Tuesday, 13 October 2020

MARATHI ESSAY ON "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध", "SHRAMACHE MOL MARATHI NIBANDH" for Students

Essay on Importance of Books in Marathi: In this article "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध", "श्रमाचे मोल मराठी निबंध", "Marathi Essay Shramache Mol" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

MARATHI ESSAY ON "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध", "SHRAMACHE MOL MARATHI NIBANDH" for Students

MARATHI ESSAY ON "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मराठी निबंध", "SHRAMACHE MOL MARATHI NIBANDH" for Students

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वचनांना सुविचाराचे मोल प्राप्त झाले आहे.

'आई' हा शब्द ऐकण्यासाठी मातेला मरणप्राय वेदना सहन कराव्या लागतात. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून अव्वल येण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षभर मेहनत करावी लागते, खूप खूप अभ्यास करावा लागतो. तेव्हाच ते कौतुकास पात्र ठरतात.

एखादया ओबड-धोबड दगडाचे सुंदर अशा देवाच्या मूर्तीत रूपांतर घडवत असताना शिल्पकार त्या दगडावर असंख्यवेळा छनी हातोडीचे घाव घालतो. त्यानंतरच ते शिल्प आकाराला येते. त्या शिल्पकाराचे कौतुक तर असतेच; पण घाव सहन करणाऱ्या दगडाच्या सोशीकतेचेही कौतुक आहेच ना! ।

तो दगड जेव्हा एका सुबक मूर्तीच्या आकारात प्रतिष्ठापित होतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त झालेले असते, ते त्याने सहन केलेल्या यातनांमुळे!

स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी या नेत्यांना लोकांनी बहाल केलेल्या या उपाध्या त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. 

समाजाविरुद्ध जाऊ पाहणारे, जुन्या रूढी, चालीरीती दूर करण्याचा अट्टाहास करणारे महात्मा जोतीराव फुले, महर्षी धोंडो कर्वे यांच्यावर समाजाने अपमान, उपहासाची चिखलफेकच केली, तरीही स्त्रीशिक्षणाचा ध्यास त्यांनी सोडला नाही आणि म्हणूनच आज स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. १००/१२५ वर्षांपूर्वी सुरू केलेले हे कार्य या महान पुरुषांनी चिकाटीने चालू ठेवले नसते तर... 

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज स्वातंत्र्याचे प्रतीक व मराठी मनाचे दैवत म्हणून ओळखले जातात; पण त्यामागे त्यांचे अविरत श्रम आहेत हे विसरून कसे चालेल?

तुमचा लाडका खेळाडू, सुप्रसिद्ध क्रिकेटिअर सचिन तेंडुलकर आहे. तुम्हालाही भविष्यात त्याच्यासारखेच मोठे व्हायचे आहे, नाव कमवायचे आहे. प्रसिद्धी, पैसा हवा आहे; पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने दिवसातील २०-२० तास मैदानावर सराव केला आहे. सचिन 'क्रिकेट' जगलाय, त्या वेडाने तो झपाटलाय.

इतर ऐहिक सुखाचा त्याला त्याग करावा लागलाय हे आपण विसरून कसं चालेल?

थोरांचा इतिहास हा अडचणींचा, संकटांचा, खडतर जीवनाचा इतिहास आहे. थोरांचे पोवाडे गायले जातात. ते जीवनाचे मार्गदर्शक बनले म्हणूनच.

'थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा

आपण त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाचि खरा' 

परिस्थितीवर, संकटावर मात करत जो आपल्या ध्येयाकडे झेप घेतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. हे उगीचंच नाही म्हणत,

'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण...'


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: