Wednesday, 14 August 2019

मला पंख फुटले तर निबंध माहिती - Mala Pankh Futle Tar Essay In Marathi

Today, we are publishing मला पंख फुटले तर निबंध माहिती for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Mala Pankh Futle Tar Essay In Marathi) in completing their homework and in competition.

मला पंख फुटले तर निबंध माहिती - Mala Pankh Futle Tar Essay In Marathi

परीक्षा संपून सुटी लागली, की लांबच्या प्रवासाचे बेत आखायला सुरुवात होते. कुठल्या ठिकाणी, कुठल्या दिवशी, कुठल्या गाडीने जायचे, अशी चर्चा मोठ्याने उत्साहाने घरात सुरू होते. मनात आलं, एवढं ठरवण्यापेक्षा मला पंख फुटले तर? मला पक्ष्यांसारखं उडता आलं तर? व्वा! काय धम्माल येईल. किती मज्जा येईल, पंख फुटले तर!

पंख पसरून मी तर लगेच आकाशात उंच उंच झेप घेईन. माझं घर, माझा गाव, माझा देश आकाशातनं कसा दिसतो, हे पाहीन. नद्या, डोंगर, तलावांचा अभ्यास करीन. त्याप्रमाणे योजना व आराखडे आखीन. पाणी कुठे, कसं अडवायचं, कुठे धरणं बांधायची, कालवे खणायचे, पाझर तलाव बांधायचे याचा विचार करून ते नकाशे तज्ज्ञांना दाखवून लगेच कामाला लागीन. मग सर्व गावांना पाणी पुरेल, वीज तयार होईल. दुष्काळ पडणारच नाही. रस्ते, पूल, रेल्वे बांधणीसाठी सोप्यात सोपा मार्ग मला आकाशातूनच दिसेल. मी कॅमेरा घेऊन जाईन. घाटमाथ्यांचे फोटो काढीन. जाता जाता पाण्याने भरलेल्या ढगांना शोधून काढून भारताकडे वळवून आणीन. वेधशाळेचे हवामानाच्या अंदाजाचे अचूक काम करीन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या देशासाठी गुप्तहेराचे काम करीन, शत्रूच्या गोटात उडत उडत शिरेन व त्यांच्या योजना, बातम्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना कळवीन. एक सच्चा देशभक्त बनून शत्रूच्या हालचाली कळविणाऱ्या कुरियरचे काम करीन. पंख असल्यामुळे मला कधी पेट्रोल, डिझेल, गॅसची गरज लागणार नाही. इंधनाचा खर्चही वाचेल. कुठेही जायला तिकीट काढावे लागणार नाही की, पासपोर्टही लागणार नाही. भूक लागली की, जंगलात शिरेन, फलातले मध, फळं पोटभर खाईन. तळ्यावर पाणी पिईन. झाडांच्या दाट सावलीत, हिरव्यागार पानांमध्ये विसावा घेईन.

किती स्वतंत्र आणि आनंदी जीवन होईल माझं. गर्दी नाही, प्रदूषण नाही, घरादाराची चिंता नाही, नोकरी-व्यवसाय-शाळेचा ताण नाही. मला पंख फुटल्यावर मी खूप खूप देशही पाहून येईन. पॅरिसचा झुलता मनोरा, लंडन ब्रीज, चायना वॉल, अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता, स्वित्झर्लंडमधला बर्फ, इजिप्तची नाईल नदी, एस्किमो लोकांचं इग्लू, अमेझॉनमधले अनाकोंडा, आफ्रिकेतले वाघ, सिंह, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया... सारं पर्यटन करायला कुठल्याच टूरिस्ट कंपनीची गरज मला पडणार नाही. पर्यटन करता करता खूप काही नव्या गोष्टी शिकेन. भारतीय संस्कार सर्वांना शिकवेन. देशोदेशीची वाचनालये शोधीन. ग्रंथ पाहीन. जेवढं वाचता येईल तेवढं वाचेन, ज्ञान मिळवीन. लोकांच्या उपयोगी पडेल, ते मनात साठवून इकडे आणीन. पण हे सारं मला पंख फुटले, तरच शक्य होईल.

देवाला आता एकच मागणं मागेन की, देवा एकदा कधीतरी मला पंख देणार असशील, तर गरुडाचे शक्तिशाली,भक्कम पंख मला दे. कोळी, पाकोळ्या, भुंग्यांचे नाजूक-साजूक पंख मला नकोत. फुलपाखरासारखे रंगीबेरंगी ठिपक्यांचेही नकोत. कारण मला नुसतं सौंदर्य नकोय, पंखांची भव्य विशालताही हवी आहे. क्षितिजाला शिवून यायची ताकत मला दे.
मला वाटते पंख फुटावे
अफाट गगनी हिंडावे 
पंख पसरूनी बाहूंमध्ये 
नक्षत्रांना बिलगावे

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: