Tuesday, 11 February 2020

मला पंख असते तर मराठी निबंध If I Had Wings Essay in Marathi Language

If I Had Wings Essay in Marathi Language : Today, we are providing मला पंख असते तर मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use If I Had Wings Essay in Marathi Language to complete their homework. 

मला पंख असते तर मराठी निबंध If I Had Wings Essay in Marathi Language

'मन वढाय, वढाय
आता होतं भुईवर
आता गेलं आभायात'
बहिणाबाई चौधरी आपल्या या काव्यातून मनाच्या चंचलतेविषयी म्हणतात की, क्षणात जमिनीवर असणारं मन आकाशात कधी झेप घेतं ते कळतही नाही.
काल प्रार्थनेसाठी मैदानात उभे असताना आकाशातून जाणारे विमान पाहिले अन् मनात एक विचार आला की, 'मला पंख असते तर...'
अय्या! काय छान कल्पना सुचली नाही?
Read also : परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध
मला पंख असते तर आई मला घरात डांबून ठेवूच शकली नसती. आईच्या हातावर तुरी देऊन मी सगळ्या मैत्रिणींना पटकन भेटून आले असते.
रोज सकाळी जाग आल्यावर पक्ष्यांप्रमाणेच मी या झाडावरून त्या झाडावर भटकत राहिले असते. कैरी, जांभळे, पेरू, चिकू अशा वेगवेगळ्या फळांचा फडशा पाडला असता. आणि मी कैरी, चिंच खाल्ल्याचं आईला कळलंचं नसतं, त्यामुळे तिचा ओरडाही खावा लागला नसता! शिवाय फिरून फिरून दमल्यावर झाडाच्या गर्द फांदीवर बसून झोके घेत, घेत एक छानशी डुलकीपण घेतली असती.
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
शाळेमध्ये गृहपाठ केला नाही म्हणून मॅडम छडी घेऊन आल्या, तर पटकन पंख पसरून खिडकीतून भुरकन उडून गेले असते.
मला पंख असते तर विनातिकीट मी कुठेही जाऊ शकले असते. अगदी गावाच्या बाहेर, देशाच्याही बाहेर बरं का! ते कुठलेसे पक्षी नाही का येत सातासमुद्रापलीकडून आपल्या देशात, तसे! ना पासपोर्टचं झंझट ना व्हिसाचं.
पण देशाच्या बाहेर जाण्याआधी मी आपल्याच गावातील, राज्यांतील, देशातील सगळी प्रेक्षणीय स्थळे डोळे भरून पाहिली असती.
Read also : माझे आजोबा मराठी निबंध
आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीवरून पंख पसरून मी मनसोक्त विहार केला असता, पक्ष्यांबरोबर राहून राहून मला त्यांची भाषासुद्धा कळू लागली असती. खूप दिवसांपासून उंच झाडाला टांगलेले सुगरणीचे घरटे जवळून पहायची इच्छा होती. ती पूर्ण करून घेतली असती.
आमच्या शाळा, बाबांचे ऑफिस यामुळे आईला तिच्या आईकडे म्हणजे माझ्या आजीकडे जाता येत नाही. कधी कधी ती उदास असते, तेव्हा पटकन तिला घेऊन गेले असते तिच्या आईच्या भेटीला! तिला अचानक असं पाहून माझी आजी किती खूश झाली असती ना!
पण मनात एक विचार आला की, सगळ्या मानवांना थोडेच पंख असतात? मग मला पंख आहेत हे पाहून कुणी दुष्टानं मला जाळ्यात पकडलं आणि एखाद्या जत्रेत एक वेगळा प्राणी म्हणून पिंजऱ्यात बंदिस्त करून लोकांसमोर नेलं तर?
Read also : मला पंख फुटले तर निबंध माहिती
काही जण काय गंमतशीर प्राणी आहे म्हणून मला हसतील, तर लहान मुले मला दगड मारून-मारून हैराण करतील. मग मला रडू येईल; पण त्यावेळी मायेनं जवळ घेणारी माझी आई थोडीच माझ्याजवळ असेल? माझा दादा, माझे बाबा कोणीही मला तिथं दिसणार नाहीत.
नको रे बाबा मला ते पंख. माझ्या आई-बाबांच्या पंखाखाली मी एकदम मजेत आहे, तेच बरं!

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: