Monday, 10 February 2020

माझे आजोबा मराठी निबंध Essay on My Grandfather in Marathi

Essay on My Grandfather in Marathi : Today, we are providing माझे आजोबा मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on My Grandfather in Marathi to complete their homework. 

माझे आजोबा मराठी निबंध Essay on My Grandfather in Marathi

आज आमच्या घरात तुम्हाला सनईचे मंजूळ स्वर ऐकू येताहेत. हो ना? अहो, आज माझ्या लाडक्या आजोबांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्यामुळे आमचं घर आमच्या नातेवाइकांनी फुलून गेलंय जणू! आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठीचं हे संमेलन.
माझे आजोबा म्हणजे राजाराम कृष्णाजी साळवी. त्यांना मी बाबाजी म्हणतो. खरं तर वाढदिवस साजरा करायला त्यांना आवडत नाही. ते म्हणतात, "आयुष्यातील एक वर्ष कमी झाल्याचं दुःख करायचं की आनंद साजरा करायचा?"
Read also : माझे बाबा निबंध मराठी
माझे दोन काका, काकू, माझी तीन चुलत भावंडे आणि आम्ही चौघेजण, सगळे एकत्रच राहतो. आज विभक्त कुटुंबपद्धती सर्वत्र दिसत असली, तरी एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे बाबाजींनी सर्वांना पटवून दिले आहेत. त्यामुळे घरात कधीच कुरबुर होत नाही. माझे आजोबा उंच, काळे-सावळे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणारे, हसतमुख असे आहेत. सतत काही ना काही करत राहणे हा त्यांचा छंद.
ही घरासमोर विटांचे कुंपण घालून लावलेली फुलबाग तुम्ही पाहताय ना, ती खास आजीच्या देवघरातील देवांसाठी रोज ताजी फुले मिळावीत म्हणून बाबाजींनी केलीय बरं!
Read also : माझी आई निबंध मराठी
माझे आजोबा फारसे शिकलेले नाहीत; पण शिक्षणाचं महत्त्व ते जाणतात. अगदी लहान वयात त्यांचे आई-बाबा त्यांना पोरकं करून देवाघरी गेले. मग त्यांचा सांभाळ त्यांच्या दूरच्या नातेवाइकांनी केला. तेव्हा लहानवयापासूनच त्यांना कष्टाची सवय लागली. त्यांचे हात जेव्हा मी हातात घेतो तेव्हा मला जाणवतं, किती खरखरीत हात आहेत हे! या हातांनी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी खूप सोसलंय. त्याच खरखरीत हातांनी माझ्या तोंडावरून ते जेव्हा स्पर्श करतात तेव्हा खूप छान वाटतं.
माझे बाबा, काका सर्वजण उच्चशिक्षित आहेत. स्वतः सोसून बाबाजींनी मुलांना खूप काही दिलंय. "मी उच्च शिक्षणासाठी परदेशीच जाणार," हे माझं स्वप्न ऐकल्यापासून तर ते खूपच आनंदात आहेत.
माझी आई, काकू या त्यांच्या सुना असल्या तरी ते आपल्या मुलींप्रमाणेच त्यांना वागवतात आणि त्याही त्यांना आपल्या पित्यासमान प्रेम देतात.
बाबाजी आज खूप आनंदात आहेत. कारण यादिवशी सर्व कुटुंब, परिवार त्यांच्यासोबत आहे.
Read also : माझी आजी निबंध मराठी मधून
बाबाजी थकलेले दिसत असले तरी त्यांचा घरात खूप दबदबा असतो. बाबाजींचा सल्ला घेऊनच घरातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आपले मत मांडताना इतरांच्या मताचाही ते मान राखतात. घरातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. आईला, काकूला घरात छोट्या-मोठ्या कामात मदत करताना त्यांना यात कुठलाही कमीपणा वाटत नाही. उलट ते आपलं कर्तव्यच समजतात. वय झाल्यामुळे त्यांना आम्ही एकटं कुठं जाऊ देत नाही; पण माझ्या बाबांबरोबर बाजारहाट करायला त्यांना आवडतं.
आम्हाला गोष्टी सांगणे, आमच्याशी गप्पा मारणे, आमच्या शाळेतील गमतीजमती ऐकणे हा तर त्यांचा आवडता छंद.
रोज संध्याकाळी कॉलनीतल्या सगळ्या आजोबांबरोबर बागेच्या कट्ट्यावर चालू घडामोडींवर चर्चा करत, हास्यविनोद करत आपली संध्याकाळ ते छान मजेत घालवतात. हां; पण संध्याकाळी आजीला देवळात नेऊन सोडण्याचे काम ते न चुकता करतात बरं का!
माझी आई, काकू माझ्या आजी-आजोबांची खूप काळजी घेतात.
Read also : मी गणपती बाप्पा बोलतोय निबंध मराठी
बाबाजींचा प्रेमाचा स्पर्श मला हवाहवासा वाटतो. एखादी गोष्ट समजून सांगण्याची त्यांची पद्धत खूप चांगली आहे. मुख्य म्हणजे आमच्यासाठी त्यांच्याजवळ भरपूर वेळ आहे. शाळेतून घरी आल्यावर गमतीजमती ऐकायला आमचे आजीआजोबा एका पायावर तयार असतात.
आजोबांकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. रोज रात्री झोपताना आपल्या अनुभवांच्या पोतडीतून वेगवेगळ्या गोष्टी ते बाहेर काढतात. त्या ऐकताना आम्ही कधी निद्राधीन होतो, हे कळतच नाही.
आजी जेव्हा ज्ञानेश्वरीचे पारायण करते तेव्हा मोठ्या श्रद्धेने बाबाजी ते श्रवण करतात. बाबाजींना दूरदर्शनपेक्षा आकाशवाणीवरील गाणी ऐकायला आवडतात.
आज बाबाजी उत्सवमूर्ती आहेत. गुरुजींनी त्यांच्यासाठी मंत्रपठणाद्वारे दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तर देवाजवळ मागितलंच आहे. मीसुद्धा देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की,
जीवेत् शरदः शतम्।

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: