Maza Avadta Mahina Shravan Nibandh in Marathi : Today, we are providing माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10,...
Maza Avadta Mahina Shravan Nibandh in Marathi : Today, we are providing माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Mahina Shravan Marathi Nibandh to complete their homework.
माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी - Maza Avadta Mahina Shravan Nibandh in Marathi
तुला कोणता महिना आवडतो असा प्रश्न कोणी केल्यास मी चटकन उत्तर देते, 'श्रावण' माझा आवडता महिना श्रावण आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणासही आवडेल असाच आल्हाददायक व मन प्रसन्न करणारा हा श्रावणमास असतो. श्रावणातील वातावरण आल्हाददायक असते. तो
मराठी आनंदाची जणू लयलूटच करत असतो, म्हणून की काय बालकवींनी म्हटले आहे, “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येत सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे।" Read also : माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू
श्रावण महिन्यातील निसर्गाचे रूप जसे मोहनीय असते, तसे ते अन्य महिन्यांत दिसत नाही. या काळात पाऊस सुरू असल्याने वने हिरवीगार बनून पावसाच्या पाण्यात न्हाऊन आनंदाने डोलत असतात. धरतीने जणू हिरवा शालूच परिधान केलेला असतो. जिकडेतिकडे हिरव्या रंगाची उधळण झालेली दिसते.
श्रावणातील पाऊस तर अगदी सुखावणारा असतो. हळूवार सरी रिमझिमत येतात आणि तितिक्यात त्या अदृश्य होऊन ऊनही दिसू लागते. ऊन-पावसाचा असा खेळ चालू असतो आणि आपली मात्र छत्री उघडणे-बंद करण्याची कवायत सुरू होते. अशाच उन्हात जेव्हा गवतावर पडलेले पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशामुळे चमकू लागतात किंवा पावसाच्या खेळात आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते, तेव्हा तर डोळ्यांचे पारणेच फिटते.
वृक्ष, वेलींचा शृंगार तर पाहण्यासारखा असतो. कारण त्यावर फळा-फुलांचा बहर दिमाखात विराजमान झालेला असतो. श्रावणातील प्रत्येक दिवसाला त्याचे स्वत:चे धार्मिक महत्त्व असल्याने पूजेसाठी लागणारी साहित्यसामग्री म्हणजे विविध पत्रीफूले यांमुळे तर रान अधिक सुंदर दिसते. Read also : राखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध
या काळात व्रतवैकल्ये पार पाडली जातात, म्हणून श्रावणात स्त्रियांच्या उत्साहाला तर उधाणच आलेले असते. रोजच्या नव्या सणांमुळे या दिवसांत त्यांच्या नटण्या-थटण्याला भरपूर वाव मिळतो. त्या निमित्ताने खेळण्या-बागडण्याची, माहेरी जाण्याची संधी त्यांना मिळते. त्यांच्यातील उत्साह जणू ओसंडून वाहत असतो. रोज गोड-धोड खायला मिळाल्यामुळे बच्चेकंपनीही खुश असतात. व्रतवैकल्य-पूजाअर्चा यामुळे घरांतले, मंदिरांतले वातावरण भक्तीने भरून गेलेले असते. या महिन्यात मंदिरांमध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते.
श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमी या सणाला नागाची पूजा केली जाते. निसर्गातील या घटकाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली संस्कृती किती उदात्त आहे, याचा परिचय यावरून होतो. नारळीपौर्णिमेला सागराची पूजा केली जाते. श्रीकृष्ण मंदिरातून गोकुळाष्टमीचा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी दहीहंडी खेळली जाते. तर श्रावण संपता संपता बळीराजा आपल्या कष्टाळू बैलांची बैलपोळ्याला पूजा करतो. त्यांना प्रेमाने पुरणपोळीचा घास भरवतो.
निसर्गाच्या विविध रूपांचे देखणे रूप या श्रावण महिन्यात अनुभवायला मिळते. तर अशा या सौंदर्याला लेखक कवी न भुलले तर ते नवलच ! उगीच का वेगवेगळ्या कवींनी आपपल्या कवितेत श्रावण रंगवला ! “श्रावणात घननीळा बरसला रिमझिम रेशीम धारा” असे थोर गायिका लता मंगेशकरांच्या स्वरातले गाणे आपण ऐकतो, तेव्हा श्रावणमासाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. ज्येष्ठ लेखिका दुर्गा भावतांच्या 'ऋतुचक्र' या पुस्तकातील श्रावण महिन्याचे सूक्ष्म तपशीलासह आलेले वर्णन श्रावणमासाइतकेच आनंददायी वाटते. त्यांनी तर श्रावणमासाला ‘हिरवा श्रावण' असे म्हटले आहे.
श्रावण महिन्यात धकाधकीचे, प्रचंड धावपळीचे शहरी जीवन जगणारी माणसे वर्षा सहलीला जातात व श्रावणातील या निसर्गसौंदर्याचा आनंद भरभरून लुटतात.
असा हा जीवनातली सगळी मरगळ क्षणात झटकून टाकणारा व चैतन्यजागृत करणारा श्रावण महिना मला अद्वितीय आनंद देणारा वाटतो.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
This essay is provided to you by Target Publication. Please visit there website here in order to fine good Marathi books.
COMMENTS