Mi Ganpati Boltoy Essay in Marathi Language : Today, we are providing मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 1...
Mi Ganpati Boltoy Essay in Marathi Language : Today, we are providing मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Mi Ganpati Boltoy Essay in Marathi Language to complete their homework.
मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी Mi Ganpati Boltoy Essay in Marathi Language
मी दूरदर्शनवर 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम पाहत होते. आपल्याला हव्या त्या व्यक्तीला (स्वर्गलोकातीलही!) फोन लावून त्याच्याशी गप्पा मारण्याची कल्पना मला आवडली न मी चक्क देवलोकातील गणपतीबाप्पांनाच फोन लावला हो!
"हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? पृथ्वीलोकातून मी तुमची भक्त बोलतेय. कोण, गणपतीबाप्पा, ना?"
"हो, हो, मी गणपतीच बोलतोय, देवलोकांतून."
“बोल, बोल भक्ता!”
Read also : एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध
"हो, हो, मी गणपतीच बोलतोय, देवलोकांतून."
“बोल, बोल भक्ता!”
Read also : एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध
"बरं झालं, बाप्पा तुम्ही फोनवर तरी भेटलात ते! नाहीतर आमच्यासारख्या भक्तांना तुमचं दर्शनही दुर्मीळ झालंय हल्ली!"
"भक्ता! मलाही तुझ्याशी खूप खूप बोलायचंय रे; पण दहा दिवसांत ते अजिबात शक्यच नसतं. माझ्या आगमनाची चाहूल लागल्यापासून ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही एकदम व्यस्त असता ना!"
हेच बघ ना, श्रावण संपल्यावर गणेशोत्सवाचे 'काउंटडाउन'ही सुरू झाल्याचे फलक दिसू लागले. तुम्ही माझे स्वागत अगदी धूमधडाक्यात करता. ढोलताशांच्या तालमी महिनाभर आधीच सुरू होतात. रस्त्या-रस्त्यातून मांडव घातले जातात. वर्गणीसाठी कार्यकर्ते गल्लीबोळांतून प्रत्येक घराचा दरवाजा खटखटवतात. दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच लोकांना देता! पुण्यामधील सार्वजनिक गणेशोत्सव तर ऐतिहासिक, तसेच चालू घडामोडींवर आधारित देखावे करून समाजजागृतीचंही कार्य करतात.
Read also : पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध
Read also : पुतळे बोलू लागले तर मराठी निबंध
गणेशचतुर्थीच्या दिवशी मुहूर्त पाहून माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा तुमचा अट्टाहास असतो. तिकडे गुरुजींची धावपळ तर अगदी पाहवत नाही. त्यांच्या पायाला चाक आणि कानाला मोबाईल चिकटलेला असतो. त्यामुळे माझ्या पूजेकडे त्यांचं लक्ष तरी असतं का, हा प्रश्नच आहे. हां, तुम्ही मात्र मला काही म्हणजे काही कमी पडू देत नाही. मोठमोठे हार काय, दूर्वा, केवडा, कमळ, सुगंधी धूप, उदबत्त्या, मोदकाचे शेकडो प्रकार, फळे, फुले, पेढे, मिठाई असं सारं काही माझ्या चरणी अर्पण करता.
पण एवढं सगळं खाल्ल्यामुळेच माझं पोट मोठ्ठ आहे असं मात्र नाही बरं का, ज्ञान, विद्या आणि लोकांचे अपराध असं काय काय माझ्या पोटात दडलंय.
माझ्या येण्यानं सगळीकडेच उत्साहाचे आणि आनंदाचे वारे वाहताना दिसतात; पण भक्ता, मला काही गोष्टी खटकतात, त्या आता सांगतोच!
Read also : अभिनंदन पत्र लेखन मराठी
Read also : अभिनंदन पत्र लेखन मराठी
गणेशोत्सव म्हणजे ज्ञानसत्र; गणपती ही बुद्धीची देवता. त्यामुळेच समाज प्रबोधन हा या उत्सवाचा मध्यबिंदू हवा. उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची काळजी घ्या. उत्सवाने पर्यावरणाचा हास होता काम नये. रहदारीस अडथळे ठरणारे मांडव उभारून आपले शक्तिप्रदर्शन का करता बरं? उत्सवाच्या निमित्ताने गोरगरिबांना अन्नदान, पीडितांना आर्थिक मदत, दत्तक योजना यासारखे उपक्रम राबवता येतील, नाही का?
माझा उत्सव थाटामाटात साजरा व्हावा म्हणून तुम्ही कधी कधी धाकधपाट्याचा वापर करून वर्गणी गोळा करता, हे मला आवडत असेल का?
मोठमोठ्या मिरवणुका काढून, साउंडच्या भिंती लावून, त्या कर्णकर्कश आवाजात सिनेमामधील सव्यंग्य गाणी लावून बेधुंदपणे नाचता आणि वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण करता, हे मला रुचत असेल का? त्यापेक्षा पारंपरिक वाद्यांचा वापर का नाही करत?
त्या आवाजाने किती ध्वनिप्रदूषण होते, विद्युतरोषणाईने किती वीज वापरली जाते, वाहनांच्या ताफ्यामुळे किती वायुप्रदूषण होते याचा कधी तरी विचार केलाय का?
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोकांना संघटित करणे, हा लोकमान्य टिळकांचा उद्देश विसरून छोट्या-मोठ्या सार्वजनिक मंडळामध्ये आज आपापसातील भांडणेच दिसतात. तुमच्यामधील भांडणास माझा उत्सव कारणीभूत ठरतोय, हे पाहून मला डोळे गच्च मिटून घ्यावेसे वाटतात.
'दोन हस्तक आणि तिसरे मस्तक' एवढीच माझी अपेक्षा! तुम्हा सर्वांना आनंद मिळावा, सुख मिळावं, समाधान वाटावं म्हणून तर मी अगदी निवांतपणे दहा दिवस तुमच्या घरी मुक्कामाला राहतो.
Read also : गणेश उत्सव पर संस्कृत निबंध
Read also : गणेश उत्सव पर संस्कृत निबंध
माझ्या मोठ-मोठ्या मूर्ती बनवता आणि त्या मूर्तीच्या विसर्जनामुळे किती जलप्रदूषण होते बरं! निर्माल्यासाठी मोठमोठे कलश असं छान नियोजन करता, तरीपण नदी आणि हौदातही निर्माल्य टाकणारे काही कमी नाहीत.
मागच्या वर्षी मी एक बातमी माझ्या या मोठ्या कानांनी ऐकलीय. मलाही ती कल्पना फारच आवडली. बघा, तुम्हालापण पटते का ती कल्पना.
कोणत्या तरी गावात म्हणे वेगवेगळे गणपती बसवण्यापेक्षा 'एक गाव-एक गणपती' असा ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. त्यामुळे खर्चही कमी झाला, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषणही न होता आपापसातील एकी वाढली, सामंजस्य वाढले. सगळ्यांच्या विचाराने गणेशोत्सव साजरा झाला. असं सगळ्या महाराष्ट्रात झालं तर मीही तुमच्या आनंदात आनंदाने सहभागी होईल."
एवढं म्हणून गणपतीबाप्पाने माझा फोन खाली ठेवला. मीही ठरवलं यंदा गणपतीची इको फ्रेंडली मूर्ती आणि इको फ्रेंडली पूजासाहित्य आणून बाप्पांचं सांगणं ऐकायचं. तुम्हीही ऐकणार ना?
COMMENTS