निसर्ग माझा गुरु मराठी निबंध - Nisarg Maza Guru Marathi Nibandh

Admin
0

निसर्ग माझा गुरु मराठी निबंध - Nisarg Maza Guru Marathi Nibandh

हो, निसर्गसुद्धा माझा गुरू आहे. गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतो. संस्काराचे अमृत पाजून आपल्याला ख-या मानवाचे रूप देतो. 

जो आपल्याला शिकवतो, ज्ञान देतो, आपला आदर्श दुसन्यासमोर ठेवून आदर्श मानव घडवतो तो गुरू. मग निसर्गालासुद्धा आपला गुरू मानले पाहिजे. कारण निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देतो, शिकवण देतो, बोधप्रद धडे देतो. ‘निसर्ग हे करा, ते करा' असे जरी सांगत नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकवतो. त्यासाठी आपल्याला त्या निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. मी तो अनुभव घेतला आहे व नेहमी घेतच असतो. तो मला प्रत्येक वेळी नवीन धडे देतच असतो. म्हणूनच निसर्ग माझा गुरू आहे.
मी जेव्हापासून निसर्गाशी एकरूप व्हायला लागलो. तेव्हापासून मला निसर्गाची विविध रूपे, घटक, आकार अनुभवायला मिळाले. निसर्गातील विविध घटक आपल्या कृतीतून काही ना काही शिकवतो व ते आकलन करण्याची मला आता सवयच लागली आहे. 
मी निसर्गाला का गुरू मानतो. याची काही उदाहरणे दिली तर तुम्हाला त्यातील सत्यता पटेल. मग चला तर आपण निसर्गाशीच संवाद साधू या. त्यांच्याशी एकरूप होऊ या. हे भव्य आकाश पहा. त्याची क्षणाक्षणाला बदलणारी रूपे त्याचे तारूण्याचे रहस्य काय ते अनुभवा. खळखळ वाहणारे प्रवाह संकटाला सामोरे जाऊन सागराचे विशाल रूप धारण करतात. झाडे कधी बोलत नाहीत पण आपल्या कृतीतून बरेच काही सांगतात. सतत दान करा. छोटा-मोठा असा भेदभाव करू नका. शरीराने व मनाने सतत तरूण राहा. आपल्या कृतीने इतराना सुखी, समाधानी आनंदी करा. पाने, फुले, पक्षी, किडे, मुंग्या प्राणी, डोंगर, दया, शेते याचे तुम्हीही निरीक्षण करा.
आता तरी पटले ना ‘निसर्ग माझा गुरू' या विधानात किती सत्यता आहे ते !

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !