Today, we are publishing छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Chhatrapati S...
Today, we are publishing छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi Language in completing their homework and in competition.
अशा या महापुरुषाचा जन्म इ.स. १६३० मध्ये शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते. शहाजीराजे विजापूर दरबारात असतानाच जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. बालपणी जिजाबाईंनी शिवरायांना शूर वीरपुरुषांच्या व संतांच्या गोष्टी सांगून त्यांचे बालपण शूर केले. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते. त्यांनी लहानग्या शिवबास लष्करी शिक्षण दिले.
तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भालाफेक, घोड्यावर रपेट यांसारख्या सर्व शिक्षणात शिवबा तरबेज होते. मराठी माणसात पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो, हा विचार अगदी लहानपणापासून शिवबाच्या मनात घोळत असे. लहानपणीच शिवबांनी मावळ्यांना गोळा करून त्यांचे नेतृत्व केले होते. त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार सांगितल्यामुळे ह्याच मावळ्यांनी पुढे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना साथ दिली.
शिवरायांचे युद्धाचे धडे पूर्ण होताच थोड्याच दिवसांत शिवरायांनी गडामागून गड काबीज करून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. तानाजी, बाजीप्रभू, पासलकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे शूरवीर त्यांना सामील झालेवया शूरवीरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. शिवरायांनी मुसलमानी राज्याशी टक्कर देऊन अनेक किल्ले जिंकले. रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांसारखे अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. अफजलखानाचा वधव शाहिस्तेखानासारख्यांची फजिती गनिमी काव्याने वधाडसाने केली. शिवरायांजवळ प्रचंडधाडस, आत्मविश्वास, गनिमी कावा आणि प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला. औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकताच अतिशय नालाखीने व प्रसंगावधानाने त्यांनी आपली आम्याहून सुटका केली.
शिवाजी महाराजांना अन्यायाची चीड होती. तेधर्मव जातिभेद मानीत नसत. गुणी व शूर माणसांची त्यांना पारख होती. 'गोब्राह्मण प्रतिपालक राजा' म्हणून त्यांची ख्याती होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आदर्श राज्य कसे असावे व आदर्श राजा कसा असावा हे दाखवून दिले. असा हा महापुरुष १६८० साली स्वर्गवासी झाला.
छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध (300 words)
शिवाजी महाराज महाराष्ट्राचे युगपुरुष ' होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. शिवाजी महाराजांचा आपल्या भारत भूमीला नेहमीच अभिमान वाटावा असे ते भारताचे दैवत होते.अशा या महापुरुषाचा जन्म इ.स. १६३० मध्ये शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते. शहाजीराजे विजापूर दरबारात असतानाच जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. बालपणी जिजाबाईंनी शिवरायांना शूर वीरपुरुषांच्या व संतांच्या गोष्टी सांगून त्यांचे बालपण शूर केले. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते. त्यांनी लहानग्या शिवबास लष्करी शिक्षण दिले.
तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भालाफेक, घोड्यावर रपेट यांसारख्या सर्व शिक्षणात शिवबा तरबेज होते. मराठी माणसात पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो, हा विचार अगदी लहानपणापासून शिवबाच्या मनात घोळत असे. लहानपणीच शिवबांनी मावळ्यांना गोळा करून त्यांचे नेतृत्व केले होते. त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार सांगितल्यामुळे ह्याच मावळ्यांनी पुढे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना साथ दिली.
शिवरायांचे युद्धाचे धडे पूर्ण होताच थोड्याच दिवसांत शिवरायांनी गडामागून गड काबीज करून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. तानाजी, बाजीप्रभू, पासलकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे शूरवीर त्यांना सामील झालेवया शूरवीरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. शिवरायांनी मुसलमानी राज्याशी टक्कर देऊन अनेक किल्ले जिंकले. रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांसारखे अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. अफजलखानाचा वधव शाहिस्तेखानासारख्यांची फजिती गनिमी काव्याने वधाडसाने केली. शिवरायांजवळ प्रचंडधाडस, आत्मविश्वास, गनिमी कावा आणि प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला. औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकताच अतिशय नालाखीने व प्रसंगावधानाने त्यांनी आपली आम्याहून सुटका केली.
शिवाजी महाराजांना अन्यायाची चीड होती. तेधर्मव जातिभेद मानीत नसत. गुणी व शूर माणसांची त्यांना पारख होती. 'गोब्राह्मण प्रतिपालक राजा' म्हणून त्यांची ख्याती होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आदर्श राज्य कसे असावे व आदर्श राजा कसा असावा हे दाखवून दिले. असा हा महापुरुष १६८० साली स्वर्गवासी झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य मराठी निबंध (350 words)
शिवरायाचे आठवावे रूप। शिवरायाचा आठवावा प्रताप ।
शिवरायाचा आठवावा साक्षेप। भूमंडळी ।।
- समर्थ रामदास
शहाजीराजे आणि जीजाबाई भोसले यांच्या 'शिवाजी' नावाच्या पुत्राने उण्यापुन्या ५० वर्षाच्या आयुष्यात पुढील ५०-१०० पिढ्यांना आदर्श ठरेल असे कार्य केले.
शिवाजी राजे हा भारताच्या इतिहासातील एक महान चमत्कार आहे. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापण्याची कल्पना त्यांचीच! मुघल, विजापूर व गोवळकोंडे या तिन्ही मुसलमानी राज्यांची फळी फोडून महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापलं.
शिवाजीराजांचं सारं जीवन एखादया अद्भूत आणि चित्तथरारक कादंबरीलाही मागे टाकील इतकं थरारक अन् रोमहर्ष पराक्रमांनी ठासून भरलेलं आहे. साहस, कर्तृत्व, शौर्य, पराक्रम अन् युक्तिबाजपणा या गुणांनी त्यांचं जीवन रसरसलेलं आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदू राज्याची स्थापना केली. मुसलमानी राजवटीपासून महाराष्ट्राला त्यांनी सोडवले. मुसलमान राजवटीकडून होणारा हिंदूंचा छळ त्यांनी थांबवला. हिंदू राज्य स्थापणे हे राजाचं ध्येय असलं तरी औरंगजेबाप्रमाणे त्यांनी परधर्मियांचा द्वेष केला नाही. नेताजी पालकरांना त्यांनी हिंदू धर्मात परत घेतले व जे हिंदू जबरदस्तीने बाटवले गेले त्यांनाही त्यांनी त्या काळी स्वधर्मात आणले. यावरून त्यांची धर्मप्रीती लक्षात येते. हिंदूंच्या देवस्थानाप्रमाणे त्यांनी मुसलमान देवस्थानांना व मशिदींना इनामे दिली.
शिवाजी महाराज नेहमीच वडील माणसांचा व साधुसंतांचा आदर करत असत. सावधानता हा राजांचा महनि गण होता. गाफिलपणाला त्यांच्या आयुष्यात स्थान नव्हतं. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ज्यांनी अडथळा आणला, ते स्वकीय असले तरी त्यांचा काटा काढण्यास राजे कचरत नसत, ते अतिशय नीतिमान आणि चारित्र्यवान होते. शत्रूच्या स्त्रियांना ते आदराने वागवत व त्यांची कधीही बेइज्जत करत नसत, असा त्यांचा गौरव, त्यांचा कट्टर शत्रू व इतिहासकार असलेल्या काफीखान याने केला आहे.
शिवाजी महाराजांनी मुसलमानांविरुद्ध अनेक विजय संपादन केले. मैदानात, समुद्रतीरावर किंवा डोंगरावर तीन चारशे किल्ले बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन आरमार निर्मिणे, नवे कायदे करणे, स्वभाषेला उत्तेजन देणे, कवींना आश्रय देणे, नवीन शहरे वसवणे इ. कार्येही आपल्या आयुष्यात या लोकोत्तर पुरुषाने केली. शिवाजी महाराज मुलकी कारभारांचे पण तज्ज्ञ होते. त्यांनी शेतसारा निश्चित केला. शेतकऱ्यांना बी, बियाणे, नांगर, बैल यासाठी कर्जे दिली.
शिवाजी महाराजांचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जनतेत एकोपा व आत्मविश्वास निर्माण केला. म्हणूनच शिवाजीने जे राज्य निर्माण केलं ते जपण्यासाठी २७ वर्षे जनता लढतच राहिली. शिवाजी महाराज वारल्यावर संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली, ते मारले गेल्यावर १९ वर्षे ज्याला जसे सुचेल तसे सर्वजण मोगलांशी लढत राहीले. कारण "हे राज्य आपले आहे." अशी भावना प्रत्येक मराठ्याच्या मनात महाराजांनी चेतवली.
म्हणूनच शिवाजी महाराजांचं चरित्र व कार्य सदासर्वकाळ सगळ्यांना स्फुर्ती देणारे आहे.
These Essays were Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
These Essays were Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS