॥श्री॥
जोशी परिवार
श्रीराम, कर्वे रोड,
पुणे - ४११००४.
दूरध्वनी - ०२०- २४४५६५
३ जून, २०१२
श्री. / सौ...........................................
सप्रेम नमस्कार!
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, आमची आई सौ. वत्सला गोविंद जोशी ही १० जून २०१२ रोजी वयाची साठी पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने आम्ही 'जोशी' परिवाराने एक छोटेखानी सोहळा आमच्या राहत्या घरी आयोजित केला आहे. आपण या समारंभास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा, ही मनापासून इच्छा!
आपले कृपाभिलाषी,
जोशी परिवार
स्थळ : 'श्रीराम
कर्वे रोड, पुणे - ४११००४.
दिनांक : १० जून,२०१२
वेळ : संध्या. ७ ते ९

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना-२

॥श्री॥
बालक विहार विद्यामंदिर - मुंबई.
संगणक कक्ष - उद्घाटन समारंभ.
श्री. / सौ................................
सस्नेह नमस्कार!
बालक विहार विद्यामंदिराच्या संगणक कक्षाचे उद्घाटन
मा. सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ श्री. दीपक शिक्रापूरकर यांच्या शुभ हस्ते आणि मा. प्रवीण दवणे, सुप्रसिद्ध साहित्यिक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ जुलै २०१२ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता बालक विहार विद्यामंदिराच्या संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे.
याप्रसंगी आपण उपस्थित राहावे, ही विनंती.
आपले स्नेहाभिलाषी,
य. र. ल.
विद्यार्थी प्रतिनिधी

निमंत्रण पत्रिका मराठी नमुना-३

॥श्री॥
अहिल्याबाई होळकर विद्यालय, कोल्हापूर.
श्री. / सौ.............................................
सस्नेह नमस्कार!
८ मार्च, २०१२ रोजी जागतिक महिलादिनानिमित्त अहिल्याबाई होळकर विद्यालय, कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मा. विद्या बाळ यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
तरी याप्रसंगी आपण उपस्थित राहावे, ही विनंती.
आपले स्नेहाभिलाषी,
अ. ब. क.
(विद्यार्थिनी प्रतिनिधी)
स्थळ : अहिल्याबाई होळकर प्रशालेचे पटांगण.
वेळ : दुपारी ठीक : ४.०० वा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !