देशभक्ति निबंध लेख मराठी - Desh Bhakti Nibandh Marathi

Admin
0
Today, we are publishing देशभक्ति निबंध लेख मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (Desh Bhakti Nibandh Marathi) in completing their homework and in competition.

देशभक्ति निबंध लेख मराठी - Desh Bhakti Nibandh Marathi

सर वॉल्टर स्कॉट या इंग्लिश कवीच्या पेट्रियत या काव्यातील ओळ. 'धीस इज माय ओन, माय नेटिव्ह लॅण्ड' म्हणजे राष्ट्रभक्तीचे मूर्तीमंत रुप होय. हा देश माझा आहे. असे कोण म्हणत नाही. सर्वजण म्हणतात. गरीब भिकारी म्हणतो, श्रीमंत उमराव म्हणतात तरूण म्हणतात, म्हातारेही म्हणतात.

जे विचारवंत आहेत, ते त्यांच्या या म्हणण्याप्रमाणे वागतातही. जपानमधील ही एक घटना आहे, एका श्रीमंत म्हातारीची. ती रेल्वेच्या एका प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होती. त्या डब्यात एखाद दुसराच प्रवासी होता. त्यात एक भारतीय होता. गाडी सुरू झाली. म्हातारी आरामशीर बसली. तिने त्या डब्यातील सीटकडे पाहिले. त्याचे वरचे रेक्झीन फाटले होते. अनेक प्रवासी बसून बसून रेक्झीन एके ठिकाणी फार झिजले होते. ते फाटून आतले फोम बाहेर डोकावू लागले होते. गाडी सुरू झाल्यावर काय करायचं हा सर्वासमोर प्रश्नच होता. गाडीचा वेग खूप होता. बाहेरची मजाही पाहून वेळ घालवता येत नव्हता. ही अडचण त्या म्हातारीसमोर मात्र उभी नव्हती.
म्हातारीने तिची पर्स उघडली. पर्समधून सूई व दोरा काढला जेथे रेक्झीन फाटू लागले होते, तेथे व्यवस्थित हाताने रेक्झीन नीट केले. हळूहळू तिने सर्व फोम आत ठेवला. सुईदोयाने रेक्झीन शिवून टाकले. व्यवस्थित शिवले की नाही हे हात फिरवून पाहिले. मनाशीच 'ठीक' म्हणत तिने तो सुई दोरा पर्समध्ये ठेवून दिला.

'आपण हे का केले? आपण काही रेल्वेचे नोकर दिसत नाही?' भारतीय प्रवाश्याने म्हातारीला विचारले. त्याला म्हातारीचे मोठे आश्चर्य वाटले होते.
''खरंय, मी रेल्वेची नोकर नाही.पण मी जपानची नागरिक आहे नं हा देश माझा आहे. या देशांतील सपत्तीचे मी नको का रक्षण करायला ?' म्हातारीच्या उत्तराने तो सहप्रवासी अवाक् झाला होता. कारण त्याने भारतात ब्लेडने एसटीच्या बैठकीच्या गाद्या फाडणारे प्रवासी पाहिले होते. फाडलेल्या सीटमधून फोम ओरबाडणारे पाहिले होते. कवीच्या डब्यातले दिव्याचे बल्ब चोरणारे पाहिले होते. तो तरी काय करणार?

'याला म्हणतात राष्ट्रभक्ती' तो त्या म्हातारीला म्हणाला 'तुमचा आदर्श घ्यायला हवा.' हे फारच झालं. यात कसला आदर्श? है तर माझे कर्तव्यच नाही का?' कठे छोटे मोठे कार्य करताच स्वत:चा गौरव करून घेणारे, स्वत:चे कौतुक करून घेणारे सर्वत्र दिसून येतात. त्या म्हातारीला तिच्या त्या सत्कृत्याबद्दल कौतुकाचीही अपेक्षा नव्हती. याला काय म्हणावे?
राष्ट्रधर्म जोपासला पाहिजे तरच देशाची उन्नती होईल. देश सुधारला तरच सर्व सुखी होतील. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायला शिकले पाहिजे. उठसूट संप करणारे आम्ही, आमच्या दुष्कृत्याला 'आंदोलन' असे गोंडस नाव देतो. बसगाड्या जाळणारे, रेल्वेच्या फीशप्लेटस काढून अपघात घडवून आणारे कसले आले देशभक्त । राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान, हे जेव्हा भारतीयांना समजून येईल, तोच खरा सुदिन, अगदी उत्साहाने साजरा करण्याजोगा.

This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !