Letter to Younger Brother in Marathi

Admin
0
Letter to Younger Brother in Marathi : Today, we are providing तुमच्या छोट्या भावाला 'आदर्श विद्यार्थी म्हणून त्याच्या शाळेकडून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Letter Writing in Marathi to Brother to complete their homework.

Letter to Younger Brother in Marathi

तुमच्या छोट्या भावाला 'आदर्श विद्यार्थी म्हणून त्याच्या शाळेकडून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.
॥श्री।।
शैला रा. जाधव
अचलपूर,
जि. अमरावती
२/१०/१२
चि. संकेत यास,
शुभाशीर्वाद
अभिनंदन! कालच आईने फोनवरून तुझा 'आदर्श विद्यार्थी' म्हणून शाळेमध्ये सत्कार झाल्याचे सांगितले. ऐकून खूप आनंद झाला. शाब्बास!
इयत्ता ८ वी आणि इयत्ता ९ वी या दोन्ही वर्षी सलगपणे तुला हा पुरस्कार मिळतो आहे. इयत्ता १०वी मध्येही तो मिळवून तू हॅट्रिक नक्की करशील, असा मला विश्वास आहे.
पुरस्कार तू मिळवलास; पण कॉलर मात्र माझी 'ताठ' झाली बरं का!
शाळेमध्ये सुरुवातीला शैलाचा भाऊ म्हणून तुला सगळेजण ओळखत होते; पण आता तू स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, प्रश्नमंजूषा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन तू शाळेच्या नावलौकिकात भर टाकलीस. नियमितपणे मैदानावर खेळ, सकस आहार आणि अभ्यासाची गोडी यामुळे एकही दिवस शाळेत गैरहजर नसल्याने तुझे मा. मुख्याध्यापकांनी खास कौतुक केल्याचं आई सांगत होती.
‘आदर्श विद्यार्थी' म्हणून जसा तुझा गौरव झाला त्याचप्रमाणे समाजातही आदर्श व्यक्ती म्हणून तुझा सन्मान व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुझ्यावर झालेल्या संस्कारामुळे ती इच्छा पूर्ण होईल, यात शंकाच नाही.
पुन्हा एकदा तुझे अभिनंदन! आई-दादांना माझा नमस्कार सांग. दोन दिवस जोडून सुट्टी आल्यावर मी तुम्हाला भेटायला नक्की येईन.
तुझी ताई
शैला


(येताना बक्षीस म्हणून तुझ्यासाठी खास पार्करचा पेन सेट घेऊन येईन.)
Read also:
अभिनंदन पत्र लेखन मराठी
पत्रातून सहलीचे वर्णन करा

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !