Saturday, 15 February 2020

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh

Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh : Today, we are providing मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh to complete their homework. 

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध Manavta Hach Khara Dharma Marathi Nibandh

'ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले घावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी घावीत.'
मॅडम वर्गात कविता शिकवत होत्या. मॅडमनी शिकवायला सुरुवात करतानाच सांगितले, “आज मी तुम्हाला मानवता धर्म म्हणजे काय? तो कुठे दिसतो? तो कुठे शोधायचा, हे सांगणार आहे."
साने गुरुजींनी अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत 'मानवता धर्माचं' वर्णन केलंय.
'खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे'
मानव ही एकच जात मानून कोणताही जातिभेद, वर्णभेद न करता सर्वांशी समान नात्याने, प्रेमाने, आपुलकीने, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत वागले तर मानवाचे दुःख फार मोठ्या प्रमाणात नाहीसे होईल.
Read also : मानवता धर्म मराठी निबंध
संपूर्ण जगातच शांतता, सुख, समृद्धी नांदावी यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा आपण अवलंब करायला हवा. असे वर्तन करणे म्हणजेच 'मानवता धर्म निभावणे.
दसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे प्राण गमावणाऱ्या बापू गायधनीने निभावला, तो मानवता धर्म.
ससाण्याचे प्राण वाचवण्यासाठी, ससाण्याच्या वजनाएवढे मांस आपली मांडी कापून शिकायला देणारा शिबी राजा निभावतो, तो मानवता धर्म.
आनंदवनात कुष्ठरोग्यांची सेवा करत आपले आयुष्य खर्ची घालणारे बाबा आमटे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय निभावतात, तो मानवता धर्म.
Read also : शक्ती गौरव मराठी निबंध
'क्षमेशिवाय खरे प्रेम असूच शकत नाही' असा संदेश देणाऱ्या, दीनदुबळ्या, दलित, अपंग, निराधार, परित्यक्ता अशा अनेक स्त्रियांची आधार बनलेली 'मदर तेरेसा यांनी निभावला, तो मानवता धर्म.
स्वतः अनाथ असतानाही हजारोंची 'माय' बनून त्यांचे अश्रू पुसणाऱ्या सिंधुताई सपकाळ निभावतात, तो मानवता धर्म.
“जीव वाचोनं पुन्य, जीव घेनं पाप."
असा महान विचार देत संत गाडगेबाबा मानवता धर्माचीच शिकवण देतात बरं! विचारांना खोली आली की कवीच्या काव्यातून ती झिरपताना दिसते.
'अनंता येवढे घावे, फुलांचे रंग न जावे।
उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे।।
जीवनात जगावे कसे, वागावे कसे, हे मानवताधर्म आपल्याला शिकवतो.
'ज्या वर्तनाने समस्त मानवजातीचे कल्याण होईल ते वर्तन शिकवणारा विचार, तो खरा धर्म.'
Read also : मदर टेरेसा ची मराठी मधे माहिती
मानवता धर्माला काळिमा फासणारी, इतिहासात घडून गेलेली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाने माणसाकडूनच माणसांचा आणि माणुसकीचा संहार त्याच्याच अनुयायांनी उधळून लावला.
ज्ञानेश्वरीचा समारोप करताना अठराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वरांनी विश्वेश्वराकडे पसायदान मागितले आहे. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानदेवांचे उत्तुंग, अतुलनीय असे व्यक्तिमत्त्व प्रकट होते. 'पसाय' म्हणजे प्रसाद. परमेश्वराचा कृपाप्रसाद मिळावा, ही त्यांची मागणी. त्यांनी हा प्रसाद स्वतःसाठी नव्हे तर अखिल जगतासाठी मागितला आहे. त्यात कुठेही स्वार्थाचा लवलेश नाही. उलट सर्व समाजाचे, जगाचे, विश्वाचे हित साधावे, कल्याण व्हावे म्हणून केलेली ही प्रार्थना आहे.
'जो जे वाछिल तो ते लाहो । प्राणिजात ।'

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: