Tuesday, 20 October 2020

Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी नमुना for Students

Prasang lekhan in Marathi Language: In this article "प्रसंग लेखन मराठी नमुना", "Prasang lekhan Marathi Namuna" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी नमुना for Students

आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे चित्र वाचणाऱ्यांसमोर हुबेहूबपणे शब्दांत रेखाटणे. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय वर्णन रसपूर्ण कसे होईल? 

अशा निबंधात प्रसंगाचे केवळ बाह्यवर्णन करणे अपेक्षित नसते तर त्या प्रसंगातून बघणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कोणते विचार आले याचेही वर्णन करणे अपेक्षित आहे. 

अर्थात त्या विशिष्ट प्रसंगाचा बघणाऱ्याच्या मनावर नेमका काय परिणाम झाला याचा समावेश निबंधात केल्याशिवाय निबंध वाचनीय होऊ शकत नाही. 

निबंध वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा करण्याचे सामर्थ्य अशा लेखनात हवे. उदा. तुमचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे असे समजून निबंध लिहा.

अशी झाली माझी फजिती!

तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवशी शाळेत लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम ठरला होता. एक ऑगस्ट! आम्ही बऱ्याच मुलांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमच्या वर्गशिक्षकांकडे नावे दिली होती, रुबाब दाखवायचा म्हणून! खरं तर मी पहिल्यांदाच अशा स्पर्धेत उतरणार होतो. मित्रांनी आग्रह केला म्हणून घेतला भाग! 

आदल्या रात्री झोपच लागली नाही. माझी आठवडाभर भाषणाची तयारी जोरात चालू होती. संध्याकाळी मैदानावर खेळायला मी जात नव्हतो, का? तर पाठांतर! आठवडाभरात इतर सर्वच गोष्टी म्हणजे घरचा अभ्यासही टाळत होतो, का? तर भाषण करताना चुकू नये म्हणून!

चला, सकाळी उठल्यावर आईला एकदा भाषण म्हणून दाखवले की झाले! किती आश्चर्यचकित होईल ती! गेला आठवडाभर मी सतत (अभ्यासाचं सोंग घेऊन) भाषण पाठ करत होतो, हे तिला काय ठाऊक? तिला सुखद धक्का दयायचा होता ना मला!

रात्र तर मी तळमळूनच काढली. कधी एकदा सकाळ होतेय, असं झालं होतं. सकाळी उठल्या-उठल्या आईला मी म्हटलं, "आई, तुला एक गंमत म्हणून दाखवायची आहे, बस ना इथे." आईची सकाळ तर केव्हाच उजेडली होती. भराभरा तिचा कामासाठी हात चालू होता. ती म्हणाली, "आत्ता? अरे ही वेळ आहे का तुझ्याजवळ बसायची? ए नाही हं, मला खूप कामं आहेत.

तू काल रात्रीच का नाही मला गंमत म्हणून दाखवलीस? आत्ता मला वेळ नाही. आपण आज रात्री तुझी गम्मत नक्की ऐकूया!"

ए “आई, असं काय गं करतेस?" माझा चेहरा रडकुंडीला आला होता. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून ती विरघळली. ती खुर्चीवर बसणार इतक्यात आमच्या शेजारच्या काकू काहीतरी (विरजण म्हणतात त्याला!) मागायला आल्या. त्यांच्याशी बोलता-बोलता आईची सकाळच्या महत्त्वाच्या वेळेतली चांगली पाच मिनिटे खर्च झाली. काकू गेल्यावर दार बंद करतानाच आई मला म्हणाली, "अवि, आता माझ्याजवळ अजिबात वेळ नाहीये. संध्याकाळी मात्र तुझं मी ऐकेन हो!" 

आता मलाही राग आला होता. “काही नको ऐकू माझं.” असं मी म्हटलं आणि रागारागानं आवरून शाळेत गेलो. हजेरी झाल्यावर स्पर्धेत भाग घेतलेल्या आम्हा मुलांना शाळेच्या पटांगणावर बोलावलं. रांगेत बसवून घेतलं. पटांगणावर इतर वर्गातील विद्यार्थी श्रोते होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मा. मुख्याध्यापकच होते. लो. टिळकांची आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून त्यांचाही फोटो हार घालून विचारमंचावर एका खुर्चीवर ठेवला होता. टेबल, खुळ मांडल्या होत्या. शिक्षकही हजर होते. दोन्ही फोटोंना मी नमस्कार केला. 

आमचे जाधव सर सूत्रसंचालन करत होते. दोन-तीन मुलांच्या भाषणांनंतर माझे नाव पुकारले गेले. जाम टेंशन आले होते. धडधडत्या मनाने मी विचारमंचाच्या पायऱ्या चढलो. मुख्याध्यापकांकडे पाहिले, त्यांनी हसून माझं स्वागत केलं. मी माईक हातात घेतला आणि समोर नजर टाकली तर तीन-चारशे विद्यार्थ्यांचे डोळे माझ्यावर रोखलेले. बाप रे! माझ्या तोंडून शब्द बाहेर पडेच ना? मी भीतीने डोळे गच्च मिटले आणि भाषणाला सुरुवात केली. “आज एक ऑगस्ट, लोकमान्य टिळकांची जयंती." असं म्हटलं आणि एकच हशा ऐकू आला. मला एकदम

ओशाळल्यासारखं झालं. पुण्यतिथीऐवजी मी जयंती म्हटलं होतं. मी माझे भाषण थांबवले. एवढ्यात मुख्याध्यापक मला म्हणाले, प्रयत्न करणारेच चुका करतील ना? घाबरू नकोस! तू भाषण पाठं केलं आहेस ना असं म्हणत सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला धीर आला, मी पुन्हा नव्याने न चुकता पाठ केलेलं भाषण धाडधाड म्हणून टाकलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. विचारमंचावरील माझे सर्व शिक्षकही टाळ्या वाजवत होते.

माझा भाषणात नंबर आला नाही; पण मुख्याध्यापक सरांनी मला त्यांच्याजवळचं फूल दिलं आणि शाबासकीही! अशी झाली माझी फजिती!

स्वच्छ सुंदर शाळा 

विविध स्पर्धांचे नियोजन होऊन एकेका शिक्षकावर ती जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला. विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. वर्ग सजावट झाली, सुविचारांनी फळे सजले. काचपेट्यांमध्ये सुंदर चित्रे (विद्यार्थ्यांनी काढलेली!) नटली. 

शाळेत नियमित येणाऱ्या, गुणी विद्यार्थ्यांचा प्रार्थनेच्या वेळी आवर्जून उल्लेख होऊ लागला. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी, शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळ देऊन शिक्षक खास प्रयत्न करू लागले. तसे वर्षभरच आमचे शिक्षक इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना शाळा भरण्यापूर्वी तासभर विशेष मार्गदर्शन करतातच. गेल्या १० वर्षांपासून हे प्रयत्न होत आहेत. त्याचे चांगले परिणामही दहावीच्या निकालावर दिसून आले आहेत. 

मातृभाषेचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने मिलिंद सोनार यांनी रचलेली प्रतिज्ञा आवर्जून म्हणण्याचा प्रघात मा. मुख्याध्यापकांनी सुरू केला. दररोज आमचे शिक्षक मूल्यसंस्कार जपणाऱ्या गोष्टी (रोज एकजण) सांगतात. वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून पुस्तकपेटी तयार केली, जी आमच्या ऑफ तासाला न कंटाळता वर्गात आणली जाते. मुले ही पुस्तके आवडीने वाचतात. शाळा सुटल्यावर एका जिन्याने मुले आणि एका जिन्याने मुली बडबड न करता हात मागे बांधून ओळीत, शिस्तीने उतरू लागले. अर्थात या सर्व गोष्टींसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकांना लक्ष घालावेच लागले. या सर्व गोष्टींवर मा. मुख्याध्यापकांची प्रेमळ; पण करडी नजर असे. 

सफाई कर्मचारी, शिपाई आणि रखवालदार यांनाही आपापल्या कामाचा भाग समजावून दिल्याने त्यांनीही मनापासून काम केले. 

या सर्वांचा परिणाम म्हणजे आमच्या शाळेला मिळालेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस. पण मित्रांनो, मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगाविशी वाटते की, आज शाळेतील प्रत्येकालाच आपली जबाबदारी कळली आहे. त्यामुळे यावर्षीही विशेष प्रयत्न न करताच आम्ही बक्षीस मिळवू. कारण लागलेली शिस्त आम्ही बिघडू देणार नाही असा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणाऱ्या आमच्या शालेय प्रशासनाचे कौतुक झाले नसते तरच आश्चर्य!SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

2 comments: