कस्तुरबा गांधी यांची मराठी माहिती - Kasturba Gandhi Information in Marathi

कस्तुरबा गांधी यांची मराठी माहिती - Kasturba Gandhi Information in Marathi

कस्तुरबा गांधी यांची मराठी माहिती - भारताचे सतीत्व तुमच्या रुपाने प्रकट झाले. मृत्यूशी गंभीरपणे बोलणाऱ्या सावित्रीची वृत्ती तुमच्याजवळ होती. सीतेची दिव्य करण्याची वृत्ती होती. भारतीय पावित्र्य, पातिक्रत्य, धीरता, सेवा, सहानभूती, प्रेम, मांगल्य यांची तुम्ही मूर्ती होता. हे राष्ट तमचे चिर ऋणी आहे. केवढा उदात्त आदर्श ठेवून तुम्ही गेलात!

30 जानेवारीला बापूंचा श्राद्धदिन. 22 फेब्रुवारीला बांचा-कस्तुरबांचा श्राद्धदिन, पंचांगाप्रमाणे शिवरात्रीस त्या देवाघरी गेल्या. बा आणि बापू ही भारताची मृत्युंजय अशी मोलाची ठेव आहे. रामसीता, नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान-सावित्री, वसिष्ठ-अरुंधती, अत्रि-अनसूया तशी बापू आणि बा नवभारताची उभयता मायबाप.

कस्तुरीप्रमाणे बांचे जीवन सुगंधी, तो सुगंध चिरकाल राहील. महात्माजींच्या महान प्रयोगात त्या सामील झाल्या. ते आरंभीचे झगडे, ते संघर्ष; परंतु शेवटी त्यांनी जाणले की, मी ज्याची पत्नी झाले आहे तो एक नवसंदेश देणारा पुरुष आहे. मी का त्यांच्या मार्गात अडथळा होऊ? मला त्यांच्या भव्य प्रयोगात समरस होऊ दे असे त्यांनी ठरविले.

"स्त्रिया यशाची शक्ति भ्रताराची करिती भक्ति'

असे सावित्रीच्या गाण्यात आहे. बा छायेप्रमाणे महात्माजींच्या मागोमाग गेल्या. जाणीवपूर्वक गेली 60 वर्षे एकत्र जीवन उभयता जगली. किती प्रसंग असतील? किती अमर स्मृती असतील! आपल्या विश्वविख्यात पतीप्रमाणे ही थोर माउलीही दु:खाचे घोट गोड करून पीत होती. पतीप्रमाणे त्याही अनेक अग्निदिव्यातून गेल्या, कसोटीच्या प्रसंगांतून गेल्या. पतींच्या ध्येयवादी जीवनाशी त्याही समरस झाल्या. त्यांच्या प्रयोगांत सामील झाल्या. त्यांनी दारिदयाचा वसा घेतला. राष्ट्राला मुक्त करण्यासाठी तुरुंगाला मंदिर मानले.

सारे मोह सोडले. स्वातंत्र्याच्या लढ्यातही गेल्या. 1930 साली महात्माजींना अटक झाली. कस्तुरबा पत्रके काढीत होत्या. गुजराती नारींना तेजस्वी प्रेरणा दिली. बा निर्भय होत्या. सरकारी कपेची त्यांनी कधी याचना केली नाही. महात्माजींना 42 साली अटक झाली; परंतु त्या मागे राहू इच्छित होत्या. लढा लढायला. शिवाजी पार्कवर ती राष्ट्रमाता लाखो जनतेसमोर उभी राहिली; परंतु सरकारने आगाखान पॅलेसमध्ये नेऊन ठेवले आणि बा पुन्हा भारताला दिसायच्या नव्हत्या.

त्यांचा आवडता महादेव अटक होऊन आठवडा होतो न होतो तो गेला. आपल्या पुत्रवत महादेवाचे स्वर्गप्रयाण कस्तुरबांनी पाहिले आणि महात्माजींचा तो उपवास, नाडी सापडतनाशी झाली. यांची काय मन:सथिती असेल? परंतु महात्माजी वाचले. बाच त्यांच्या आधी जायच्या होत्या. महात्माजीच्या मांडीवर त्यांना मरण आले. "मी आहे तझ्याजवळ, मी जाणार नाही दर" महात्माजी म्हणायचे. चितेजवळ राष्ट्रपिता शेवटपर्यंत उन्हात उभा. दोन अश्रूत्या कारुण्यमय दृष्टीतून घळघळले! माते, तुझे ते बंदीखान्यातील मरण आम्ही कसे विसरु? पुण्याची ती समाधी म्हणजे भारताचे तीर्थक्षेत्र आहे. महादेवला तेथे तुमची चिर सोबत आहे. पुत्रवत महादेवाला कसे सोडून जायचे असे का तुम्हाला वाटले?

बा आणि बापू! या दोन नावात केवढी अद्भुत जादू, केवढी अमृतमय किमया ! तुमचे आत्मे भारताला तारीत राहतील, बा, भक्तिप्रेमाचा, कृतज्ञतेचा तुमच्या स्मृतीला प्रणाम!

तुमचे जीवन म्हणजे राष्ट्राची अमर पुण्यपुंजी. ते जीवन आम्हाला सत्प्रेरणा देवो.

Related Articles :

Comments