Thursday, 8 October 2020

Marathi Essay on "Banyan Tree", "अक्षय्य वृक्ष वड मराठी निबंध", "Vad Vruksh Marathi Nibandh" for Students

Essay on Banyan Tree in Marathi: In this article "अक्षय्य वृक्ष वड मराठी निबंध", "Vad Vruksh Essay in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Banyan Tree", "अक्षय्य वृक्ष वड मराठी निबंध", "Vad Vruksh Marathi Nibandh" for Students

वटपौर्णिमा हा सण भारतातील अनेक स्त्रिया अगदी मनोभावे व विधिपूर्वक साजरा करतात. काही जणी नोकरी, कामानिमित्त बाहेर जात असल्याने स्वतःच्या सवडीनुसार कधी वडाची फांदी आणून तर कधी पाटावर रांगोळी (वडाचे झाड) काढून तर कधी चक्क मोबाइलवरील वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात. असो.

Marathi Speech on "Banyan Tree", "अक्षय्य वृक्ष वड मराठी निबंध", "Vad Vruksh Marathi Nibandh" for Students

वडाच्या झाडाचीच पूजा का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वडाचे झाड ही आयुर्वेदिक वनौषधी आहे. वडाचे झाड कित्येक वर्षे टिकते म्हणून त्यास 'अक्षय्यवट' असे म्हणतात. वडाच्या झाडाकडून आपण दीर्घायुष्याची, अक्षय्य - अखंड अशा आयुष्याची इच्छा करतो. जरी स्त्रिया आपल्या प्रिय पतीसाठी पूजा करत असल्या तरी त्याचे फळ स्त्रियांनाही मिळते. वडाच्या पारंब्या या केसांसारख्या पसरतात म्हणून पारंब्यांपासून सिद्ध केलेले तेल ज्या स्त्रियांचे केस गळत असतील त्यांनी लावल्यास त्यांचे केसही वटजटाप्रमाणे घनदाट होतात.

कसलीही जखम झाल्यास वडाच्या झाडाची साल उपयुक्त ठरते. सर्वप्रथम तव्यावर भाजून सालीची बारीक पूड तयार करतात. मग ती पूड तेलात खलून जखमेवर लावल्यास जखम खपली धरते आणि लगेच बरी होते. 

सर्वाधिक प्राणवायू देणाऱ्या मोजक्या वृक्षांमध्ये 'वडा'च्या झाडाचा समावेश होतो. पूर्वीच्या काळी स्वयंपाक चुलीवर होत असत. चुलीच्या धुरामुळे स्त्रियांना सतत कार्बन डायऑक्साइडचा मारा सहन करावा लागे. स्त्रियांना शुद्ध हवा मिळावी आणि पतीच्याही दीर्घायुष्यासाठी हे व्रत असल्याने 'वटपौर्णिमा' हा सण साजरा करण्याची प्रथा रूढ झाली असावी. 

वडाचे झाड जितका कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. तितकाच ऑक्सिजन तयार करून आपल्याला विनामूल्य देते. 

या झाडाची सावली दाट असल्याने हे झाड आपल्या परिसरातील जैवविविधतेचा मोठा आधार ठरते. 

उन्हाळ्यात कोणतेही इतर फळ उपलब्ध नसताना वडाचे झाड लालचुटुक फळांनी लगडलेले असते. आपला राज्यपक्षी हरियल आणि इतर अनेक पक्षी, प्राणी ही फळे खातात. अनेक पक्षी या झाडावर निवास करतात. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. प्राणी व पक्ष्यांसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त असल्याने या झाडाला 'आधाराचे झाड' असेही म्हटले जाते. मोठ्या प्रमाणात बिया लावूनदेखील हे झाड उगवत नाही तर पक्ष्यांच्या विष्ठेद्धारा (पक्ष्यांनी फळे खाल्ल्यावर त्यांच्या पचनतंत्रातून) बिया बाहेर पडल्यावर त्यातूनच हा वृक्ष उगवतो. 

अशा उपयुक्त झाडाच्या पारंब्या तोडून पर्यावरणाचे नुकसान न करता, शास्त्र आणि संस्कृती यांची सांगड घालत जिवंत वटवृक्षाचीच आपण सर्वजण पूजा करूया !


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: