Essay on The Importance of Time in Marathi language : In this article " वेळेचे महत्व मराठी निबंध ", " Veleche Mahatva Nibandh...
Essay on The Importance of Time in Marathi language: In this article "वेळेचे महत्व मराठी निबंध", "Veleche Mahatva Nibandh in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "The Importance of Time", "वेळेचे महत्व मराठी निबंध", "Veleche Mahatva Marathi Nibandh" for Students
"कर्तव्या जे तत्पर नर
दृढ नियमित व्हावयास मन
घड्याळ बोले, आपुल्या वाचे
आला क्षण, गेला क्षण"
काळाची गती ज्यांनी ओळखली त्या केशवसुतांनी वेळेचे महत्त्व किती अचूक जाणले ना?
जगात सगळ्यात नाशवंत; पण अत्यंत मौल्यवान आणि तरीही मोफत असे काय आहे?
वेळ ही जगातील सर्वांत नाशवंत गोष्ट आहे. एक क्षण वाया गेला तर तो परत मिळवता येत नाही. धनुष्याच्या सुटलेल्या बाणाप्रमाणे एकदा गमावलेला वेळ हातून गेला की गेलाच.
म्हणूनच वेळ ही आपल्याजवळची अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. वेळेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकालाच उपलब्ध असलेला वेळ मोफत असतो.
गरीब-श्रीमंत, तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष, भारतीय-जपानी अशा सर्वांनाच सारख्या प्रमाणात तो उपलब्ध असतो.
जीवनात यशस्वी होणारी माणसे आपल्या वेळेबद्दल फार जागरूक असतात, दक्ष असतात, सावध असतात.
'कल करे सो आज कर, आज करे सो अब।' हा वेळेच्या नियोजनाचा गायत्री मंत्र आहे.
आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे व्यवस्थितपणे, कार्यक्षमतेने व जाणीवपूर्वक नियोजन केले तर आपल्या हातून बरीच चांगली कामे होतील. कारण वेळेबरोबर जो चालतो व वागतो त्याचेच चांगभले होते.
मला वेळच नाही, असे काही लोक नकारात्मक बोलतात. त्यांची कष्ट, मेहनत करायची तयारी नसते. त्यांना नेहमी प्रत्येक गोष्ट विनासायास व सहजपणे हवी असते. वेळेचे नियोजन केले की, मनुष्य वेगवान होतो. माणसाच्या जीवनात वेळ आणि वेळ दाखवणारे घड्याळ फार महत्त्वाचे आहे.
वेळ कोणासाठीच थांबत नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून आपल्या यशाची खात्री करून घ्यावी. आळस करणे, कुठलीही गोष्ट पुढे ढकलणे ही वृत्ती आपल्याला अपयशाकडे नेते. कोणतेही काम वेळेवर किंवा निर्धारित वेळेच्या पूर्वी केले तर प्रतिष्ठा. नावलौकिक वाढतो.
वेळेचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. कारण Time is Money!
हल्ली स्त्रिया उच्चविद्याविभूषित झाल्या आहेत. कार्यालयात त्या जबाबदारीची कामे करत असतात. अशावेळी घर-संसार आणि कार्यालय यांचा मेळ बसविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. त्यावेळेस त्यांच्या वेळ व ऊर्जेची बचत करणारी फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरसारखी ही अत्याधुनिक साधने त्यांना मदत करतात. आपण आपल्याला व्यवसाय, छंद, अभ्यास, साधनाने जास्तीत जास्त वेळ कसा देऊ शकतो हे आपणच ठरवायचे असते. आपल्याला सिद्ध करून दाखवायचं असेल तर घड्याळाचे हातच आपल्या मदतीला धावतील, हे लक्षात घ्या.
विद्यार्थी जीवनात तर वेळेचे महत्त्व किती आहे हे वेगळे सांगायला हवे का? 'क्षण त्यागे कुतो विद्या' या संस्कृत सुभाषितात विद्यार्थ्याने प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा, असे सांगितले आहे.
जे काही करायचे असेल ते आता, या क्षणाला.
COMMENTS