अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra in Marathi Language

Admin
3
Abhinandan Patra in Marathi Language : Today, we are providing अभिनंदन पत्र लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use abhinandan patra marathi madhe / Abhinandan Patra in Marathi Language to complete their homework.

अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra in Marathi Language

अभिनंदनपर पत्र-१
अ. ब. क.
माध्य. विद्या. पिंपळेगुरव
पिंपरी, पुणे - ६१
८ सप्टेंबर, २०१२
मा. संपादक,
महाराष्ट्र टाइम्स,
पुणे कार्यालय
विषय : वृत्तपत्रातून पत्र प्रसिद्ध करणेबाबत
महोदय,
आज दिनांक ८ सप्टेंबर, १२ रोजी सुप्रसिद्ध गायिका श्रीमती आशा भोसले आपल्या वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही एक पत्र लिहिले आहे. तुमच्या वृत्तपत्रातून तुम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, ही नम्र विनंती.
आशाताईंची गाणी तर आम्ही रोजच ऐकतो; पण इयत्ता ८वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून आम्हाला त्यांची 'विशेष' ओळख झाली. आशाताईंचा सुरेल प्रवास, अडचणींवर हसत हसत मात करत पुढेच जाण्याची वृत्ती आम्हा विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरली.
आनंदी, उत्साही आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या आशाताईंवर साऱ्या देशवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव आणि लतादीदी यांनी आशाताईंना दिलेला पत्ररूपी आशीर्वाद महाराष्ट्र टाइम्समधून वाचला. तो वाचून खूप आनंद झाला.
"आशाताई, तुम्ही अशाच गात राहा आणि आम्हा कानसेनांचे कान 'तृप्त' करत राहा."
तुमची वाचक


अभिनंदनपर पत्र-२
अ. ब. क.
ना. दा. ठा. विद्यालय
शनिवार पेठ - पुणे
६ सप्टेंबर, २०१२
मा. डॉ. स्नेहा जोशी
स. न. वि. वि.
मॅडम, अभिनंदन! आज सकाळी वृत्तपत्रात आपला फोटो आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार घेतानाचे छायाचित्र बघितले; संपूर्ण बातमीही वाचली, खूप आनंद वाटला. आम्हाला आपला अभिमान वाटतो. आम्हा सर्व विद्यार्थिनींचे तुम्ही 'आदर्श' आहात. सतत कामात मग्न असूनही इतरत्रही तुमचा उत्साही संचार आम्हाला भावतो.
शैक्षणिक क्षेत्रातील तुमच्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य सरकारनेही घेतली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
यापुढेही आपण असेच कार्य करत राहावे, यासाठी आम्हा सर्वाकडून आपल्याला शुभेच्छा!
आज शाळेमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वारे वाहत होते. कारण आमच्या 'आदर्श' मॅडमना राज्य सरकारनेही 'आदर्श' म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
पुनश्च अभिनंदन!
आपली विद्यार्थिनी
अ. ब. क.
(इ. १० वी- अ)

Post a Comment

3Comments
Post a Comment

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !