Nokari Sathi Arj in Marathi Language: Today, we are providing नोकरी साठी अर्ज पत्र मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Nokari Sathi Arj in Marathi Language to complete their homework.
नोकरी साठी अर्ज पत्र मराठी Nokari Sathi Arj in Marathi Language
॥श्री॥
प्रियांका भोसले
मु. पो. देवगड,
पिनः ४१६६१३
२२/४/२०१२
प्रति,
संचालक,
आकाशवाणी पुणे केंद्र,
शिवाजीनगर, पुणे- ४११००१
विषय : निवेदिकापदासाठी अर्ज
अर्जदार : कु. प्रियंका गणपत भोसले
संदर्भ : लोकमत वृत्तपत्र-जाहिरात दिनांक : १५/४/२०१२. महोदय,
दिनांक १५ एप्रिल, २०१२ च्या 'लोकमत'मधील जाहिरातीनुसार आकाशवाणी, पुणे केंद्र येथे निवेदक आणि निवेदिका हे पद रिक्त झाल्याचे समजले. त्यानुसार सदर पदासाठी मी अर्ज करीत आहे. माझ्यासंबंधीची आवश्यक ती माहिती पुढीलप्रमाणे देत आहे.
वैयक्तिक माहिती
नाव - कु. प्रियंका गणपत भोसले
शैक्षणिक पात्रता - १) एम. एम. (मराठी) २) आर. जे. कोर्स - १ वर्षाचा
जन्मतारीख - ९/५/१९८७
अवगत भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी
अनुभव - नागपूर, आकाशवाणी केंद्रावर १ वर्ष नोकरी.
तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, ही नम्र विनंती.
आपली विश्वासू,
(प्रियंका ग. भोसले)
(सहपत्रे : आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.)
Read also :
गुड इन्फॉर्मेशन
ReplyDelete