Thursday, 20 February 2020

प्रयोगशाळा सहायक पदासाठी अर्ज पत्र Application For the Post of Lab Assistant in Marathi Language

Application For the Post of Lab Assistant in Marathi Language: Today, we are providing मराठी आवेदन पत्र article on प्रयोगशाळा सहायक पदासाठी अर्ज पत्र For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Job Application for Lab Assistant Letter in Marathi Language to complete their homework.

प्रयोगशाळा सहायक पदासाठी अर्ज पत्र Application For the Post of Lab Assistant in Marathi Language

॥श्री॥
प्रणिता तेंडुलकर,
सहकारनगर,
मु. पो. अहमदनगर.
१५/५/२०११
प्रति,
मा. मुख्याध्यापिका,
राजाराम विद्यालय,
मु. पो. पन्हाळा, कोल्हापूर.
विषय : 'प्रयोगशाळा सहायक' पदासाठी अर्ज
संदर्भ : दि. १२ मे २०११ दैनिक 'सकाळ'मधील जाहिरात
महोदया,
स.न.वि.वि.
आपल्या विद्यालयातील 'प्रयोगशाळा सहायक पद रिक्त झाले असून ते त्वरित भरावयाचे असल्याचे दैनिक 'सकाळ' मधील जाहिरात वाचून समजले.
आपल्या अपेक्षेनुसार माझी शैक्षणिक पात्रता व मेहनती वृत्ती असल्याने मी सदर पदासाठी अर्ज करीत आहे.
माझी माहिती पुढीलप्रमाणे

  • नाव : श्रीमती प्रणिता ग. तेंडुलकर
  • जन्मतारीख : २८ मे, १९८६
  • शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी.
  • अनुभव : जनता विद्यालय, अहमदपूर येथे १ वर्ष.
माझ्या कुटुंबाची जबाबदारी मोठी मुलगी या नात्याने माझ्यावरच आहे. आपल्याकडे काम करण्याची संधी मिळाल्यास मी जबाबदारीने काम करेन. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, ही नम्र विनंती.
सोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडल्या आहेत.
तसदीबद्दल क्षमस्व!
आपली कृपाभिलाषी
सही (प्रणिता तेंडुलकर)
सोबत :
  • मा. शालान्त परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • उच्च माध्य. परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • बी. एस्सी. प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • अनुभवाचे पत्र-जनता विद्यालय, अहमदपूर.
Read also : 

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: