Vrudhashram Manogat Nibandh in Marathi : In this article वृद्धाश्रमाचे मनोगत निबंध मराठी , " मी वृद्धाश्रम बोलतेय मराठी आत्मकथन ",...
Vrudhashram Manogat Nibandh in Marathi: In this article वृद्धाश्रमाचे मनोगत निबंध मराठी, "मी वृद्धाश्रम बोलतेय मराठी आत्मकथन", "Vrudhashram Manogat Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Vrudhashram Manogat", "वृद्धाश्रमाचे मनोगत निबंध मराठी", "मी वृद्धाश्रम बोलतेय आत्मकथन" for Students
नमस्कार मंडळी, या ना आत, या! हे काय, किती वेगवेगळे भाव तुमच्या चेहऱ्यावर उमटलेत मला पाहून! असं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? हेही एक घरच आहे. जिथं समवयस्क स्त्री-पुरुष मंडळी अगदी मोकळेपणानं, मुक्तपणे बागडू शकतात. त्यांचं हसणं, गप्पा मारणं एकमेकांत मिसळून जाणं नाही आवडलं तुम्हाला? या धकाधकीच्या जीवनात तरुणवर्गाला आपल्या घरातील वयोवृद्धांची काळजी घ्यायला, त्यांच्याशी बोलायला वेळ तरी कुठं आहे?
घरातील स्त्री अर्थार्जन करायला उंबऱ्याच्या बाहेर पडली आणि सारी कुटुंबव्यवस्थाच बदलून गेली. लहान मुलांसाठी पाळणाघरं आणि वृद्धांसाठी वृद्धाश्रम.
नवीन पिढीला नाही हो मी दोष देत; पण हेच बघा ना लहान मुलांचं आवरायचं, घरातील सर्व करायचं, वृद्धांची काळजी, त्यांचं खाणं-पिणं ही सारी कसरत करता करता घरातील स्त्रीची किती तारांबळ उडते ना!
मी एक भाग्यवान वास्तू समजतो स्वतःला! वयानं, कर्तृत्वानं मोठमोठ्या पदांवर साजेसं काम करून आता आयुष्याच्या संध्याकाळी ही सगळी मंडळी इथं निवांत पाहताना मला समाधान वाटतं. त्यांनीही आयुष्यभर खस्ताच खाल्ल्या आहेत ना! जेव्हा ही सगळी मंडळी एकत्र जमून गप्पा मारतात, त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा काय भारी वाटतं सांगू? हो, आता काही मंडळी इथं स्वखुशीनं आली आहेत तर काही नाइलाजानं! काहींना अजून आपले मोहाचे 'पाश' तोडता आले नाहीत. ते इतक्या सहजासहजी तुटणारही नाहीत! पण काळजी. दुःख करत रडत बसण्यापेक्षा आहे तो क्षण आपला म्हणत आनंदानं का बरं घालवू नये? इथं त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. त्यांच्या आवडीचं काम. त्यांना करावंसं वाटलं तरच करायचं. त्यांच्या खाण्या पिण्याची, औषध-पाण्याची सगळी जबाबदारी इथले कार्यवाहक घेतात ना! फक्त पैसे भरायचे आणि निवांत राहायचं! शिवाय इथल्या सभागृहात मोठ्या पडद्यावर चित्रपट, नाटकाच्या C.D. दाखवल्या जातात. इथं त्यांचे वाढदिवस साजरे होतात. त्यांच्या सहलीदेखील निघतात. आणखी काय हवं हो?
काय म्हणता? मायेची माणसं नसतात जवळ? पण मायेच्या माणसांना त्यांच्यासाठी वेळ कुठे असतो, सांगा ना? तसं येतात ना, ते कधीमधी वर्ष-सहा महिन्यांनी भेटायला, चौकशी करायला! अधूनमधून फोनहीं चालू असतातच की! अहो, मोबाइलचा जमाना आहे.
पण खरं सांगू? दिवसभर मुखवटे घालून हिंडणारी ही मंडळी कित्येकदा रात्रीच्या अंधारात पांघरुणाच्या आत हुंदके देताना मी ऐकलंय. शेवटी सुख म्हणजे काय असतं हो? आपल्या नातवंडांना मोटं होताना पहायचं सुख या मंडळींच्या नशिबात नाही. दुखण्या-खुपण्याच्या वेळी मायेनं चौकशी करणारे, प्रेमाचे दोन शब्द त्यांच्या 'आपल्या' माणसांकडून त्यांना ऐकायला मिळत नाहीत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी झिजलो, त्यांच्याकडूनच उपेक्षितासारखी वागणूक मिळावी हे काही चांगलं नाही!
मी जरी निर्जीव वास्तू असलो तरी माझ्या कुशीत मी त्यांना निवांतपणा दिलाय, निवास दिलाय! रोज रात्री झोपतान ही मंडळी परमेश्वराला हेच मागणं मागत असावेत की, देवा उदयाचा सूर्योदय माझ्यासाठी थोडासा वेगळा असू दे!
COMMENTS