My Favourite Hobby Reading Essay in Marathi Language : In this article " माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी ", " Maza Avadta Cha...
My Favourite Hobby Reading Essay in Marathi Language: In this article "माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी", "Maza Avadta Chand Vachan Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "My Favourite Hobby Reading", "माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी" for Students
कोणाला पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो, तर कोणाला बसची किंवा लॉटरीची तिकिटे जमा करावीशी वाटतात. कोणी मोराची पिसे जमवतं, तर कोणी पिंपळपाने पुस्तकात ठेवून त्याची जाळी कधी होईल याची वाट पाहतो.
माझ्या एका मित्राला 'लोकमत' वृत्तपत्रातील सुविचार कापून .एका वहीत चिकटविण्याचा छंद आहे, तर दुसऱ्या मित्राला नामवंत खेळाडू, अभिनेते, कलाकार यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद आहे.
मला मात्र वाचनाचा छंद आहे. कधी बरं हा छंद मला लागला? हाँ! आठवलं. आम्ही पूर्वी दादरला राहत होतो ना, तिथे माझे दोन मित्र होते. राजेंद्र आणि सुरेंद्र, दोघे भाऊ भाऊ. त्यांच्या घरी एक काचेचं कपाट होतं. ज्यामध्ये खूप सारी पुस्तक खाकी कव्हर घालून ओळीनं ठेवलेली होती. त्यानंच मला एकदा सांगितलं की, त्यांचे आई, बाबा, आजोबा आणि त्या दोघांच्याही वाढदिवसाला आवर्जून दोन-दोन पुस्तकांची खरेदी होते. त्यामुळे त्यांच्याकडे इतकी पुस्तकं आहेत.
मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीत आम्ही सर्वच मित्र दुपारच्या वेळेत त्यांच्या घरी बसून ती पुस्तकं वाचून काढायचो. परीकथा, विनोदी कथा, फास्टर फेणे, बालकथा, कुमार, चांदोबा अशी वेगवेगळी पुस्तकं आमचा वेळ छान घालवायची.
बघता बघता आम्हाला वाचनाचा छंद लागला. शाळा सुटल्यावरही आम्ही तासन्तास पुस्तकं वाचू लागलो. हळूहळू पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, व. पु. काळे, प्रवीण दवणे, नरेंद्र जाधव यांचंही लिखाण मला खुणवू लागले. आपली मराठी भाषा 'इतकी समृद्ध आहे की, आपण कितीही वाचलं तरी साहित्य वाचन संपणारच नाही.
आपल्या मराठीला संतलेखनाची परंपरा आहे. संतांनी लिहिलेली अभंग, ओव्या, भारुडं आपल्याला जीवनात कसं वागावं ते सांगतात.
अनेक लेखकांची प्रवासवर्णनं आपल्याला देशोदेशीची सफर घडवून आणतात. व्यक्तिचित्रं वाचून व्यक्तीव्यक्तीमधील वेगळेपण, स्वभाववैशिष्ट्य समजतं. तर शिंपल्यातील मोत्यासारख्या पुस्तकांमधून आपल्या जनरल नॉलेजमध्ये भर पडते. काही गोष्टी, कथा, चुटकुले, विनोद, शब्दकोडी मनोरंजनाबरोबरच माहितीही देतात. काही आरोग्यविषयक सल्ला देणारी पुस्तकं तर काही कलागुणांचा विकास करणारी पुस्तकं असतात. शिवणकला, पाककला, हस्तकला, कशिदा वर्क, ओरीगामी शिकवणारी तर मेंदी, रांगोळीचे असंख्य नमुने पुस्तकांमधून दिसतात. देवांच्या कथा, कहाण्या, अध्यात्म, Art of Leaving, यश कसं मिळवाल?, ज्योतिषशास्त्र इ. विषयांवर मार्गदर्शक अशी अनेक पुस्तकं दुकानांमधून दिसतात.
या माझ्या छंदामुळे झालं काय की, मी मैदानावर खेळायला मित्र नसले तरी घरी येऊन वेगवेगळी पुस्तकं वाचू लागलो. मी पुस्तकांच्या दुनियेत एवढा रमतो की, मला वेळेचं भानच राहत नाही. या छंदामुळे माझा खूप फायदा झाला. माझे विचार सुधारले त्यामुळे माझं निबंधलेखनही सुधारलं. लिखाणात मी निरनिराळ्या लेखकांचे दाखले देऊ लागलो.
माझ्या या छंदाविषयी सर्वांना माहिती असल्यानं माझे नातेवाईक, मित्रमंडळी आणि आई-बाबाही मला वाढदिवसाला पुस्तकंच भेट देतात. श्यामची आई हे माझं आवडतं पुस्तक. आता तर मी ऐतिहासिक कादंबऱ्याही वाचू लागलोय. त्यावेळची युद्धे, युद्धातील सामग्री, योद्धे यांच्याबद्दल वाचताना मला खूप कुतूहल वाटतं. शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा अंगात वीररस निर्माण करतात.
वाचनामुळे आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. मनाला आकार येतो. भूतदया शिकवणारी साने गुरुजींची कथा मला फार आवडली. मोठमोठ्या व्यक्ती कशा मोठ्या झाल्या, हे त्यांच्या आत्मचरित्रांतून समजतं. दहावीची परीक्षा संपल्यावर काय वाचायचं याची तर मी यादीच करून ठेवलीय; पण सध्या तरी फक्त अभ्यासाचीच पुस्तकं मी वाचतोय. कारण परीक्षा जवळ आलीये.
COMMENTS