Essay on An ideal citizen in Marathi : In this article " आदर्श नागरिक कसा असावा मराठी निबंध ", " Adarsh Nagrik Marathi Niband...
Essay on An ideal citizen in Marathi: In this article "आदर्श नागरिक कसा असावा मराठी निबंध", "Adarsh Nagrik Marathi Nibandh", "Adarsh Nagrik Kasa Asava in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "An ideal citizen", "आदर्श नागरिक कसा असावा मराठी निबंध", "Adarsh Nagrik Marathi Nibandh" for Students
आदर्श नागरिकाची व्याख्या काय? जो नियमांचे पालन करतो तो आदर्श. राष्ट्राचा नागरिक या नात्याने त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. मूल्यशिक्षणातून आदर्श नागरिक घडविण्याचे काम घडते.
माणसानेच कायदे, नियम बनवले; तेही आपल्याच सोईसाठी. मग आपण ते पाळायला नको? कायदा मोडणारा गुन्हेगार ठरतो. आपले स्वातंत्र्य सांभाळायचे; पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता! आपल्या वागण्याने इतरांना त्रास होता कामा नये, ही खबरदारी आदर्श नागरिक सदैव घेतो.
उदा. रस्त्याने वाहन चालवताना आदर्श नागरिक सिग्नल पाहून किंवा एकेरी रस्ता अशी खूण दाखवणारी पाटी पाहूनही नियम तोडण्याचा प्रयत्न करत नाही; कारण त्याचा स्वतःच्या मनावर ताबा असतो. (फक्त समोर पोलीस असेल तरच तो कायदे पाळतो असं नाही!)
आपले सर्वांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून सर्वांनीच कायदे पाळायला हवे.
आदर्श नागरिक आपल्या दारासमोरचे अंगण स्वच्छ करून शेजारच्या दारात केर लावत नाही. आपल्या शेजाऱ्याच्या मदतीसाठी तो नक्कीच धावतो. फक्त स्वार्थी होऊन जगत नाही, तर तो आपले कर्तव्यही जाणतो.
‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे तो जाणून वागतो. आपल्या हक्क आणि कर्तव्यांची त्याला जाण असते. तो सुसंस्कारी असतो. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर तो टीका-टिपणी करत नाही. उलट दुसऱ्याच्या दुःखाने जो हळहळतो तो आदर्श.
अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न होत असतो. ते संस्कार त्याच्या बालमनावर रुजतात. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा - जी प्रार्थनेनंतर शाळेत रोज म्हटली जाते, तिचा अर्थ समजावून घेऊन तसं वागतो तो आदर्श. दिलेला शब्द पाळतो तो आदर्श.
जो भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करता प्रयत्नांनीच यश मिळवतो तो आदर्श. ज्या समाजात मी राहतो त्या समाजाशी माझी बांधिलकी आहे हे जाणतो तो आदर्श, आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजातील गोरगरिबांना देण्यात ज्याला आनंद मिळतो तो आदर्श. दारिद्र्य, अज्ञानाने पीडित समाजाचा थोडासा भार हलका करण्याचा प्रयत्न जो करतो तो आदर्श. जो आपल्या मातापित्यांचा सन्मान करतो तो आदर्श. जो आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी आदराने वागतो तो आदर्श.
जो राष्ट्रगीत सुरू असताना ताठ उभं राहून राष्ट्रध्वजाचा मान राखतो तो आदर्श. आपल्याला मिळालेल्या या सुंदर जीवनाचा उपयोग फक्त स्वतःपुरता भोगासाठी नसून काहीतरी करून आपली छाप मृत्यूनंतरही जो सोडून जातो तो आदर्श.
'मरावे परी कीर्ती रूपे उरावे' आपल्या चांगल्या कार्याचा ठसा लोकांच्या मनावर तो ठसवतो. वाईट गोष्टींपासून तो कटाक्षाने दूर राहतो.
नियम भंग करत नाही तो आदर्श. ज्याला आपल्या देशाचा, मातीचा अभिमान आहे तो आदर्श. जो आपल्या संविधानाने दिलेल्या हक्कांबाबतही जागरूक असतो तो आदर्श. मला एक छोटीशी गोष्ट इथं सांगाविशी वाटतेय. माझ्या आजोबांनी मला सांगितलेली आणि माझ्या मनावर कोरली गेलेली.
जेव्हा आपण ओंजळीने पाणी पितो तेव्हा आपल्या हातांच्या बोटांमधून थोडे पाणी खाली जमिनीवर सांडते तेव्हा पाणी खाली सांडले म्हणून किंवा वाया गेले म्हणून आपण हळहळू नये. कारण त्या तृषार्त भूमीचाही पाण्यावर हक्क असतो. तिला ते मिळायलाच हवे.
COMMENTS