Wednesday, 14 October 2020

Marathi Essay on "Importance of Arts", "जीवनात कलेचे महत्व मराठी निबंध", "Jivanat Kaleche Mahatva Marathi Nibandh" for Students

Jivanat Kaleche Mahatva Essay in Marathi: In this article "जीवनात कलेचे महत्व मराठी निबंध", "Essay on Importance of Arts in Marathi Language" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Importance of Arts", "जीवनात कलेचे महत्व मराठी निबंध", "Jivanat Kaleche Mahatva Marathi Nibandh" for Students

Marathi Essay on "Importance of Arts", "जीवनात कलेचे महत्व मराठी निबंध", "Jivanat Kaleche Mahatva Marathi Nibandh" for Students

'कला असे मानवासि भूषण

परि पाहिजे जीवनाचे त्यात स्मरण' 

प्रस्तुत काव्यपंक्तीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कलेचे मानवीजीवनातील महत्त्व सांगितले आहे.

कलेनेच माणसाचे माणूसपण सिद्ध होते. श्रीमंतीपेक्षाही कलेच्या संपादनामुळे माणसाला अधिक मोठेपण येते. १९व्या शतकात त्यांनी मांडलेला हा विचार आजही किती तंतोतंत लागू होतो बरं! ।

भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककला, चित्रकला, हस्तकला, नृत्य, वादन अशा ६४ कला आहेत. शालेयजीवनात त्यापैकी काही कलांशी आपला परिचय होतो; पण कलेविषयी जाणीवपूर्वक अभिरुची निर्माण करण्याचे काम पालकांनी केले तर एका उत्तुंग शिखरावर ते आपल्या पाल्याला नेऊन ठेवू शकतील. आज जागृती होऊन पालक डोळसपणे आपल्या पाल्याला घडवताना दिसतात ही आनंदाची बाब आहे. दूरदर्शनवर सहा वर्षांनी मुलगी गाताना ज्या काही 'हरकती' घेते ते खरोखर कौतुकास्पद आहे.

बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस यांसारख्या व्यंग्यचित्रकारांनी आपली कला समाजासमोर 'चित्रे बोलकी' करून सादर केला. लतादीदी, आशाताई यांच्या सुरेल गायनाबद्दल काय लिहावे? अभिनय कलेत बाजी मारणारे माधुरी दीक्षित, नूतन, शाहरूख खान या आणि अशा अनेक कलाकारांचे करावे तेवढे कौतुक थोडेच!

सूत्रसंचालन, मुलाखतकार म्हणून सुधीर गाडगीळ, आदेश बांदेकर आणि आजच्या पिढीचा आवडता 'कपिल शर्मा यांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. नृत्यकलेत रोहिणी भाटे, पाककलेत विष्णू मनोहर, संजीव कपूर ही वानगी दाखल नावे. राहुल देशपांडे, महेश काळे, संगीतकार सलील कुलकर्णी, अजय-अतुल हे तर सर्वपरिचितच आहेत.

बासरीवर फिल्मी गाणी वाजवणारे, फिल्मी गाण्यांवर २/२ तास 'शीळ' वाजवणारे कलाकार खरोखर कलाकार म्हणून नावाजले जातात.

लेखनकलेत प्र. के. अत्रे. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, काव्यलेखन करणारे कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर यासारखी हजारो नावे लिहिता येतील. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रचंड मेहनत करावी लागते. लतादीदींचा दिवस आपण सर्व साखरझोपेत असतानाच सुरू व्हायचा. कला आत्मसात करण्यासाठी 'त्या' कलेविषयी आत्मीयता हवी. पं. भीमसेन जोशी लहानपणीच घर सोडून गुरुगृही राहिले. गायनाची तपस्या केली.

परमेश्वराने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिला तो काय फुकट घालवायचा? 

Essay on Importance of Books in Marathi: In this article "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध", "ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध", "Granth Maza Guru Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Importance of Books", "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध", "ग्रंथ माझा गुरू मराठी निबंध" for Students

'प्रयत्ने मानव होई उन्नत'

प्रयत्नांची शिकस्त करून आपण एखादी कला आत्मसात करू शकतो. पुतळे बनवणारे शिल्पकार बी. आर. खेडकर, गणेशमूर्ती बनवणारे खटावकर सर्वपरिचित आहे. कलेमुळे त्या व्यक्तीला जीवनातील आनंद तर मिळतोच; पण त्याच्यामुळे तो इतरांनाही आनंद देऊ शकतो त्यामुळे दुःख विसरण्यास मदत होवू शकते. रेडिओवरील गाणे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते.

अशा नावाजलेल्या व्यक्तींनी मिळवलेलं यश पाहिलं की वाटतं - 'जीवन यांना कळले हो!'

बाबा रामदेव यांची योगसाधना ही परिश्रमपूर्वक साध्य केलेली आहे. ती ही कलाच आहे. समाजाला 'आकार' देण्याचं कार्य या व्यक्तीमुळे घडतं आणि म्हणूनच आपणही एखादी तरी कला आत्मसात करावी. कारण कलेशिवाय जीवन अपूर्ण आहे.

कलादालने, नाट्यगृह, सिनेमागृहे ही कलेला सादरीकरणासाठीच मुद्दाम अस्तित्वात आली आहेत.

वाढती कलादालने, नाट्यगृहे ही कलेचे जीवनातील महत्त्वच अधोरेखित करतात ना!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: