Complaint Letter to Postmaster in Marathi: Today, we are providing article on पोस्टमास्टरला तक्रार पत्र मराठी मध्ये, "letter of complaint to postmaster in marathi" For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12 students.
Complaint Letter to Postmaster in Marathi पोस्टमास्टरला तक्रार पत्र मराठी मध्ये
अ. ब. क.
४/१४, ६ श्रीराम, पुणे
१० ऑक्टोबर २०१६
प्रति,
सीनिअर पोस्ट मास्टर
जनरल पोस्ट ऑफिस
विषय - टपाल वेळेवर मिळणेबाबत.
महोदय,
नुकताच म्हणजे नऊ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन साजरा झाला, त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन! १ ऑक्टोबर १८५४ मध्ये सुरू झालेल्या, गेली १६२ वर्षे अव्याहत काम करणाऱ्या टपाल सेवेचा व्याप प्रचंड वाढला आहे हे जरी मान्य असले तरी ४ सप्टेंबर २०१६ रोजी मी पोस्टाने पाठवलेले एक पत्र संबंधितांना मिळालेले नाही. दै. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'थेंक यू' सदरासाठी मी आभार मानणारा लेख लिहिला होता. माझ्या मित्राने मला वेळेवर मदत केल्याने माझ्या आईचे प्राण वाचले होते, त्यासाठी त्याचे जाहीर आभार मला मानायचे होते; पण ते पत्रच अजून म. टा. कार्यालयात पोहोचले नसावे. आमचा टपाल खात्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आमचा सर्व पत्रव्यवहार टपाल खात्यामार्फतच करतो. कृपया आपण लक्ष घालून चौकशी करावी, ही नम्र विनंती.
(पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवले होते.)
आपला विश्वासू
अ. ब. क.
प्रति,
सीनिअर पोस्ट मास्टर
जनरल पोस्ट ऑफिस, पुणे ४११ ००१
अ. ब. क.
४/१४. 'श्रीराम पुणे
0 comments: