Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi : In this article " प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध ", " Prayatnanti Parmeshwar Mara...
Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi: In this article "प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध", "Prayatnanti Parmeshwar Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Prayatnanti Parmeshwar", "प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध", "Prayatnanti Parmeshwar Marathi Nibandh" for Students
प्रयत्न केले तर परमेश्वर प्राप्तीही होऊ शकते. कोणतेही काम जिद्दीने, चिकाटीने केले तर ते सहज साध्य होऊ शकते. सकारात्मक ऊर्जा आपल्याला या सुवचनातून दिसते.
भिंतीवर चढणारी मुंगी वारंवार खाली पडली तरी ती पुन्हा पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करते. न कंटाळता केलेल्या या प्रयत्नामुळेच ती यशस्वी होते.
आपण वृत्तपत्रातून काही बातम्या वाचतो. जशा की, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. का? तर परीक्षेत अपयश आले. आपणच अभ्यास करायचा नाही आणि मग नापास झाल्यावर निराश मनाने आत्महत्येसारखा भेकड मार्ग शोधून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि आई-बाबांना दुःखात लोटायचं.
'कोशिश करनेवालों की हार नहीं होती' ही कविता तुम्ही वाचलीत का? आपला आत्मविश्वास वाढवणारीच कविता आहे ही!
दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात मी पाहिलं (कार्यक्रमाचं नाव - India's Got Talant) एक युवती एका पायावर डान्स करत होती. म्हणजे तिला एकच पाय होता. एका पायाने ती (पांगळी) अधू असूनही केवळ जिद्दीच्या जोरावर तिने इथपर्यंत मजल मारली आणि परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली.
जगभरात शास्त्रज्ञ विविध प्रकारचे शोध लावत असतात. ते त्यांच्या अहोरात्र मेहनतीचेच फळ असते. कोणताही शोध अचानक लागत नाही. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग न कंटाळता करत राहणं. हेच शास्त्रज्ञांचं काम असतं आणि ते हे काम न थकता करतात. कधी कधी तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच एखादा शोध लावण्यात खर्ची पडतं.
नृत्य, वादन, चित्रकला शिकण्यासाठी बरीच वर्षे खर्च होतात. कोणतीही कला अवगत करण्यासाठी प्रयत्नच उपयोगी ठरतात. तसंच परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यासाचीच आवश्यकता असते. अभ्यास म्हणजे तरी काय? प्रयत्नच. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास.
वर्गात प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी अचानक उत्तम गुणांनी पास होत नाही, तर वर्षभर त्याने स्वतःच्या मनाला आणि शरीराला अभ्यास करण्याचं वळण लावलेलं असतं. वर्षभर, नियमितपणे केलेला अभ्यास त्याला यशस्वी करतो. म्हणून सांगतो. मित्रांनो, अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहा. यश तुमच्यापासून दूर नाही.
'यत्न तोचि देव जाणावा' या समर्थ रामदासांच्या वचनात देव कोण आहे? तो देव म्हणजे प्रत्येक व्यक्तीने मनाशी ठरविलेले आपले ध्येय किंवा निश्चय हा अर्थ वचनातून सूचित होतो.
आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखदायी किंवा यशदायी करायचे असेल, तर आपण प्रयत्नांवर भर दयायला हवा. अधिकाधिक श्रम करायला हवेत.
जीवनात मान, सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर त्याकरिता पाहिजेत अथक प्रयत्न आणि श्रम.
COMMENTS