Friday, 4 October 2019

माझे आदर्श गाव मराठी निबंध - Maza Adarsh Gaon Essay in Marathi

Maza Adarsh Gaon Essay in Marathi Language : Today, we are providing माझे आदर्श गाव मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Adarsh GaonMy Village Essay in Marathi Language to complete their homework.

माझे आदर्श गाव मराठी निबंध - Maza Adarsh Gaon Essay in Marathi


'खेड्यामधले घर कौलारू
आठवणींच्या आधी जाते तेथे
माझ्या मनाचे निळे पाखरू'
आजपर्यंत बऱ्याच शहरांना, ठिकाणांना भेटी देण्याची संधी मिळाली. मात्र असे असले तरी गावी जाण्याची ओढ काही वेगळीच आहे !

रत्नागिरी शहरापासून पुढे ६० किलोमीटरच्या अंतरावर माझे ‘मिय' नावाचे निसर्गरम्य गाव आहे. माझे गाव अगदी निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. गावाला दोन्ही बाजूंनी सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्राचे खास वैशिष्ट्य असे की, एका बाजूचा निळाशार समुद्र आहे, तर दुसरीकडे पांढरा समुद्र आहे. सुदैवाने तिथे भेट देणारे गावातील स्थानिक तसेच पर्यटकही समुद्राकिनारी कचरा होणार नाही, याची काळजी घेत असल्याने आजही दोन्ही समुद्रकिनारे स्वच्छ आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी किनाऱ्यावर रपेट मारताना स्वच्छ मोकळ्या वातावरणात फिरण्याचा अनुभव अगदी निराळाच ! समुद्र किनाऱ्याच्या वरच्या अंगाला उंच डोंगररांगा आहेत. अगदी चित्रात दाखवतात ना तशाच. डोंगर घाट चढताना लागणाऱ्या वळणातून गाडी वरवर जाताना खालचे दृश्य अगदी डोळ्यांना सुखावणारे, आनंद आणि आश्चर्याच्या भावनेचा एकत्र अनुभव देणारे आहे. डोंगरावर काळे कातळ लांबच्या लांब पसरलेले दिसते. उंच डोंगरावरून प्रत्येकाच्या आमराई, नारळी-फोफळीच्या बागा अगदी लहान लहान दिसतात. त्यांच्यामध्ये कौलारू घरांची नक्षी दिसते. Read also : माझी आई निबंध मराठी

आमच्याकडे पावसाचे प्रमाण जास्त, त्यामुळे कौलारू घरे त्यांची छपरे उतरती आहेत. वरुण राजाच्या कृपेने भरपूर पाऊस होतो, त्यामुळे पावसाच्या चार महिन्यानंतरच्या काळातसुद्धा गावातील विहिरींना मुबलक पाणी असते. सुरुवातीला सर्वच घरे मातीची लिंपण असलेली होती. आता चिऱ्यांचा वापर करून पक्की मजबूत घरे बांधलेली आहेत. आमच्या गावातील प्रत्येक घरासमोर ऐसपैस अंगण आहे. अंगणात अगदी दारासमोर तुळशी वृंदावन, घराभोवती माती आणि दगडांचे कुंपण असलेली गडगा ही घरांची वैशिष्ट्ये. या अंगणात दिवाळीच्या वेळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची गप्पांची मैफल जमते. चांदण्यारात्री तर अंगणात उशीरापर्यंत बसून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देणे हा अनुभव तर शब्दांत बांधता येणे अशक्य आहे. Read also : एक रम्य पहाट मराठी निबंध

गावाच्या मध्यभागी 'आई नवलाईचे' प्राचीन मंदिर आहे. ही गावाची ग्रामदेवता आहे. मंदिराला मोठे प्रशस्त असे आवार आहे. आवारात उंच दगडी दिपमाळ आहे. उत्सवाच्या, सणांच्या दिवशी या दिपमाळेतील पेटलेल्या दिव्यांची शोभा सायंकाळी पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. मंदिराच्या आवाराच्या डाव्या बाजूला छोटेखानी दत्ताचे मंदिर आहे. त्रिमुखी दत्ताची मूर्ती फारच सुंदर आहे. मंदिराचा परिसर पूर्ण शांत असल्याने इथे आल्यावर मनाला कमालीची शांती अनुभवायला मिळते.

सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर वातावरणाची शोभा अवर्णनीय असते. घरांना लागूनच असणाऱ्या गोठ्यातून जनावरे एकामागोमाग चरायला निघतात. त्यावेळी माहेरवाशीणी, सासरवाशीणी स्त्रिया पाण्याच्या घागरी विहिरीवरून भरून आणतात. अंगणात भल्या पहाटे असलेल्या प्राजक्ताचा गंध चहूबाजूस दरवळत असतो. घराघरांच्या आजूबाजूला असलेल्या माड, फोफळी, फणस, आंबा या झाडांवर असणाऱ्या पक्षांचे कर्णमधूर गुंजन तर शहरात दुर्मिळच.

गावातील नवी पिढी तर मुंबईतच वास्तव्याला आणि नोकरी, व्यवसाय करणारी आहे. गावातील मुख्य व्यवसाय भातशेती आहे आणि मे महिन्याच्या हंगामात आंब्याचा व्यापार केला जातो. भातशेती पावसाच्या पाण्यावर होते व इतर फळफळावळ तसेच भाजीपाला विहिरीच्या पाण्यावर होतो. Read also : शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी

गावातील माणसांचे राहणीमान साधेच आहे. गावात गणपती, दसरा, होळी, गुढीपाडवा हे सण तसेच ग्रामदेवतेचा वार्षिक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. विविध जातीधर्माचे लोक गावात एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सहकार्याने गावात रस्ते बांधण्याची यशस्वी योजनाही पार पडली आहे.

शिक्षणाच्या सुविधाही दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. माझ्या गावातील प्रत्येक विदयार्थी संगणक उत्तमरित्या हाताळू शकतो. गावातील तरुण विदयार्थी वर्ग एकत्र येऊन नवे नवे उपक्रम राबवतात. त्यामुळे आमच्या गावाला 'व्यसनमुक्ती गाव' म्हणून घोषित केले आहे. तसेच ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत देण्यात येणारे, ‘संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान' २०१३ चा पुरस्कार शासनाकडून गावाला प्राप्त झाला आहे. read also : माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी

माझ्या गावाचा तसा खास असा इतिहास नाही; पण अंगणात गप्पा मारताना आजीच्या तोंडून माझ्या गावाची जन्मकथा ऐकली आहे. तिच्या सांगण्यानुसार, 'जेव्हा भगवान रामचंद्र लंकापती रावणासोबत युद्ध करीत होते, तेव्हा केलेल्या युद्धात रावणपुत्र इंद्रजीत याने लक्ष्मणावर जे अस्त्र सोडले, त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाला व त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान द्रोणपर्वत उचलून घेऊन जात असताना त्यातला एक मिरी एवढा पर्वताचा तुकडा खाली पडला त्यातूनच पुढे आमच्या गावाला मिऱ्या हे नाव पडले.'

पहाटेचा सूर्योदय जसा मनालाच भुरळ घालणारा असतो, तसाच सायंकाळचा सूर्यास्तसुद्धा मनाला हुरहूर लावून जाणारा असतो. दोन्ही वेळी निसर्गाचे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे असते. त्यातच उंच लाटांसह उचंबळणारा समुद्र, मोसमातला आंबा-फणस-काजूचा तो दरवळणारा सुगंध, ती लाल माती, वरवर पाहता स्वभावाने कडक वाटणारी; पण फणसातील गऱ्याप्रमाणे कोमल मनाची माणसे हे सर्व अगदी मनाला वेड लावतात, म्हणूनच दरवर्षी सुट्टीत नवा अनुभव घ्यायला माझे मन गावाकडे धाव घेते.

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: