Monday, 10 February 2020

परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध Pariksha Radda Zali Tar Marathi Nibandh

Pariksha Radda Zali Tar Marathi Nibandh : Today, we are providing परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध  For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Pariksha Radda Zali Tar Marathi Nibandh to complete their homework. 

परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध Pariksha Radda Zali Tar Marathi Nibandh

"सांग सांग भोलानाथ
सरकारी आदेश येऊन
परीक्षा रद्द होतील का?"
काय मजा असेल ना, परीक्षाच नसतील तर!
परीक्षा नाही म्हणजे अभ्यास नाही, मग शाळेत जाऊन करायचं तरी काय? फक्त दंगा, मस्ती, गप्पा, चेष्टा-मस्करी?
नको रे बाबा, परीक्षा नसेल तर मग आपण पुढच्या वर्गात जाणार कसे? आपल्याला लिहायला-वाचायला येतं की नाही, हे आपल्या शिक्षकांना कळणार तरी कसं?
Read also : माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
परीक्षा नाही म्हणजे स्पर्धा नाही, चढाओढ नाही, म्हणून पहिला नंबर काढण्याची जिद्द नाही.
सरकारी आदेशानुसार इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा नाही, हे कळल्यापासून विद्यार्थी अभ्यासच करेनासे झाले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी शाळेत उपस्थितही नसतात म्हणे!
काही विद्यार्थ्यांना आपले नावही नीट लिहिता-वाचता येत नाही. परीक्षा हे मूल्यमापनाचे साधन आहे. वर्षभर आपण काय शिकलो, हे दाखवून देण्याची उत्तम संधी परीक्षेद्वारेच आपल्याला मिळते.
परीक्षेच्या धाकामुळे का होईना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊ शकते. परीक्षेतील गुणांवरून आपल्याला त्या-त्या विषयांतील ज्ञानाची कल्पना येते.
Read also : जर परीक्षा नसत्या तर मराठी निबंध
आपण अभ्यास केला नाही तर परीक्षेत नापास होऊ, आपले मित्र-मैत्रिणी पुढच्या वर्गात जातील, आपण मात्र मागे पडू या भीतीने तरी अभ्यास करतील; पण कदाचित असंही होऊ शकेल की वर्षभर अभ्यास न करणारी मुले फक्त परीक्षेला उपस्थित राहून पास होण्यासाठी कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करतील.
विद्यार्थी ज्ञानार्थी न होता परीक्षार्थी होतील.
परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी वाटणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ कशी होईल? ते आपली गुणवत्ता सिद्ध तरी कशी करतील?
Read also : वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध
परीक्षा रद्द झाल्यावर फक्त विद्यार्थ्यांवरच परिणाम होईल असं नाही, तर शिक्षकही सुस्त होतील. पेपर्स तपासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे त्यांचे हत्यार बोथट होईल. विद्यार्थ्यांना चुका कळणार नाहीत. निबंध, गृहपाठ, प्रयोगवह्या, चाचणी पेपर्स, सत्र परीक्षा पेपर्स तपासण्याचे त्यांचे काम टळेल; पण कुठे तरी मनात अपराध्याची भावना जागृत होईल. “मी एक शिक्षक आहे. समाजाला उत्तम नागरिक घडवून देण्याची माझी जबाबदारी आहे. मी माझे नैतिक कर्तव्य नीट पार पाडतो का?" असा प्रश्न त्यांना पडेल.
एखादया व्यक्तीला नोकरीवर ठेवून घेताना त्या व्यक्तीची पात्रता कशाच्या आधारावर ठरवता येईल?
म्हणूनच आपल्याला 'स्व'ची ओळख करून घ्यायची असेल तर परीक्षा ही हवीच!
अहो, सोन्यासारख्या अनमोल धातूलाही 'अग्निपरीक्षा द्यावी लागतेच ना!

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: