Complaint Letter to Bus Depot Manager in Marathi: Today, we are providing article on बस डेपो व्यवस्थापकास तक्रार पत्र मराठीमध्ये For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12 students.
Complaint Letter to Bus Depot Manager in Marathi बस डेपो व्यवस्थापकास तक्रार पत्र मराठीमध्ये
अ. ब. क.
शारदा विद्यालय, सांगवी, पुणे
२४ जुलै २०१६
प्रति,
मा. वाहतूक व्यवस्थापक,
पुणे / पिं. चिं. परिवहन मंडळ
पुणे
विषय - बस थांब्यावर बस थांबणेबाबत.
महोदय/महोदया,
अ. ब. चौक, पुणेकडे सांगवीहून जाणारी बस सांगवी येथील पाण्याची टाकी' हा बस थांबा असूनही बऱ्याचदा तेथे बस थांबतच नाही. पुण्याकडे जाणारे आसपासच्या परिसरातील अनेक रहिवासी आणि आम्ही विद्यार्थी या सर्वांसाठी तो बस थांबा सोयीचा आहे. तरी कृपया आपण व्यक्तिशः लक्ष घालून सदर समस्या सोडवली तर आम्हा सर्वांची गैरसोय टळेल.
तसदीबद्दल क्षमस्व!
कळावे,
आपला विश्वासू,
अ.ब.क.
प्रति,
मा. वाहतूक व्यवस्थापक,
पुणे / पिं.चिं. परिवहन मंडळ
म.न.पा. विभागीय कार्यालय, पुणे - ४११ ००४
प्रेषक
अ.ब.क.
शारदा विद्यालय,
सांगवी, पुणे
0 comments: