माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध - Maza Avadta Chand Singing & Dancing Nibandh Marathi

Admin
0
Today, we are publishing माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Maza Avadta Chand Singing & Dancing Nibandh Marathi) in completing their homework and in competition.

माझा आवडता छंद गायन, वाचन मराठी निबंध - Maza Avadta Chand Singing & Dancing Nibandh Marathi

'रिकाम्या मनात भूतांचा संचार' असे म्हणतात, इथे भूते म्हणजे रिकामपणी माणसाच्या मनात येणारे वाईट विचार. हे टाळण्याचे उत्तम साधन म्हणजे 'छंद.'

माझ्या आवडत्या छंदाविषयी लिहिणे तसे अवघडच आहे. कारण ज्याप्रमाणे 'साप कात टाकतो' त्याप्रमाणे मीसुद्धा जुने छंद टाकून नवे नवे छंद जोपासले आहेत.
अगदी लहानपणी अंगणातील झोपाळ्यावर बसून काऊ-चिऊ बघत किंवा चांदोमामा आणि चांदण्या बधत आईकडून भरवून घेणे, हा माझा आवडता छंद होता. थोडं मोठं झाल्यावर पाण्यात खेळायला मिळावे म्हणून बागेतील झाडांना पाणी घालणं आणि रविवारी घराचा व्हरांडा धुऊन काढणं, झाडावर चढणं हे माझे आवडते छंद झाले. भातुकलीसाठी मातीचा लगदा करून भांडी तयार करणे व ती उन्हात वाळवणं हा तर अगदी जीवाला पिसं लावणाराच छंद होता

त्यानंतर झुक-झुक गाडीची आणि लाललाल बसची तिकीटं जमा करण्याचा नाद मी जोपासला. झाडांची पानं आणि सोड्याच्या बाटलीची पत्र्याची बूचं गोळा करण्यास मी सुरवात केली कारण त्या बूचांनी पानांना कातरून पैसे तयार करून खेळता येई. मग पुस्तकात विविध फुलांच्या पाकळ्या आणि पानं ठेवण्याचा, पिंपळाचं पान ठेवून त्याची जाळी निरखण्याचा उद्योग पार पडला. याबरोबरच हळूहळू पोस्टाची तिकिटे जमा करणे, वहीत चिकटवणे यांची आवड निर्माण झाली.

असे छंद जोपासत असतानाच एक दिवस हातात, 'शामची आई' पुस्तक आलं आणि आजपर्यंत मी जपलेला वाचनाचा छंद लागला. मग लहान मुलांची 'चांदोबा, किशोर' सारखी मासिके आणि जे हातात मिळेल ते मी वाचू लागले. अशाच एका मे महिन्याच्या सुटीत दादाने समोर बसून एक पूर्ण रहस्यकथा वाचायला लावली. अन काळा पहाड, धनंजय, छोटू इ. च्या रहस्यकथांनी मी झपाटले आणि आपणही गुप्तहेर होण्याची स्वप्ने पाहू लागले.

थोडं मोठं झाल्यावर या रहस्यकथांची जागा कथा, कादंबऱ्या यांनी घेतली. मग स्वामी, छावा, श्रीमानयोगी इ. ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून वाटू लागले. खरंच त्याकाळी आपणही असू का? मग 'मृत्युंजय' वाचलं अन या पुस्तकांच्या अमाप खजिन्याने मला वेडचं लावलंचं.

या वाचनाच्या छंदाने मी इतकी झपाटले की मैत्रिणी आल्या तरी माझी मानही वर होत नसे. याबरोबरच मनाचे श्लोक, बालकवी, तांबे, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज इ. च्या कविता म्हणजे माझ्यासाठी एक अमूल्य ठेवाच झाल्या.

शाळेत बाईंनी सांगितल्यामुळे 'एक होता कार्व्हर' तोतोचान, अग्निपंख वाचले अन हे सारं मनावर कायमचंच ठसलं, मग चरित्रात्मक, पुस्तकांची आवड निर्माण झाली. 'यस, आय डेअर' आमचा बाप अन् आम्ही, इंदिरा इ. चरित्रे वाचून मी नुसती भारावलेच नाही तर 'ध्येयासाठी झपाटणे म्हणजे काय?' हे खऱ्या अर्थाने जाणले.

वाचनाच्या या छंदातूनच पुढे 'श्रवणभक्ती निर्माण झाली. आजूबाजूला होणारी व्याख्यानं ऐकण्याचा छंद आता वाचनाच्या जोडीला आला आहे आणि यातूनच विविध स्तरातील प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेणं, कधी कधी त्यांच्याकडून एखादा संदेशही मागणं, हा ही छंद नकळतपणे रुजू लागलाय.

छंदांना काहीवेळा 'काय हा नादिष्टपणा!' अशा शब्दात हिणवलं जातं. मला मात्र आजपर्यंत कधीच असं वाटलं नाही की 'छंद' वाईट आहे. वाचनाचा माझा छंद तर भाषा विषयातील माझ्या प्रगतीसाठी पूरकच ठरला आहे. विविध प्रकारच्या वाचनामुळेच अनेकदा माझे निबंध शाळेच्या भित्तीपत्रकावर झळकतात किंवा शिक्षक चांगला निबंध म्हणून वर्गात वाचून दाखवतात.

असे हे माझे बदलत गेलेले लहानपणापासूनचे विविध छंद. ते ते छंद त्या त्या वयात आवडत होते. पण आता मात्र वाचन, श्रवण आणि स्वाक्षरी घेणे हे माझे आवडते छंद झाले आहेत. पुढचं मात्र आत्ता सांगू शकत नाही. पण मला मात्र 'रिकाम्या मनात भूतांचा संचार' ही भीती वाटत नाही. कारण हा छंद जीवाला लावी पिसे!"
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !