Autobiography of Caged Parrot in Marathi : In this article पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी for students. Autobiography of Caged Bird ...
Autobiography of Caged Parrot in Marathi: In this article पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी for students. Autobiography of Caged Bird in Marathi, " Parrot Atmakatha in Marathi" for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Autobiography of Caged Parrot / Bird", "पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत निबंध मराठी", "Parrot Atmakatha in Marathi" for Students
मिट्ट, मिठू, इकडे बघ. हे बघ, ही हिरवी मिरची तुला आवडते ना म्हणून मी आणलीय तुझ्यासाठी." छोटीशी अवनी आपल्या छोट्याशा हातानं पिंजऱ्यात बंदिस्त अशा मला खायला देतेय. खूप गोड आहे अवनी! खरं तर मी आज काहीच खायचं नाही, असं ठरवलं होतं. राग आलाय मला, या स्वार्थी माणसांचा! पण अवनीला काय माहीत, मी इथे कसा आलो ते! त्या गरीब, लहान मुलाची दया आली म्हणून अवनीच्या बाबांनी त्याच्याकडून पैसे देऊन मला घरी आणलं. हे पारधी लोक आम्हा पक्ष्यांना पकडतात आणि शहरात आणून विकतात. आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात.
कुत्रा, मांजर, लव्हबर्डस्, रंगीत मासे पाळणं हा माणसाचा छंद! कुत्रा घराची राखण करतो, मांजर घरात उंदीर, पाल येऊ देत नाही; पण माझं काय? केवळ करमणुकीसाठी मला इथं डांबून ठेवलंय.
आज सकाळीच माझा एक बांधव समोरच्या झाडावर येऊन बसला होता. मला म्हणाला, "काय रे ही तुझी अवस्था! मी बघ कसा या झाडावरून त्या प्राडावर मस्त विहार करतो. कधी जांभूळ तर कधी पेरू खातो. कधी उंच-उंच झोके घेतो. कधी फळांना नुसतीच चोच मारतो. फळ गोड लागलं तरच खातो. असं छान स्वच्छंदी जीवन जगतो." मी त्याला खिन्नपणे म्हणालो, "काय सांगू मित्रा, मीही असंच सुंदर जीवन उपभोगत होतो. त्या दिवशी मात्र त्या पारध्यानं जाळ्यावर टाकलेल्या लाल लाल डाळिंबाच्या दाण्यांचा मोह मला कसा झाला, माझं मलाच कळलं नाही. दाणे खाता खाता माझे दोन्ही पाय जाळ्यात कधी अडकले ते! खूप फडफड केली पण व्यर्थ!
दुसऱ्या दिवसापासून हा बघ इथं, राहतोय. अवनीचे आई-बाबा, मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतात. मला भिजवलेली चणाडाळ, पेरू, हिरवी मिरची खायला देतात. पाणी देतात. माझ्याशी गप्पा मारतात. माझं हे सुंदर रूप त्यांना खूप आवडतं. अवनीचे मित्र-मैत्रिणी तर सतत माझ्याभोवतीच असतात. सारखं 'त्याची लालचुटुक बाकदार चोच बघ, त्याच्या गळ्याभोवती हा काळा पट्टा कसा छान आहे ना! असं म्हणतात. मग कौतुक केल्यावर मीही हुरळून जातो आणि पोपटपंची करू लागतो; पण मला माझ्या आई-बाबांची आठवण येते रे! त्यांना कसं कळणार मी कुठे आहे ते?
स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारी माणसं दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेताना कसलाच विचार करत नाहीत. उलट रोज रात्री झोपताना पिंजऱ्याचं दार नीट लागलंय ना, याची खात्री करून घेतात.
मीही इथं परिस्थितीशी जुळवून घेतोय. मला पाहून छोट्या अवनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझं दुःख विसरण्याचा प्रयत्न करतोय.
आज ना उद्या या माणसांना माझी दया आली तर ते मला कदाचित मुक्तही करतील या आशेवर दिवस ढकलतोय.
मला रोज रात्री उंच आकाशात भरारी घेतल्याची स्वप्नंही पडतात. कधी हे स्वप्न पूर्ण होईल कोण जाणे?
COMMENTS