Essay on Superstition in Marathi Language : In this article " अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या मराठी निबंध ", " अंधविश्वासी समाज ...
Essay on Superstition in Marathi Language: In this article "अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या मराठी निबंध", "अंधविश्वासी समाज पर कीट मराठी निबंध", "Andhvishwas Marathi Nibandh" in marathifor students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Superstition", "अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या मराठी निबंध", "Andhvishwas Marathi Nibandh" for Students
'श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।' असे म्हटले जाते; पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातला फरक ओळखायचा कसा? श्रद्धेने ज्ञान मिळते आणि ज्ञानाने अंधश्रद्धा दूर जातात, नाहीशा होतात असा काहींचा विश्वास आहे. ज्ञान हा बुद्धीचा प्रांत तर श्रद्धा-अंधश्रद्धा हा मनाचा प्रांत असे आपण समजतो; आणि आपल्या जगण्याचा अर्थ आपल्याला बुद्धी व मन या दोघांच्या समन्वयातून सापडत असतो. श्रद्धा काय किंवा अंधश्रद्धा काय बुद्धीच्या कसोटीवर घासून ठरत नसतात. जसजसे ज्ञान वाढत जाईल तसतशा अंधश्रद्धा कमी होत जातील असे आपण मानतो. पण हाही एक गैरसमज असण्याचीच शक्यता आहे; कारण बौद्धिक समाधानापेक्षा माणूस मानसिक समाधानावर अधिक विसंबून असतो. 'मला काय पटते?' यापेक्षा 'मला काय वाटते?' याच्याशी माणसाच्या वर्तनाचा जवळचा संबंध असतो आणि मनाला वाटणे हे श्रद्धा-अंधश्रद्धा या दोन्ही प्रकारांचे असू शकते. श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा मानवी जीवनावर इतका जबरदस्त प्रभाव असतो की, त्यांच्याशिवाय आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही.
श्रद्धा जगण्याचे बळ देते, असे आपण मानतो; पण अंधश्रद्धेचे काय? तिच्यामुळे जगण्याला बळ मिळते की, आपल्यावरचा तिचा पगडा चुकीचा आहे हे पटूनही आपण ती डावलू शकत नाही? एखाद्या कोपऱ्यातून ‘पाल चुकचुकली!' किंवा आपण एखाद्या कामाबद्दल काही बोलायला सुरुवात केली आणि 'कुणीतरी सटकन शिंकले', तर आपण कामाबद्दल साशंक होतो; कामाच्या यशाबद्दलची आपली खात्री ढासळते. आपण घराबाहेर पडायला आणि 'मांजर आडवे जायला!' एक गाठ पडली तर काम होणार नाही, असे समजून आपण निराश होतो आणि त्या बिचाऱ्या मांजराचा राग राग करतो. पण कामाला बाहेर पडताना किंवा सकाळी-सकाळी भारद्वाज पक्षी दिसला, कुहकुहू करणारी काळी काळी कोकिळा दिसली, तर मनाला केवळ प्रसन्न वाटते असे नाही तर दिवसभराच्या कामातील यशाबद्दल शाश्वती वाटायला लागते. या अनुभवाला नेहमीच खरेपणाचे बळ असतेच असे नाही. पण हे समज अगदी बालवयापासून रुजलेले असतात. 'पाल चुकचुकणे', 'मांजर आडवे जाणे', 'भारद्वाज किंवा कोकिळा दिसणे' यांचा यशापयशाशी संबंध काय? 'शुभ्र रंगाची सवत्स धेनू' दिसणे याचा आपल्या कामातील, घटनांच्या यशाशी कोणता संबंध आहे, हे तार्किक पातळीवर शोधूनही सापडलेले नाही. बुद्धीला त्याचा अर्थ सापडत नाही; म्हणून त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. बुद्धीची धाव त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही; म्हणून त्या अंधश्रद्धा ठरतात. त्या नेहमीच सत्य ठरत नसतील, म्हणूनही त्या 'अंध' ठरतात आणि 'विषाची परीक्षा कशाला घ्या?' या भीतीपोटी आपण त्यांची सत्यासत्यता उलगडून पाहण्याचा धोका पत्करत नाही; म्हणूनही त्या अंधश्रद्धा ठरतात.
प्रत्येक समाजात, प्रत्येक देशात अशा कोणत्या ना कोणत्या अंधश्रद्धा असतातच. अंधश्रद्धेचा प्रभाव झुगारून देणारी एखादी बुद्धिमान व्यक्ती असू शकेल; पण अंधश्रद्धा नसलेला समाज जगाच्या पाठीवर असणे अशक्यच आहे. १३ हा क्रमांक इंग्रज माणूस अशुभ मानतो. आपल्या घराला, बँकेतील खात्याला किंवा गाडीला १३ हा क्रमांक न येऊ देण्याचा तो प्रयत्न करतो. भारतीय परंपरेत काळा रंग शुभ मानत नाहीत. फक्त संक्रांतीसारख्या एखाद्या सणाला नववधूसाठी तो पवित्र मानला जातो. कोणत्याही शुभकार्याचे आमंत्रण देताना व स्वीकारताना भारतीय पुरुष डोक्यावर टोपी, पागोटे घालण्याचे प्रतीकात्मक स्वरूपात मान्य करतो. घराची झाडझूड ज्या केरसुणीने केली जाते तिला आपण काही सणांमध्ये 'लक्ष्मी' म्हणतो. एक प्रकारे या सर्वांमध्ये अंधश्रद्धा आहे असे अभारतीयांना वाटते. बौद्धिक व विज्ञानाच्या पातळीवर त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही; म्हणून त्या अंधश्रद्धा ठरत असल्या तरी, त्यांच्या पाठीमागे काही सामाजिक स्थिरतेचा विचार असण्याची शक्यता असते. काही अंधश्रद्धा समाजधारणेसाठी आवश्यकही ठरतात. केरसुणीला लक्ष्मी म्हणण्यामागे, मीठ हातावर देण्याची गरज पडली तर 'गोड' म्हणून ते हातावर देण्यामागे ज्या अंधश्रद्धा आहेत, त्यामागे किरकोळ वस्तूचे जीवनातील मोल व्यक्त होत असते. 'बैलपोळ्या'सारख्या सणामध्ये बैलाच्या श्रमांची आपल्या मनाला जाणीव व्हावी ही भावना असते. शेतकऱ्यांच्या जीवनात गाय-बैलांचे स्थान अनन्यसाधारण असते. पशु-पक्षी, भूमी, पावसाळा इत्यादींसंबंधीच्या जोपासलेल्या अंधश्रद्धा यांचा उगम असा जुन्या परंपरेशी आहे; आणि परंपरेशी अतूट नाते ठेवणारा मानवसमूह या श्रद्धा आज आधुनिक काळात 'अंध' वाटत असूनही सोडू शकत नाही. तसेच प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा बौद्धिक पातळीवर विचार करीत जगण्यापेक्षा श्रद्धेवर किंवा समजुतीवर विसंबून जगणे त्याला सोपे व सुलभ वाटते. आपल्या संरक्षणाची व भविष्यातील यशाची जबाबदारी कुठल्यातरी समजुतींच्या हाती सोपवून जगायला माणसाला आवडते; म्हणून तो देवाच्या मस्तकावरचे फूल उजव्या बाजूला झुकले तर यश असे सुलभीकरण करून ठेवतो. हे सुलभीकरण केवळ व्यक्तिगत पातळीवर न ठेवता तो त्याचे सामाजिकीकरणही करून टाकतो. गाढवाच्या ओरडण्याने एखाद्या व्यक्तीला भविष्यकाळातील वाईट घडण्याची सूचना मिळाली असेल. पण आपल्या या अनुभवाला व्यापक सामाजिक परिमाण देण्यासाठी तो 'दुर्योधनाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा अशीच गाढवे ओरडली होती' असे आधार शोधतो किंवा निर्माण करतो!
निसर्गातील पुष्कळशा अशा घटनांचा अर्थ लावावा तसा लावता येतो. वृक्षारोपणाचे कार्य करीत असताना पाऊस आला तर देवाला आपले काम आवडले असेच कुणाला वाटत राहील. पण अशा वेळी पाऊस पडला नाही तर देवाला आपले काम आवडले नाही असे काही त्याला वाटणार नाही.
अशा समजुती काही वेळा बदलण्याचे कार्यही बलवान माणसे करू शकतात, हे राजा हर्षवर्धनाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. शत्रूवर चाल करायला निघालेल्या या राजाच्या हातातील राजमुद्रांकित अंगठी रणांगणात, युद्धाच्या सुरुवातीलाच खाली पडते. सैन्याला तो अपशकुन वाटतो; पण राजा मात्र आपले मन सावरून, सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा अर्थ शुभशकुनाचा सांगतो. 'या सगळ्या भूमीवर केवळ माझीच राजमुद्रा उमटणार आहे असे या अंगठीने जमिनीवर पडून सांगितले आहे' हा अर्थ सांगून सैन्याच्या मनात आवेश निर्माण करतो आणि राजा युद्धात जय मिळवतो. एक प्रकारे दोन्हीही समज हे अंधश्रद्धेच्याच जातीचे नव्हेत काय? भूमीवर अंगठी पडणे व युद्धात यशापयश मिळणे यांचा संबंध बौद्धिक पातळीवरून लागू शकत नाही; पण याच अंधश्रद्धेचा विधायक अर्थ सैन्याच्या मनामध्ये ठसवून राजा सैन्यात उत्साह जैं सुखसमाधानासाठी अंधश्रद्धानिर्मूलनापेक्षा, अंधश्रद्धांचा विधायक उपयोग करणे कसे महत्त्वाचे ठरते, हे वरील उदाहरणांवरून समजून येते.
अशाच प्रकारच्या अंधश्रद्धेचा आधार अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी घेतलेला दिसतो. स्त्रीशिक्षण, स्त्रीसुधारणा, स्त्रीसमानता या तत्त्वांचा पाठपुरावा करणाऱ्या सुधारणावादी विचारवंतांसमोर टिकण्यासाठी त्यांनी 'शिकलेल्या स्त्रीला संसारसुख मिळत नाही' या अंधश्रद्धेचा प्रसार समाजात मुद्दाम केला. संवेदनशील वृत्तीचा समाज काही काळ त्याच्या आहारी गेला; पण खंबीर मनाचा समाज अनुभवाच्या आधारावर या अंधश्रद्धेवर मात करू शकला. तसेच त्या काळातील आणखी एक अंधश्रद्धा गमतीची आहे. 'इंग्रज हे रामाने आपल्याला सुधारण्यासाठी पाठविलेली वानरे आहेत' ही अंधश्रद्धाही अशीच काही काळ भोळ्या समाजमनाचा ताबा घेणारी होती! अंधश्रद्धा कशा रूढ होतात, रुळतात आणि समाजमनाचा पगडा घेतात हे वरील उदाहरणांवरून कळून येईल. कधी कधी जुन्या अंधश्रद्धा जात असतात; त्यांच्या जागी नव्या अंधश्रद्धा येत असतात. कधी जुन्या अंधश्रद्धा न जाताच, त्यांच्यात नव्या अंधश्रद्धांची भर पडत असते. समाजातून अंधश्रद्धा पूर्णाशाने कधीच जात नसतात. फक्त त्यांचे प्रमाण किती यावर त्या त्या समाजाची विज्ञाननिष्ठा तपासता येते.
अंधश्रद्धेचा उगम भयापोटी असतो म्हणून माणसाला संरक्षण, धन, धान्य, समृद्धी, कीर्ती, सत्ता, पुत्रपौत्र यांसारख्या सगळ्याच क्षेत्रांतील यशस्वितेसाठी अंधश्रद्धा उपयोगी पडते. तो जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत नाही, असा याचा अर्थ नाही; पण त्याच्या मनातील अपयशाचा संदेह दूर करून त्याच्या मनाला बळकट करण्यासाठी अंधश्रद्धा उपयोगी पडते. धर्मातील कर्मकांडे, व्रतवैकल्ये हे काहींच्या मते अंधश्रद्धेचेच वेगवेगळे प्रकार आहेत. धर्मातील कर्मकांडे, व्रताचरण, उपासतापास, नवससायास यांनी त्यांचे मन कणखर होते. देव आहे की नाही, देव-धर्म मानावेत की नाही हा स्वतंत्र विचारात घेण्यासारखा मुद्दा असला तरी, धर्मातील या अंधश्रद्धांमुळे मानवी समाजाला आपली संस्कृती उभी करता आली, राखता आली व हे संचित तो पुढील पिढीकडे देऊ शकला याबद्दल दुमत नाही. म्हणून देवाची भीतीही अंधश्रद्धेपोटी असू शकेल; पण त्यामुळे माणूस सन्मार्गावर चालत राहिला हे मान्य करायलाच पाहिजे..
श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संबंध मनाशी असतो. तर्कसंगत विचारसरणीला श्रद्धाही पटवून देता येत नाहीत, तिथे अंधश्रद्धेबद्दल न बोलणेच बरे. शिक्षण व चिकित्सक बुद्धी यांचा अभाव या श्रद्धा-अंधश्रद्धा रुजविण्याला व बळकट करण्याला मदत करतो, असा विचार सामान्यत: विज्ञानवादी मांडतात. 'भारतीय समाज मुळातच दैववादी, भाविक, देव-देव करणारा' म्हणून आंधळ्या समजुतींना खतपाणी घातले जाते आणि अंधश्रद्धांचे भलेमोठे पीक उगवते, असे म्हणणारा विचारवंतांचा गटही आहे. 'परमेश्वर हे अंधश्रद्धेचे परम मूळ स्थान.' त्यालाच रिटायर करण्याची गरज स्वत:ला कलावंत म्हणविणारे संवेदनशील वृत्तीचे काही कलावंत आग्रहाने पुनःपुन्हा प्रतिपादन करीत आहेत. अर्थातच, ज्या पाश्चात्त्य समाजाकडे व विचारसरणीकडे आदराने-विश्वासाने पाहणारा आपला विद्याविभूषित समाज असे आपल्या (भारतीय समाजातील) अंधश्रद्धेबद्दल पोटतिडिकीने बोलतो, त्याला हे कसे कळत नाही की, सुशिक्षित पाश्चात्त्य समाजातही अशाच स्वरूपाच्या विपुल अंधश्रद्धा पाण्यावरच्या शेवाळासारख्या पसरलेल्या आहेत? भारतातील गरिबीचा अंधश्रद्धेशी संबंध जुळविताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की भारताच्या तुलनेने पाश्चात्त्य विश्वात दारिद्र्य कमी दिसत असले तरी तिथेही भारताइतकाच अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज आहे.
याचा अर्थ, अंधश्रद्धेचा संबंध मनाशी आहे. शिक्षण किंवा गरिबी-श्रीमंती, सामाजिक न्यायान्याय यापेक्षाही त्या सगळ्यांमधून माणसाला हवी असलेली सुरक्षितता त्याचे मन सतत शोधत असते आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वांशिक, पिढ्यानपिढ्या ऐहिक-आध्यात्मिक अशा सर्व पातळ्यांवरची ही सुरक्षितता मिळविण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या मानसिक विकासात श्रद्धेचा बळकटपणे आधार मिळत असतो. दुसऱ्यांशी मानसिकभावनिक पातळीवर संपर्क साधण्याचे मार्ग त्याला श्रद्धेच्या माध्यमातून सापडतात. याला विज्ञानाचा आधार जेसी बेरिंग या अकोन्सा विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धान्ताने मिळतो. शरीरातील मानसिक-भावनिक पातळीवरचा प्रवास अखंडपणे सुरू असतो. माणसाच्या जन्मभर जपलेल्या आशाआकांक्षा पुढच्या जन्मातही कायम असतात. त्यांच्या प्रवासाचा स्पष्टपणे आलेख मात्र काढता येत नाही. अंधश्रद्धांचे मूळ माणसाच्या अशा गतजन्मातील मूलभूत जडणघडणीतच असल्याने व त्यामुळे त्याच्या जीवनाला अर्थ व दिशा मिळत असल्याने त्याच्या निर्मूलनाचे प्रयत्न कधीच सफल होणार नाहीत; आणि खरे पाहता, त्याची गरजही नाही. महात्मा गांधीजींसारखी संतमंडळी ज्याला 'आतला आवाज' म्हणतात, तुकारामांसारखी संतमंडळी आपल्या मनाला कौल लावून वागतात, त्यांचा या अंधश्रद्धेला भक्कम पाठिंबा असतो. मात्र ज्यांची ही मानसिक शक्ती दुबळी आहे व ज्यांच्याजवळ 'आपल्या मनाचा हुंकार' ऐकण्याचे सामर्थ्य नाही, त्यांची दिशाभूल होत असते. बौद्धिक ‘ऐकीव' शोधता येतो, पण मानसिक ‘ऐकीव' काढणे कठीण असते. मनाच्या विकासाच्या दिशा व अभ्यासपद्धती यांचा बौद्धिक विकासाप्रमाणेच रेखीव आराखडा तयार करून शिक्षण दिले गेले तर कदाचित मनाची ही 'भविष्य' जाणण्याची शक्ती प्रत्येकास मार्गदर्शन करू शकेल; म्हणून श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा जीवनघडणीमध्ये त्यांना नाकारून चालत नाही. पण त्यांच्या आहारी जाऊन त्यांच्या हातात संपूर्णपणे आपल्या जीवनाचे सूत्र किंवा सुकाणू देणेही उचित नाही. या मानसिक आकलनाचा वापर तारतम्यानेच करायला पाहिजे.
अंधश्रद्धा म्हटले तर सर्वच क्षेत्रांत असते. विशेषतः धर्म व देव यांच्या संदर्भातील श्रद्धा व अंधश्रद्धा ओळखणे कठीण झालेले आहे. निसर्गातील व मनाच्या संदर्भातील अनेक गोष्टी माणसाला पुरेशा आकलन झालेल्या नाहीत; म्हणूनच देव-धर्म व त्यांच्या आधारावर आलेले संस्कृतीमधील आचार-विचार पालन करण्याकडे त्याचा कल असतो. उदाहरणार्थ- आर्य हे प्रकाशपूजक असणे स्वाभाविक आहे. उत्तर ध्रुवासारख्या अतिशीतल प्रदेशातील त्यांच्या वास्तव्यामध्ये अग्नी, सूर्य, प्रकाश, दीप इत्यादींचे महत्त्व असणे स्वाभाविक आहे. हीच प्रकाशपूजनाची प्रथा त्यांच्या सणवारांत आली. त्यातूनच 'औक्षण करणे' याचे शुभसूचकत्व सिद्ध झाले. वर्षानुवर्षे भारतीय मानवी मनावर असलेला त्याचा प्रभाव बौद्धिक दृष्टीने उलगडून दाखविता येत नसला तरी त्यामुळे त्याच्या मनाला मिळणारे श्रद्धेय 'अंध' ठरत नाही.
भारतामध्ये तर अनेक संस्कृतींचा समन्वय साधलेला दिसून येतो. आर्य, असुर, देवी इत्यादींच्या संस्कृतींचे एकीकरण होऊन भारतीय समाजाच्या आचारांची व विचारांची वीण तयार झालेली आहे; म्हणूनच देवींच्या पूजनाचे महत्त्व साडेतीन शक्तिपीठांमध्ये व नवरात्रांमध्ये, असुरांच्या संस्कृतीचे महत्त्व अमावास्येला साजऱ्या जैं मानसिक पातळीवर समाज मजबूत बनत असतो. ही व्रते व उत्सव साजरे करण्यामागे आपले जीवन समृद्ध व सुरक्षित व्हावे ही दृष्टी असते. यांपैकी ज्या श्रद्धांमुळे कुणावर अन्याय होत असेल, कुणाची हिंसा होत असेल, कुणाला अमानुषता सहन करावी लागत असेल, त्या श्रद्धांना बंधन घालणे किंवा अटकाव करणे आवश्यक असते; पण सर्वच श्रद्धांची बीजे मिळत नाहीत म्हणून त्या उपटून टाकणे योग्य नाही.
आज राजकीय क्षेत्रात निवडणुकीतील यशासाठी उमेदवार आपल्या श्रद्धास्थानांना कौल लावतात; विशिष्ट खुणेची चिन्हे प्रचारासाठी मागून घेतात. चित्र व नाटक क्षेत्रातील दिग्दर्शकही एका ठराविक अक्षरांनी सुरुवात असलेली नावे निवडतात. राम गणेश गडकरींसारखे नाटककारही पाच अक्षरांच्या नावाची शीर्षके आपल्या नाटकांसाठी निवडतात. जागतिक युद्धामध्येही, गल्फ युद्धातही '७८६' या नंबराचे दोन्ही पक्षांचे अन्वयार्थ अंधश्रद्धेची प्रचीती सांगणारेच आहेत.
एखाद्या दिवशी अचानक धनलाभ झाला, काही चांगली घटना घडली तर आपण म्हणतो की, 'आज उठल्या उठल्या कुणाचे तोंड पाहिले होते?' रोज त्याच माणसाचे तोंड पाहिले तरी रोज रोज तसाच लाभदायक पातळीवरचा प्रवास अखंडपणे सुरू असतो. माणसाच्या जन्मभर जपलेल्या आशाआकांक्षा पुढच्या जन्मातही कायम असतात. त्यांच्या प्रवासाचा स्पष्टपणे आलेख मात्र काढता येत नाही. अंधश्रद्धांचे मूळ माणसाच्या अशा गतजन्मातील मूलभूत जडणघडणीतच असल्याने व त्यामुळे त्याच्या जीवनाला अर्थ व दिशा मिळत असल्याने त्याच्या निर्मूलनाचे प्रयत्न कधीच सफल होणार नाहीत; आणि खरे पाहता, त्याची गरजही नाही. महात्मा गांधीजींसारखी संतमंडळी ज्याला 'आतला आवाज' म्हणतात, तुकारामांसारखी संतमंडळी आपल्या मनाला कौल लावून वागतात, त्यांचा या अंधश्रद्धेला भक्कम पाठिंबा असतो. मात्र ज्यांची ही मानसिक शक्ती दुबळी आहे व ज्यांच्याजवळ 'आपल्या मनाचा हुंकार' ऐकण्याचे सामर्थ्य नाही, त्यांची दिशाभूल होत असते. बौद्धिक ‘ऐकीव' शोधता येतो, पण मानसिक ‘ऐकीव' काढणे कठीण असते. मनाच्या विकासाच्या दिशा व अभ्यासपद्धती यांचा बौद्धिक विकासाप्रमाणेच रेखीव आराखडा तयार करून शिक्षण दिले गेले तर कदाचित मनाची ही 'भविष्य' जाणण्याची शक्ती प्रत्येकास मार्गदर्शन करू शकेल; म्हणून श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा जीवनघडणीमध्ये त्यांना नाकारून चालत नाही. पण त्यांच्या आहारी जाऊन त्यांच्या हातात संपूर्णपणे आपल्या जीवनाचे सूत्र किंवा सुकाणू देणेही उचित नाही. या मानसिक आकलनाचा वापर तारतम्यानेच . करायला पाहिजे.
अंधश्रद्धा म्हटले तर सर्वच क्षेत्रांत असते. विशेषतः धर्म व देव यांच्या संदर्भातील श्रद्धा व अंधश्रद्धा ओळखणे कठीण झालेले आहे. निसर्गातील व मनाच्या संदर्भातील अनेक गोष्टी माणसाला पुरेशा आकलन झालेल्या नाहीत; म्हणूनच देव-धर्म व त्यांच्या आधारावर आलेले संस्कृतीमधील आचार-विचार पालन करण्याकडे त्याचा कल असतो. उदाहरणार्थ- आर्य हे प्रकाशपूजक असणे स्वाभाविक आहे. उत्तर ध्रुवासारख्या अतिशीतल प्रदेशातील त्यांच्या वास्तव्यामध्ये अग्नी, सूर्य, प्रकाश, दीप इत्यादींचे महत्त्व असणे स्वाभाविक आहे. हीच प्रकाशपूजनाची प्रथा त्यांच्या सणवारांत आली. त्यातूनच 'औक्षण करणे' याचे शुभसूचकत्व सिद्ध झाले. वर्षानुवर्षे भारतीय मानवी मनावर असलेला त्याचा प्रभाव बौद्धिक दृष्टीने उलगडून दाखविता येत नसला तरी त्यामुळे त्याच्या मनाला मिळणारे श्रद्धेय ‘अंध' ठरत नाही.
भारतामध्ये तर अनेक संस्कृतींचा समन्वय साधलेला दिसून येतो. आर्य, असुर, देवी इत्यादींच्या संस्कृतींचे एकीकरण होऊन भारतीय समाजाच्या आचारांची व विचारांची वीण तयार झालेली आहे; म्हणूनच देवींच्या पूजनाचे महत्त्व साडेतीन शक्तिपीठांमध्ये व नवरात्रांमध्ये, असुरांच्या संस्कृतीचे महत्त्व अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या सण-व्रतांमध्ये व आर्यांचे महत्त्व प्रकाशपूजनामध्ये एकत्रित आले आहे. या सर्व उत्सवांतील प्रथांमधून मानसिक पातळीवर समाज मजबूत बनत असतो. ही व्रते व उत्सव साजरे करण्यामागे आपले जीवन समृद्ध व सुरक्षित व्हावे ही दृष्टी असते. यांपैकी ज्या श्रद्धांमुळे कुणावर अन्याय होत असेल, कुणाची हिंसा होत असेल, कुणाला अमानुषता सहन करावी लागत असेल, त्या श्रद्धांना बंधन घालणे किंवा अटकाव करणे आवश्यक असते; पण सर्वच श्रद्धांची बीजे मिळत नाहीत म्हणून त्या उपटून टाकणे योग्य नाही.
आज राजकीय क्षेत्रात निवडणुकीतील यशासाठी उमेदवार आपल्या श्रद्धास्थानांना कौल लावतात; विशिष्ट खुणेची चिन्हे प्रचारासाठी मागून घेतात. चित्र व नाटक क्षेत्रातील दिग्दर्शकही एका ठराविक अक्षरांनी सुरुवात असलेली नावे निवडतात. राम गणेश गडकरींसारखे नाटककारही पाच अक्षरांच्या नावाची शीर्षके आपल्या नाटकांसाठी निवडतात. जागतिक युद्धामध्येही, गल्फ युद्धातही '७८६' या नंबराचे दोन्ही पक्षांचे अन्वयार्थ अंधश्रद्धेची प्रचीती सांगणारेच आहेत.
एखाद्या दिवशी अचानक धनलाभ झाला, काही चांगली घटना घडली तर आपण म्हणतो की, 'आज उठल्या उठल्या कुणाचे तोंड पाहिले होते?' रोज त्याच माणसाचे तोंड पाहिले तरी रोज रोज तसाच लाभदायक अनुभव येईल असेही नाही; आणि माणूस तशी अपेक्षाही सतत करतोच असे नाही. भावनेशी बुद्धीची सांगड घालण्याची सवय असलेला माणूस अंधश्रद्धेतील तात्कालिकता मान्यही करीत असतो; पण कोणत्याही कार्यामध्ये पुरेसे प्रयत्न केले म्हणजे हमखास यश मिळतेच असे बळ देणारा कणखरपणाही त्याच्याजवळ नसतो. म्हणून प्रयत्नाला दैवाची साथ तो अंधश्रद्धेच्या मार्गाने शोधत असतो.
अशा गोष्टींमध्ये कधी कधी योगायोगही असू शकतो. तरीही विशिष्ट पोशाख केला की यश मिळते, ठराविक रंगाची पर्स यशदायी ठरते; एवढेच कशाला घरातील कामे करण्यासाठी मोलकरीण ठेवतानाही तिचा पायगुण पाहण्याकडे काहींचा कल असतो. घरात येणाऱ्या नववधूचा पायगुण सासरी तर हमखास पाहिला जातो. व्यवहारातही कधी कधी अत्यंत सामान्य असलेल्या माणसांचा पायगुण धंद्याला बरकत आणतो, असे काहींना वाटते. आज मानसशास्त्राचा जेवढा अभ्यास झालेला आहे, तेवढाही नसलेल्या आदिमानवाच्या काळात तर 'हे मनाने चाललेले खेळ' त्याला आधार देणारे ठरत होते. मोहेंजोदडोसारख्या ठिकाणी झालेल्या उत्खननातही अंधश्रद्धेचे पुरावे मिळाले आहेत. काही मणी, काही धातूंच्या व अन्य वस्तू यांच्यामुळे बालकांचे संरक्षण होते, अशा श्रद्धा त्यातून जोपासलेल्या जाणवतात. ऋग्वेदकालीन सुसंस्कृत समाजही यांसारख्या श्रद्धा-अंधश्रद्धांच्या जाळ्यातून मुक्त नव्हता. दुष्ट शक्तींचा व अकल्पित संकटांचा नाश जादूटोणा, मंत्रतंत्र, गंडेदोरे इत्यादींपासून होतो, अशा त्यांच्याही समजुती असलेल्या दिसून येतात.
एखाद्या गोष्टीचा पुनःपुन्हा तसाच अनुभव आल्याने अंधश्रद्धेची वाटचाल होऊ लागते. कधी कधी असे अनुभव एकापेक्षा अधिक व्यक्तींनाही येतात. अशा वेळी त्यांची बौद्धिक मीमांसा करता येत नसूनही 'अनुभवाचा पाठिंबा' असल्याने त्या समजुती रुजल्या जातात. त्याचा संबंध धार्मिक क्षेत्रात तांत्रिकतेशी जोडला जातो. उजव्या हातानेच आचमन करायचे, प्रदक्षिणा ठराविक मार्गानेच व ठराविक देवतांना, ठराविक संख्येतच घातली गेली पाहिजे. मंत्र, पुष्प, नैवेद्य, वाद्य, आरती या सगळ्या बाबतींत दैवतांच्या पूजनात असलेली विविधता सकारण असेलही; पण आज त्याची बौद्धिक कारणमीमांसा आपल्याला माहिती नाही; म्हणून त्यांचा समावेश अंधश्रद्धेतच केला जातो. पण अशा अनेक धार्मिक लोकाचारांची मुळे थेट आदिमानवाच्या कालखंडातील परिस्थितीशी व त्या माणसाच्या जगण्याशी जुळलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिबंध, लोकसाहित्य यांच्या अभ्यासाने यावर काही प्रमाणात प्रकाश पडत आहे. एखाद्या कार्तिकेयासारख्या दैवताच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही; पण ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात असली तरी दक्षिणेकडे मात्र हा नियम सांगितलेला नाही. त्यावरून त्या त्या संस्कृतीतील त्या दैवतांचा संबंधही अशा अंधश्रद्धेशी निगडित आहे. हे दडपण इतके जबरदस्त आहे की, त्याविरोधी वर्तन करण्याचे धैर्य सर्वसामान्य माणूस क्वचितच करतो. उदाहरणार्थ- दलितांना मंदिरप्रवेश खुला होऊनही मंदिरात प्रवेश करण्याला त्यांची मानसिकता तयार व्हायला काही पिढ्या जाव्या लागल्या.
सामान्यतः अंधश्रद्धा तर्काच्या, बौद्धिकतेच्या पलीकडची असते, असे म्हटले जाते; पण सगळ्याच अंधश्रद्धांबद्दल हे खरे आहे, असे जाणवत नाही. ज्या समाजात, ज्या कालखंडात व ज्या प्रदेशात त्या निर्माण झाल्या, त्यांचे संशोधन केले तर कदाचित काही अंधश्रद्धेचे हेतू कळू शकतील. अंधश्रद्धेची वाढ पुष्कळदा स्वसंरक्षणापेक्षा दुसऱ्याच्या नाशासाठी 'ब्लॅक मॅजिक' योजून करण्याकडे केली गेली; त्यामुळे दुसऱ्याच्या वाइटासाठी केल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेचा प्रभाव शत्रूला घातक वाटू लागला. प्रत्यक्ष तशा जारणमारणाचा प्रयोग न करताही माणसे त्याच्या कल्पनेनेही घाबरू लागली; कारण श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संबंध मनाशी व मनाच्या शक्तींशी असतो. त्यावर अंधश्रद्धेचा प्रभाव असतो. या मानसिक शक्तीला जेव्हा व जितक्या प्रमाणात बुद्धीचे साहचर्य मिळेल, तेव्हा एक तर अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होईल किंवा अंधश्रद्धेचा फायदा करून घेऊन आपले विविध क्षेत्रांतील यश निश्चित करता येईल. शिक्षण व विज्ञाननिष्ठा या दोन्हींमुळे समाजमनावरचा अंधश्रद्धांचा पगडा कमी व्हायला कदाचित मदत होईलही; पण अंधश्रद्धेचा पूर्णपणे नायनाट कधीच होणार नाही. अंधश्रद्धानिर्मूलनाचे प्रयत्न एका मर्यादेपर्यंतच यश मिळवितात ते यामुळेच. मुख्य म्हणजे ज्या अंधश्रद्धा समाजाला व व्यक्तीला त्रासदायक नाहीत, उलट त्यामुळे त्यांचे मन बळकट करण्याचे कार्य होते, त्यांचे निर्मूलन करणे हा वेडेपणा आहे. जीवनातील सगाच्या सगदा घटनांचा-गोष्टींचा उलगडा केवळ बौद्धिक पातळीवर अजूनही मानवाला करता आलेला नाही. विश्वात, निसर्गात व मानवी मनात अशा अनेक जागा त्याच्या बुद्धीला-मनाला अगम्य आहेत. मनाच्या शक्तीची त्याला अजूनही पुरेशी जाणीव आलेली नाही. या अज्ञात शक्तींचा शोध त्याला अंधश्रद्धेतूनच होऊ शकेल. 'माझ्या बुद्धीला पटेल, त्याचाच मी स्वीकार करीन', अशी बुद्धिवादी माणसे अंधश्रद्धेचा धिक्कार करीत असली तरी आपल्या बौद्धिक शक्तीच्या समर्थतेबद्दल आज मानवच साशंक झालेला आहे. या अज्ञात विश्वाबद्दलची माणसाची धारणा त्याला अंधश्रद्धेचा आधार शोधायला कारणीभूत ठरणारी आहे.
सारांश
आपण बुद्धीपेक्षा मनाच्या समाधानावर सुखी होत असतो. या मनाच्या वाटण्याचा संबंध श्रद्धेशी असतो. ज्या श्रद्धा बौद्धिक पातळीवर पटवून घेता येत नाहीत, त्यांना आपण अंधश्रद्धा म्हणतो. जीवनात श्रद्धा हवी, पण अंधश्रद्धा नको, ही विज्ञाननिष्ठ विचारवंतांची भूमिका असते. व्यक्ती पूर्णपणे बुद्धिवादाचे अनुसरण करू शकेल; पण असा पूर्ण बुद्धिवादी समाज जगाच्या पाठीवर कधीही नव्हता, नाही व नसतो; कारण अंधश्रद्धा व श्रद्धा यांमधील फरक, विज्ञाननिष्ठा वाढल्यानेही कमी होणार नाही. लोकसाहित्याच्या अभ्यासाने हे गूढ कदाचित उकलू शकेल.
श्रद्धेमध्ये संरक्षण शोधण्याची वृत्ती असते; इतर प्राण्यांबद्दलची कृतज्ञता दाखविण्याची जतन केलेली रूढी असते. श्रद्धेची किंवा अंधश्रद्धेची विनाशकता दूर करून तिची विधायकता जपणे मानवाला जमले पाहिजे. 'मनाचा ऐकीव' काढता आला तर अंधश्रद्धेला श्रद्धेपासून वेगळे काढता येईल. दोन्हींचा संबंध जन्मांतरीच्या मानवी मनाच्या प्रवासाशी असतो.
COMMENTS