Wednesday, 14 October 2020

Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students

Essay on Nature My Teacher in Marathi: In this article "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students

Marathi Essay on "Nature My Teacher", "निसर्ग माझा गुरु मराठी निबंध", "Nisarg Maza Guru Marathi Nibandh" for Students

खूप फळांनी लगडलेलं झाड किती वाकलेलं असतं नाही? जणूकाही रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना स्वतःजवळ बोलावून ‘या, माझी फळे खा, माझ्या सावलीत विश्रांती घ्या' असं विनवत असतं. अशा डेरेदार वृक्षाच्या आसऱ्याला अनेक पशुपक्षी, मुंगळे राहतात. अनेकांसाठी तो आश्रयदाता असतो.

Read also : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध

निसर्ग जे काही देतो, त्यात हातचं काहीच राखलेलं नसतं. आपण मात्र आपल्या स्वभावधर्मानुसार सतत हातचं राखूनच देत असतो. पाण्यानं गच्च भरलेले ढग मुसळधार, विरक्त भावनेनं धरित्रीला चिंब करतात.

निसर्गातील सूर्य, चंद्र, तारे कधीही न कंटाळता रोजची हजेरी लावतातच. नया न कंटाळता वाहतात, अगदी रात्रंदिवस. झाडं आपल्या पानं, फुलं, फळांशिवाय आपलं संपूर्ण शरीर केव्हाही त्यागण्यासाठी तयार असतात. ही वृत्ती माणसांमध्ये यायला हवी.

जंगलात राहणारी जंगली श्वापदं भूक नसताना, कारण नसताना शिकार करत नाहीत आणि माणूस मात्र...? केवळ गंमत म्हणूनही एखादया प्राण्याचा जीव घेऊ शकतो!

प्रत्येक ऋतूचं एक आगळंच सौंदर्य आहे. अगदी पानगळीचंही! मोठमोठे डेरेदार वृक्ष पर्णहीन होतात तेव्हा साधुसंतांसारखे दिसतात.

'जगाच्या कल्याणा देह कष्टवावा', ही वृत्ती वृक्षांच्या बाबतीत अगदी सत्य ठरते. म्हणूनच तर ते गरिबांच्या घरात चुलीत लाकूड होऊन पेटतात.

वृक्षांच्या समत्व दृष्टीनं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, 

"जो खांडावया घाव घाली 

की लावणी जयाने केली 

दोघा एकची सावली 

वृक्षा दे जैसा!" 

वृक्षांचं जीवन ऋषितुल्य. धगधगत्या दुपारच्या उन्हात वृक्ष स्वतः तापून दुसऱ्यांना मात्र थंडगार सावली देतात. त्यांच्यावर दगड फेकणाऱ्यांना गोड फळं देतात. एवढंच नाही तर आयुष्य संपल्यावरही त्यांची लाकडं आपली सेवाच करतात. एवढं करूनही त्यांना जगाकडून अपेक्षा मात्र काहीच नाही.

स्वतःची मुळं जमिनीत खोल नेऊन वृक्ष स्वतःचं भोजन स्वतः प्राप्त करतात. 

स्वतःच्या पायावर उभं राहून दुसऱ्याची सेवा करण्याचा हा वृक्षांचा संदेश प्रत्येक समाजसेवकानं लक्षात ठेवण्यासारखा आहे.

शहरात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. खेडेगावात स्वावलंबी जीवनामुळे निरोगी, निरामय जीवनाचा लाभ आपल्याला होतो. कारण खेड्यातील निसर्ग आजही बराचसा टिकून आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात चित्तवृत्ती प्रसन्न राहते. रोगराई दूर पळते. प्रदूषणमुक्त निसर्ग ही आपली अनमोल अशी राष्ट्रीय संपत्ती आहे.

विज्ञान युगात वृक्षमाहात्म्य नावाचे विचारस्रोत सर्वांनी जिवापाड जपले पाहिजे; कारण वृक्ष, वनं यांच्या सहवासात खरी शांती मिळते. 

सर्व नया वाहताना रिकाम्या हाताने येत नाहीत तर येताना आपल्याबरोबर गाळ, सेंद्रिय पदार्थ आणतात. त्यातून भूचर, जलचर व उभयचर जीवजाती वाढतात. निसर्गदेवता नियमानुसार चालणारी, कधीही न थकणारी!

पावसाळ्यात हिरवाईचं पांघरूण, हिवाळ्यात धुक्यांची दुलई, उन्हाळ्यात रंगीबेरंगी फळाफुलांची झालर निसर्गावर पसरते.

फळांनी लगडलेल्या झाडावर दगडांचा मारा करणाऱ्यालाही ते झाड सुमधुर फळांचा वर्षाव करून तृप्त करतं, तेही अगदी निमूटपणे!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

1 comment: