Abhar Patra lekhan in Marathi Language: Today, we are providing आभार पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Abhar Patra lekhan in Marathi Language to complete their homework.
आभार पत्र लेखन मराठी Abhar Patra lekhan in Marathi Language
आपले काम झाल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीचे आभार मानायला विसरत नाही. कारण आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे हा मानवाचा स्वभावच आहे. अनेक वेळा आपल्याला लेखी स्वरूपात आभार मानताना आभार कोणाचे मानायचे? आणि कशासाठी? याचा विषय दिलेला असतो. त्यानुसार विचार करून आभारपत्र लिहावे.
१) सन्माननीय व्यक्तींनी कोणते विचार मांडले.
२) आपली भाषा कृतज्ञता व्यक्त करणारी हवी.
३)त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा उल्लेख हवा.
४) आम्हाला कोणता संदेश मिळाला?
या सर्व बाबींचा पत्रात समावेश असावा.
आपण पत्र पाठविण्याचा हेतू हा आलेल्या पत्राचे उत्तरही असू शकतो.
उदा. एखाद्या नामवंत लेखकाला त्यांच्या नवीन पुस्तकाच्या वाचनानंतर वाचकाने लिहिलेल्या प्रतिक्रियेला लेखकाने दिलेले उत्तर म्हणजे आभारपत्र!
0 comments: