Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi : Today, we are providing माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 1...
Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi : Today, we are providing माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi to complete their homework.
माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi Lekhan
ऑफ तासाला आलेल्या शिंदेसरांनी आम्हाला निबंध लिहायला सांगितला, विषय दिला 'माझे आवडते शिक्षक.'
क्षणाचाही वेळ न दवडता मी लिहायला सुरुवात केली. आम्हाला मराठी शिकविणाऱ्या रेखा मुधोळकर मॅडम माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत.
Read also : माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन
Read also : माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन
त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भुरळ पाडणारे आहे. गोऱ्यापान, गोड आवाज, अभ्यासू, उच्चशिक्षित, स्पष्ट शब्दोच्चार असणाऱ्या मॅडम आम्हाला कविता गाऊन दाखवायच्या. त्यांच्या गाण्याच्याही परीक्षा झाल्या होत्या.
त्यांचे शिकवणे इतके छान होते की, त्यांनी पाठ वाचून दाखवला तरी लगेच समजायचा. कारण पाठाचे वाचन आवाजातील चढउतारांसह असे. संवाद वाचनही वेगळेपण कळेल असे असायचे. ग्रामीण भाषा ही सहजपणे, सराईतासारखी योग्य त्या विरामचिन्हांसह, प्रश्नचिन्हांसह असायची आणि तेच आम्हा मुलांना खूप आवडायचे.
कविता | पाठ शिकवण्यापूर्वी फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात त्याचे नाव, कवी | लेखकाचे नाव, संदर्भग्रंथाचे नाव लिहिले जायचे. शिकवता-शिकवता येणारे नवे शब्द, त्यांचे अर्थ, समांतर शब्द, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते त्या लिहीत. त्याचे अर्थ सांगितले जायचे. त्या विषयात तल्लीन होऊन शिकवत.
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
Read also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध
आमची मराठी विषयाची वही आम्हाला निबंधलेखनात खूप मदत करणारी ठरायची. त्यांनी आम्हाला इ. ८वीपासून मराठीच्या वह्या सांभाळून ठेवायला सांगितल्या होत्या.
गृहपाठ पण फक्त धड्याखालचे प्रश्न नसायचे तर त्या कवी/लेखकाचे अन्य कोणते लेखन आहे? ते शोधून वाचण्याचा आग्रह असायचा.
त्यांचा एक गुण होता. मी त्यांना शिक्षकखोलीत कधीच निवांत बसलेले पाहिले नाही. त्या सतत काही ना काही वाचायच्या. निबंध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळविण्याचा त्यांचा छंद होता. त्यामुळे शाळेचा सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडेच होता. त्यामुळे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम 'खास' करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
त्या आमचे प्रेरणास्थान होत्या. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यायला त्या उद्युक्त करायच्या, मार्गदर्शन करायच्या. 'स्पर्धेत उतरायचं ते मुळी जिंकण्यासाठीच', असं म्हणून आमचा आत्मविश्वास वाढवायच्या.
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
Read also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध
त्यांनी भरपूर प्रवास केला होता. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्या फिरून आल्या होत्या. ऑफ तासाला त्यांनी लिहून ठेवलेली प्रवासवर्णने ऐकून आम्हालाही फिरून आल्याचा आनंद मिळायचा.
आदर्श शिक्षिका, गुणवंत शिक्षिका म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे.
अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या मॅडम नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाचे, आनंदाचे, आरोग्याचे जाणार यात शंकाच नाही. कारण त्यांनी घेतलेला ज्ञानाचा वसा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळला आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या लाडक्या मॅडमला शतशः प्रणाम!
COMMENTS