Vidyarthi Che Manogat Nibandh in Marathi In this article विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी, " विद्यार्थ्यांचे आत्मकथन " for stude...
Vidyarthi Che Manogat Nibandh in Marathi In this article विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी, "विद्यार्थ्यांचे आत्मकथन" for students. Autobiography of a student essay in marathi for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Vidyarthi Che Manogat Nibandh Marathi", "विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी", "विद्यार्थ्यांचे आत्मकथन" for Students
मित्रा, खूप दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचंय.
तुला तर माहितीच आहे, चौथी आणि सातवीमध्ये मला शिष्यवृत्ती मिळालीय. माझे आई-बाबा त्यामुळे खूपच आनंदी आहेत. मी नक्की इंजिनिअर होणार, असा आईला ठाम विश्वास वाटतोय. बाबांच्या कंपनीत काम करून मी त्यांचा 'आधार' होणार, हे त्या दोघांनी गृहीत धरलंय.
पण मला मोठेपणी कोण व्हायचंय असं त्यांना एकदाही विचारावंसं वाटलं नाही? माझी आवड काय आहे? माझा कल कोणत्या दिशेला आहे, हेच ते जाणून घेत नाहीत.
मी चित्रांच्या दुनियेत हरवून गेलो की, रागावता मात्र येतं त्यांना! "चल, अभ्यासाला बस." अगदी अर्धा तासपण मला रंगांमध्ये मनसोक्त खेळू देत नाहीत.
तुला सांगू? मला ना, हातात ब्रश धरून निरनिराळ्या रंगांमध्ये रंगून जायला खूप खूप आवडतं. माझ्या चित्रकलेच्या शिक्षकांनीही माझी आवड ओळखलीय. चित्रकलेच्या परीक्षेसाठी मी क्लासला प्रवेश घ्यावा म्हणून ते सारखं मला प्रोत्साहन देतात; पण मी आई-बाबांना कसं सांगू? मला त्यांची भीती वाटते रे! "चित्र काढून कुठं पोट भरतं का?" असं एकदा आई मला रागाच्या भरात बोलली होती.
मित्रा, अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता मी छान-छान चित्रं काढली तर बिघडलं कुठं? मला निसर्गाची विविधता, दुधासारखे फेसाळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं, हिरव्यागार पाचूची बेटं, उगवणारा/ मावळणारा सूर्य-चंद्र, चमचमणाऱ्या चांदण्या भुरळ पाडतात रे!
चित्रं काढताना, ती रंगवताना माझं भानच हरपून जात. माझे सर म्हणतात, "तुझ्या लांबसडक बोटात चित्रकला लपलीय. तुला उपजतच रंगाचं ज्ञान आहे. तू नक्कीच खूप मोठा चित्रकार होशील."
खरं तर मी खूप बडबडा आणि खेळकर आहे. मला आई-बाबांशी गप्पा मारायला आवडतं. शाळेतील गमती-जमती मी माझ्या आजीला नेहमी सांगत असतो. घरी आलो की, मी आणि आज खूप मजा करतो. माझी आजी माझी 'बेस्ट फ्रेंड' आहे. तिला मी माझी चित्रं दाखवतो. तिला ती खूप आवडतात. ती माझं कौतुकही करते; पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं बजावत असते. कारण तिलाही मी इंजिनिअर व्हायला हवंय.
मलाही ते पटतंय, पण म्हणून मी माझी 'आवड दूर करायची का? अलीकडे आई-बाबांशी मी बोलणंच कमी केलंय. मला वाटतं, आता तरी ते मला समजून घेऊन ते थोडा वेळ चित्रांच्या दुनियेत फेरफटका मारू देतील.
शाळेत शिक्षक पाठ्यपुस्तकातून शिकवतात की, प्रत्येकाला एखादी कला अवगत असली पाहिजे. कलाकारांचा समाजात गौरव होतो आणि घरी मात्र माझ्या अंगातल्या कलेची अवहेलना होते.
माझ्या मनाची घालमेल कोण ओळखेल बरं?
अभ्यासाच्या ताणातून मुक्त होण्यासाठी मला चित्रकलेचाच आधार वाटतो. रंगांमध्ये खेळलो की, मी एकदम ताजातवाना होतो. हे आई-बाबांच्या लक्षात कसं येत नाही?
COMMENTS