Monday, 17 February 2020

श्रमाचे महत्व मराठी निबंध Shramache Mahatva Nibandh Marathi Madhe

Shramache Mahatva Nibandh Marathi Madhe: Today, we are providing श्रमाचे महत्व मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shramache Mahatva Nibandh Marathi Madhe to complete their homework.

श्रमाचे महत्व मराठी निबंध Shramache Mahatva Nibandh Marathi Madhe

'मज नकोत अश्रू, घाम हवा, घाम हवा
हा नव्या युगाचा, मंत्र नवा, मंत्र नवा ।'
दूरदर्शनवरील मराठी चित्रपटातील या दोन ओळींनी मला विचार करायला उद्युक्त केले.
Read also : सुसंगती सदा घडो मराठी निबंध
अश्रू हे भेकडपणाचे, भ्याडाचे लक्षण आहे. कोणापुढेही तोंड वेंगाडून, चार अश्रू ढाळून, आपला नाकर्तेपणा दाखवून दुसऱ्याकडून सहानुभूती मिळविण्यापेक्षा कष्ट करून, मेहनतीने आपल्याला हवं ते साध्यं केलं तर किती समाधान आणि आनंद मिळेल बरं!
श्रमालाच देव मानणारी आपली संस्कृती
'नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरि ॥
असं कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकरांनी म्हटलंच आहे. शेतात दिवसभर राबणारा शेतकरी आहे म्हणून आपण भुकेला भाकरी खाऊ शकतो. त्यानेच जर “मी का उन्हा-तान्हात, पाण्या-पावसात कष्ट करावेत", असा विचार केला तर आपणास उपवास घडलाच म्हणून समजा.
'आपला हात जगन्नाथ' या दोन हातांनी भरपूर कष्ट करावेत. कष्ट करणाऱ्याला झोपही शांत लागते.
याच हातांनी सकाळी उठल्याबरोबर दोन हस्तक तिसरे मस्तक झुकवून,
कराग्रे वसति लक्ष्मी,
करमध्ये सरस्वती।
करमुलेतु गोविन्दम्
प्रभाते कर दर्शनम् ॥
असं म्हणत आपल्या तळहातांचं दर्शन घेऊन नित्य कर्मास सुरुवात करावी.
आधी कष्ट मग फळ ।
कष्टाचे नाही ते निष्फळ ।
असं समर्थ रामदास स्वामी कष्टाचे महत्त्व पटवून देताना म्हणतात.
शारीरिक आणि बौद्धिक असे कष्टाचे साधारणतः दोन प्रकार मानता येतील. बुद्धिमान लोक आपल्या हुशारीच्या जोरावर डॉक्टर, इंजिनिअर होतात. सावलीतलं काम करायला त्यांना संधी मिळते.
ज्यांची बौद्धिक क्षमता कमी असते, त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी शारीरिक कष्ट करायला लाजू नये. कष्टाची लाज कशाला? (चोरी करायला लाज वाटावी!)
Read also : मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध
मिळालेले काम आवडीचे नसले तरी आवडीचे करून मनापासून, नियमितपणे केले तर कालांतराने ते आपल्याला आपोआप आवडू लागते.
मानवीजीवन जर सुखी बनवायचे असेल तर श्रम, सत्य या गोष्टींना महत्त्व मिळायला हवे. दारिद्र्य दूर करणाऱ्या यंत्रणा आपण पवित्र मानायला हव्या.
कवी विंदा करंदीकरही आपल्या 'पवित्र मजला' या काव्यातून श्रमाची प्रतिष्ठा सांगतात. कवी म्हणतात,
'पवित्र मजला जळजळीत ती, भूक श्रमांतून पोसवणारी
पवित्र मजला दगडी निद्रा, दगडाची दुलई करणारी.'
कष्टाचे नाही ते निष्फळ ।

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: