Mala Avadlela Ganesh Utsav Marathi Nibandh : In this article " मला आवडलेला गणेशोत्सव मराठी निबंध ", " Essay on Ganesh Utsav i...
Mala Avadlela Ganesh Utsav Marathi Nibandh: In this article "मला आवडलेला गणेशोत्सव मराठी निबंध", "Essay on Ganesh Utsav in Marathi Language" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Ganesh Utsav", "मला आवडलेला गणेशोत्सव मराठी निबंध", "Mala Avadlela Ganesh Utsav" for Students
जून महिना उजेडला की, आम्हा मुलांना शाळेचे वेध लागतात. कारण एप्रिल-मे महिन्यात भरपूर खेळून पोट भरलेलं असतं. वेगवेगळ्या क्लासना जाऊन कुणी पेटी-तबला वाजवायला, तर कोणी पोहायला शिकलेलं असतं. कोणी आपल्या आजोळी तर कोणी आई-बाबांसोबत प्रवासी कंपनीच्या ट्रीपला गेलेलं असत. त्या सगळ्या गमती-जमती आपल्या मित्र-मैत्रिणींना कधी एकदा सांगू असं होऊन जातं अगदी!
नवीन वर्ग, नवीन वर्गशिक्षक, नवी पुस्तकं अशा नवनवीन गोष्टी आम्हा मुलांना भुरळ घालत असतात. मला मात्र नवीन वर्ष सुरू झालं की, येणाऱ्या सणांची जास्त उत्सुकता असते. गोकुळाष्टमी, राखीपौर्णिमा, गौरी-गणपती, नवरात्र मग दसरा-दिवाळी!
आमच्या कॉलनीमध्ये सगळे सण अतिशय उत्साहाने साजरे होतात. 'दहीहंडी'च्या दिवशी तर दोन दहीहंड्या बांधतात, एक दहीहंडी मुली फोडतात तर दुसरी दहीहंडी मुले फोडतात. आहे की नाही मज्जा?
तितक्याच उत्साहाने गणेशोत्सवही साजरा होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीयझेंडावंदन झालं की, लगेच आम्हा बालचमूंची बैठक होऊन गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. त्या बैठकीत अर्थातच मोठ्यांचं मार्गदर्शन असतंच! कोणकोणते कार्यक्रम बसवायचे? गणपतीची मूर्ती, प्रसाद, वर्गणी किती घ्यायची? डेकोरेशन कसं करायचं? इ.इ.
यंदा मी १० वीच्या वर्गात असल्यानं मी या गोष्टींमध्ये फारसा भाग घेऊ नये, असं माझ्या आई-पप्पांना वाटत होतं; पण मी त्यांना समजावलं की, या पाच-सात दिवसांचा माझ्या अभ्यासावर अजिबातच परिणाम होऊ देणार नाही, मग तर चालेल? मग मात्र मला घरून परवानगी मिळाली.
आम्ही सर्वच मित्रांनी ठरवलं की, संध्याकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत घरोघर जाऊन वर्गणी गोळा करायची जबाबदारी आपण घेऊया! कॉलनीतील ३०० घरे असणाऱ्या ८ बिल्डिंगमधील रहिवाशांना भेटून वर्गणी जमा करावी लागणार होती. आम्ही ८ मित्रांनी ती जबाबदारी घेतली. एक-एक इमारत एकेकाने करायची. जास्तीत जास्त वर्गणी गोळा करण्यासाठी अर्थातच 'कसब' लागणार होतं.
शाळा सुटल्यावर रोज तासभर आम्हा मित्रांची चर्चा व्हायची. मग आम्ही वर्गणी गोळा करायला इमारतींमध्ये शिरायचो. बऱ्याचदा अजून कोणी कामावरून आलेलं नसायचं, तर कोणी कामात असायचं. उद्या या, परवा या अशी उत्तरे ऐकायला मिळायची तर कोणी स्वखुशीनं, आपलेपणानं न कुरकुरता वर्गणी दयायचे. व्यक्ती तितक्या प्रकृती! एकदा तर एक काकू चक्क म्हणाल्या, अरे! आमच्या घरीपण गणपती बसतो ना! मग वेगळी वर्गणी कशाला? एवढे पैसे घेता त्याचा हिशोब देता का कधी?" त्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि त्यांना म्हणालो, 'काकू एकन्एक पैशांचा हिशोब ठेवतो आम्ही! तुम्ही एकदा वेळ काढून या ना पहायला! नाहीतर असं करता का तुमच्या राजूला पाठवता का, आमच्याबरोबर?
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी होते, असं त्या म्हणाल्यावर मात्र मला वाईट वाटलं. “काकू, तुम्हाला वाटेल तेवढीच वर्गणी क्या; पण चांगल्या कामात खोडा घालू नका. अहो, त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमतो सहा-सात दिवस! छान-छान कार्यक्रम आपल्या कॉलनीतील मुलं करतात. विविध गुणदर्शन दाखवण्याची त्यांना संधी मिळते. पाककलेचं कौशल्य पणाला लावून गृहिणी विविध खाद्यप्रकार करतात, छान रांगोळी काढतात, लहान मुलं विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवतात. हे सगळं करत असताना 'एकी'ची भावना, देशप्रेम हे आपोआपच रुजत जातं. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरू करण्यामागे लोक एकत्र यावेत, हाच हेतू होता ना!"
अशा रीतीने वर्गणी गोळा करण्याचं धनुष्य आम्ही मित्रांनी पेललं. आता वेगवेगळ्या समितींनीही आपापली कामं करायला सुरुवात केली होती. सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात मुली व महिला वर्ग दंगून गेला होता. मांडव, स्टेज, स्पीकर व्यवस्था करण्यात मोठी मुलं (आमच्याहून!) मग्न होती. तर 'काका' मंडळी इतर महत्त्वाची कामे बघत होती.
अशा रीतीने आम्ही सर्वांनी मिळून गणेशोत्सव आनंदानं आणि उत्साहानं पार पाडला. शिवाय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकही मी पटकावलं.
COMMENTS