मला आवडणारी व्यक्ती - My Favourite Person Marathi Essay
आमचे दादरमधील घर सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे आहे. मला हे घर विशेष आवडते; कारण मला तेथे मिळणारा गोविंदकाकांचा शेजार ! गोविंदकाका ही माझी सर्वांत आवडती व्यक्ती.
Related Essays : निसर्ग माझा गुरु मराठी निबंध
गोविंदकाकांनी वयाची साठी केव्हाच ओलांडली आहे. पण मला ते आपल्या अगदी बरोबरीचे वाटतात. अभ्यासातील कोणतीही शंका ते सहजगत्या सोडवतात. काकांशी चर्चा केल्यावर निबंधासाठी भरपूर मुद्दे मिळतात. भूमितीतील अवघड प्रश्न ते अगदी सोपे करून टाकतात. विज्ञानातील एका प्रश्नाचे उत्तर शोधताना काका मला इतकी नवी नवी माहिती देतात की, मी ज्ञानाने समृद्ध होतो.
Related Essay : मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध
गोविंदकाका हे ब्रह्मचारी आहेत. ते एकटेच राहतात आणि भरपूर वाचन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर खूप गमतीजमती कळतात. काका कधी मला कोडी घालतात. कधी ते मला त्यांच्या विद्यार्थिदशेतील वा तरुणवयातील हकिकती सांगतात. तेव्हा तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.
Related Essay : शब्द हरवले तर मराठी निबंध
गोविंदकाका कधी कंटाळलेले, वैतागलेले वा चिडलेले दिसत नाहीत. ते । कोणालाही दोष देत नाहीत. ते चांगलेच खवय्ये आहेत. ते खायचे पदार्थ नेहमी घेऊन येतात. त्यांना नवेनवे पदार्थ बनवायला आवडतात. मग अशावेळी मी त्यांना हाताशी लागतो. असे हे गोविंदकाका माझी सर्वांत आवडती व्यक्ती आहे.
Related Essay : महागाईचा भस्मासूर मराठी निबंध
0 comments: