Sunday, 4 October 2020

Marathi Essay on "Autobiography of a Handicapped Person", "अपंग व्यक्तीचे मनोगत निबंध", "Apang Vyakti Chi Atmakatha in Marathi"

Autobiography of a Handicapped Person Essay in MarathiIn this article अपंग व्यक्तीचे मनोगत निबंध मराठी for students. Apang Vyakti Chi Atmakatha in Marathi for class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Autobiography of a Handicapped Person", "अपंग व्यक्तीचे मनोगत निबंध", "Apang Vyakti Chi Atmakatha in Marathi"

तो काळा दिवस मी आयुष्यभर विसरू शकत नाही. खरं तर माझ्यासाठी तो आनंदाचा दिवस ठरणार होता. किती खूश होतो मी गेला आठवडाभर! मला हव्या त्या कार्यालयात हवी ती नोकरी मिळाल्याची बातमी पोस्टमन काकांनी आणली आणि आमच्या सगळ्या चाळीत जणू उत्साहाचं वारं संचारलं. मी सगळ्या चाळकऱ्यांचा लाडका होतो ना!

Marathi Essay on "Autobiography of a Handicapped Person", "अपंग व्यक्तीचे मनोगत निबंध", "Apang Vyakti Chi Atmakatha in Marathi"

गणेशोत्सव असो की गोकुळाष्टमी, माझा सहभाग नाही असं कधीच होत नाही. अभ्यासातही बरा असल्यानं चांगल्या महाविद्यालयात मला सहज प्रवेश मिळाला. तिथंही विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी स्वतःला सिद्ध केलं होतं. आमच्या चाळीत तर मी सर्व छोट्यांचा लाडका 'दादा' होतो. तर त्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री आई-बाबांचं स्वप्न मी पुरं करणार, या विचारानं मला रात्रभर झोपही लागली नव्हती. पैशांमुळे अडून राहणारी बरीच कामं मला आता करता येणार होती.

त्या दिवशी मी नेहमीपेक्षा लवकरच उठलो. स्वतःचं आवरून, छान इस्री केलेले, ठेवणीतले कपडे घालून, देवाच्या पाया पडून, आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन जवळजवळ धावतच बसस्टॉपवर पोहोचलो. माझ्या समोरूनच मला हवी असलेली बस स्टॉपवर न थांबता तशीच निघून गेली. माणसांनी खचाखच भरलेल्या त्या बसकडे मी पाहतच राहिलो.

आता अर्धा तास तरी दुसरी बस येणार नव्हती. मला कार्यालयात जायला उशीर तर नाही ना होणार? या भीतीने कोणताही विचार न करता मी बसच्या मागे पळालो. तिथून पुढे थोड्याच अंतरावर असणाऱ्या सिग्नलजवळ नक्की बस थांबेल आणि आपण त्याचाच फायदा घेत बसमध्ये चढावं, असा स्वार्थी विचार मी केला; पण मी तिथं पोहोचेपर्यंत सिग्नल सुटून बस निघाली होती. मी बसच्या दारातील हॅन्डल पकडण्याचा प्रयत्न केला; पण माझा प्रयत्न व्यर्थ गेला. माझा हात सुटला. मी खाली रस्त्यावर पडलो. मागून भरधाव वेगाने येणारी वाहने पाहिली आणि डोळे गच्च मिटून घेतले. पुढे काय झाले...

डोळे उघडले तेव्हा मी एका दवाखान्यातील कॉटवर पडलेलो होतो. जवळजवळ ५/६ तासांनी मला शुद्ध आली होती. माझे आई-वडील, चाळीतील सगळी माझी माणसं मोठ्या चिंतेत मी शुद्धीवर यायची वाट पाहत होते. मी डोळे उघडलेले पाहून माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले. काय झालं मला? मी आईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. आईनं माझा हात हातात घेतला. म्हणाली, “देवाची कृपा म्हणून आज तुला मी पाहते आहे रे बाळा. काय झालं असतं आज नाही तर... कल्पनाच करवत नाही. थोडक्यात वाचलास रे, माझ्या राजा." असं म्हणत असतानाच तिचा बांध फुटला. ती रडू लागली. माझी मानलेली मावशी (आमचे सख्खे शेजारी) आईचा हात धरत म्हणाली, 'ताई, रडू नका. सगळं व्यवस्थित होईल. तुम्हीच धीर सोडलात तर इतरांनी काय करायचं?

तेवढ्यात मला लक्षात आलं, 'अरे माझ्या पायांची काहीच हालचाल कशी होत नाहीये? आई, मावशी माझे पाय बांधून का ठेवलेत? काय झालंय? "काही नाही रे बाळा, छोटासा अपघात झालाय तुला. त्या दुखण्यातून तू लवकरच बरा होशील. काळजी करू नकोस!" आई म्हणाली.

दुसऱ्या दिवशी मला माझ्या दुखण्याचे गांभीर्य लक्षात आले. मी माझा एक पाय गमावून बसलो होतो. खूप खूप रडलो. नियतीनं आता माझ्यासमोर वेगळंच संकट उभं केलं होतं. कसा लढणार होतो मी दैवाबरोबर? सारं-सारं संपलंय. मी हरतोय, देवा. का माझी अशी दुर्दशा केलीस? मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या म्हातारपणी आधार द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. मी त्यांची काठी होणार होतो. आता ते माझा आधार होताहेत. त्यांनी या वयात मला आधार दयावा का?

जवळजवळ महिनाभर उपचारानंतर मला घरी जाण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली. भलं मोठं दवाखान्याचं बिल माझ्या बाबांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशातून चुकत केलं. मी लाजेनं वरदेखील पाहू शकत नव्हतो. त्या रात्री मात्र मी ठरवल. मी उदास राहिलो, तर आपलं हे घर कधीच या धक्क्यातन सावरणार नाही. आपणच धीर धरायचा. मी माझ्या मनाला बजावलं, रडायचे नाही. आल्या परिस्थितीला सामोरं जायचं. देव आपली परीक्षाच घेतोय. आपण त्याही परीक्षेत उत्तम गुणांनीच पास होऊन दाखवायचं.

मला संगणकाचे ज्ञान होतंच. मी बाबांना म्हटलं, “बाबा तुम्ही आता काळजी करू नका. मी घरी बसल्या-बसल्या संगणकावर करता येणारी लोकांची अनेक काम करीन, ती करून मी पैसे मिळवीन. राज्य सरकारनं अपगांसाठी ज्या योजना आखल्या आहेत त्यांची माहिती मिळवून मी एक छोटस, झेरॉक्स मशीन आणून दुकान थाटेन. मनात आणलं तर, बाबा मी खूप काही करू शकतो. मी तुम्हाला ते करून दाखवेनच! माझा उत्साह, आवेश पाहून माझ्या आई-बाबांचे डोळे पाण्यानं डबडबले, बाबा-आई, मला पाय नसले तरी मला पंख आहेत विचारांचे! ते पंख पसरून मी माझ्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. बाबा, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर?" "होय रे बाळा! किती गुणी आहेस तू. आम्हाला तुझा अभिमान वाटतो बरं! अरे, आलेल्या संकटाला किती पीरानं तु सामोरं जायचं ठरवलं आहेस.” दोघंही म्हणाले.

"हात-पाय घड असणारी कितीतरी मुलं आपल्या आई-वडिलांना किती यातना देतात हे पाहतो ना आम्ही. तुला जन्म देऊन आम्ही कृतार्थ झालो आहोत."

बाबांशी बोलून मी संगणकवरील कामकाज सुरू केलं. 

आता जणू मामा पुनर्जन्मच झाला होता. 


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

1 comment: