Saturday, 8 February 2020

वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध Vruttapatra Band Padli Tar Marathi Nibandh

Vruttapatra Band Padli Tar Marathi Nibandh Lekhan : Today, we are providing वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध लेखन  For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Vruttapatra Band Padli Tar Marathi Nibandh Lekhan to complete their homework. 

वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध Vruttapatra Band Padli Tar Marathi Nibandh

सकाळच्या चहाबरोबर वाचायला वृत्तपत्र नसेल तर...
आज आठ वाजून गेले तरी वृत्तपत्र कसं आलं नाही? माझे लक्ष सारखे समोरच्या दाराकडे होते.
वृत्तपत्र आणणाऱ्या मुलाला बरं नसेल की, वृत्तपत्राची गाडीच आली नसेल? असे प्रश्न मनात सतत येत होते. माझी घालमेल पाहून माझ्या बहिणीनं मला "दूरदर्शनवर बातम्या बघ की रे दादा" असं सुचवलं. “एवढं काय आहे त्या पेपरात?" असही विचारलं
Read also : वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी
"अगं, वृत्तपत्र म्हणजे फक्त काही बातम्याच नसतात. आणखीही बरंच काही असतं त्यात छापून आलेलं."
"म्हणजे? तुझा फोटो येणार होता का आज?"
"ए आई, सांग ना गं हिला!"
"बरं बरं, हा घे आला तुझा पेपर, वाच आता निवांत.” मनात विचार आला आपल्या जीवनात वृत्तपत्रांचे स्थान किती महत्त्वाचे आहे बरं, ही वृत्तपत्रे बंद झाली तर...
स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी फार मोठी मोलाची कामगिरी बजावली होती. वृत्तपत्र हे समाजातील प्रत्येक वर्गावर परिणाम करणारे अत्यंत परिणामकारक माध्यम आहे. वृत्तपत्रांमधील अग्रलेखांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांना प्रवृत्त केले व त्याचा वाटा या स्वातंत्र्यचळवळीत अविभाज्य असा आहे. पडसादांनी संवेदनेस बोलते करण्याचे कार्य केले. वृत्तपत्राने अन्यायाला वाचा फोडणे, लोकांना जागृत करणे, मुक्या संवेदनांना बोलके करण्याचे काम केले. आजही ते अखंड सुरू आहे. साहित्य, कला, क्रीडा, इतिहास, राजकारण, वैश्विक घडामोडी, धर्मकारण, अर्थकारण, सांस्कृतिक वारसे, इ. मानवी जीवनाची ही प्रत्येक दालने वृत्तपत्रांमधून आपल्या समोर येत असतात. थोडी आर्थिक व्यावसायिकतेची किनार वृत्तपत्रांना झाकोळते आहे एवढं मात्र खरे! सुधारक, मूकनायक, शतपत्रे, केसरी, मराठा, नवयुग, पुढारी यांसारख्या वृत्तपत्रांनी जनजागृतीचे व्रत इमानाने सांभाळले.
Read also : मी समाजसेवक झालो तर मराठी निबंध
आज नवनवीन वृत्तपत्रे आपल्याला आपल्या नावीन्याने, वेगळेपणाने आकर्पून घेताना दिसतात.
वृत्तपत्रांतून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी काही ना काही वाचनीय असतेच. आज जाहिरातींचे युग असल्याने विविध जाहिरातीद्वारा आपले उत्पादन खपविण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांतून होतो. लग्नासारख्या महत्त्वाच्या विषयावरही 'जाहिरात' रामबाण उपाय ठरू शकते.
हरवले-सापडले, दैनिक राशी-भविष्य, संपादकीय, पत्रव्यवहार यांसारखी वेगवेगळी सदरे वाचणारे असंख्य वाचक आहेत. दूरदर्शनवरील बातम्या प्रेक्षणीय असल्याने शिवाय पुनः पुन्हा वाचनाचा आनंद देत असल्याने वृत्तपत्रे बंद झाली तर समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम इतर प्रसारमाध्यमे करू शकतील का?
आपल्या जीवनात वृत्तपत्रांची खास जागा आहे. ऐकीव बातमी आणि वाचलेली बातमी यात फरक आहेच. म्हणूनच म्हणतात ना डोळे आणि कान यांच्यामध्ये दोन बोटांचे अंतर आहे.
Read also : मला पंख फुटले तर निबंध माहिती
रोजच्या ताज्या घडामोडीवर आधारित बातम्या, चित्रे, फोटो, व्यंगचित्रे, लेख वाचून, पाहून ज्ञान तर मिळतेच; पण मनोरंजनही होते.
अशी ही वृत्तपत्रे बंद झाली तर आपल्या जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण होईल, यात शंका नाही.
(वृत्तपत्रांच्या खपावरून लक्षात येते की, दूरदर्शन, विविध वाहिन्या, इंटरनेटसारखी प्रभावी माध्यमे येऊनही वृत्तपत्रांना पर्याय नाही; त्यांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही.)

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: