Essay on Shikshanache Madhyam Marathi ka English : Today, we are providing शिक्षणाचे माध्यम कोणते असावे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8...
Essay on Shikshanache Madhyam Marathi ka English : Today, we are providing शिक्षणाचे माध्यम कोणते असावे मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on Shikshanache Madhyam Marathi ka English to complete their homework.
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे मराठी निबंध - Essay on Shikshanache Madhyam Marathi ka English
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे ? मातृभाषा, राष्ट्रभाषा की विश्वभाषा ? असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो. 'इंग्रजी भाषेला एकीकडे व्यापक सामाजिक आधार मिळत आहे, पण त्यामुळे भारतीय प्रादेशिक भाषांचे महत्त्व ती कमी करीत आहे.' हे एक सर्वमान्य निरीक्षण डॉ. तेलगेरी यांनी नोंदविलेले आहे. या पार्श्वभूमीचा विचार केला तर प्रादेशिक भाषा समृद्ध करण्यासाठी शिक्षण हे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतूनच द्यावे हे म्हणणे संयुक्तिक ठरते. Read also :
भाषेचे प्रमुख उद्दिष्ट हे आहे की, मानवाने एकमेकांशी संवाद साधणे. याचाच अर्थ आपल्या मनातील विचार दुसऱ्याला सांगणे या गरजेतून भाषा जन्माला आली व अनेक संस्कारांनी ती स्थिर झाली. आपल्या आंतरिक विचारांचे, उत्कट भावभावनाचे आदान-प्रदान, विचारांची अभिव्यक्ती इ. मातृभाषेतूनच सहज व प्रभावीपणे होऊ शकते. मातृभाषेतून आकलन लवकर होत असल्याने, साहजिकच अधिक शिकण्याची रुची निर्माण होते. परकीय भाषेतील घोकंपट्टीपेक्षा आपल्या मातृभाषेत संबोध, संकल्पना विद्यार्थ्यांना पटकन् अवगत होतात व त्या नकळत आत्मसातही केल्या जातात.
'आईचा हंकार' गर्भाला कळतो असे म्हटलेले आहे. इसापनीतित एक गोष्ट या संदर्भात आहे. लहानपणापासून मेंढ्यांच्या कळपात वावरणारा व त्यांच्याप्रमाणेच वर्तन करणारा, वाघाचा बछडा, एकदा मात्र वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर डरकाळी फोडतो व मेंढ्या पळून जातात. वाघाच्या बछड्यात वर्तनबदल घडून येतो. तो त्यांच्यात घडलेल्या सुसंवादामुळे म्हणजेच मातृभाषा हीच बाळाची पहिली व महत्त्वाची भाषा असते. Read also :
इंग्रजीचा जगभरातील वाढता वापर, तसेच तंत्रज्ञान माहिती करून घेण्यासाठी तिची अपरिहार्यता वाढत आहे. त्यामुळे समाजात प्रादेशिक भाषांचे, बोलीभाषांचे 'रूट्स' फेकून देण्यात आले. याचे कारण आपण मागासलेले ठरू हा न्यूनगंड निर्माण केला गेला. पण इंग्रजी अवगत झाल्यावर आपली मातृभाषा विसरण्याची गरज नाही. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या मुलांबरोबर पालक मातृभाषेतून बोलणे टाळतात. याचे कारण त्याला इंग्रजी अवगत होणार नाही, ही भीती आहे. परंतु ज्यांना उत्तम, मातृभाषा येते, तेच जगातील कोणतीही भाषा उत्तम अवगत करू शकतात हे सिद्ध झाले आहे. मातृभाषा हा पाया आहे. म्हणून लहान मुलांना चांगली मातृभाषा ऐकण्याची व बोलण्याची संधी शिक्षणाद्वारे दिली पाहिजे.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण हवे किंवा नको याविषयी अनेक वर्षांपासून मतभिन्नता दिसून येते. 'इंग्रजी नकोच' पासून ‘पहिलीपासून इंग्रजी सक्तीचे' हा प्रवास बरेच काही सांगून जातो. इंग्रजी कोणाची ? इंग्रजांची ? भारतीयांची की सगळ्यांची ? खरे तर जगातील सर्वच भाषांच्या मालकीचा प्रश्न कधी काळी निर्माण झाला होता. आज प्रवाह बदलेले आहेत. जागतिकीकरणाचा साधा सोपा अर्थ आहे - हे जग कोण्या एकाच्या मालकीचे नाही, ते सगळ्यांचे आहे. अशा वातावरणात इंग्रजी जागतिकच नव्हे तर जगाच्या मालकीची भाषा आहे. तिला आत्मसात करणे म्हणजे इंग्रजाची गुलामगिरी पत्करली असे नव्हे; तर आम्ही आमचा हक्क प्राप्त केला असा होय आज भारतात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. भारतीय वाङ्मय इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. दिलिप चित्रे सारख्या बुजुर्ग साहित्यिकापासून किरण देसाईंसारख्या तौलनिकदृष्ट्या नवख्या साहित्यिकापर्यंत अनेक भारतीय साहित्यिक इंग्रजीमध्ये भारतीय वाङ्मयनिर्मिती करीत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अद्ययावत ज्ञानभांडार जर इंग्रजीत उपलब्ध असेल तर इंग्रजी माध्यमातून ते अवगत केल्यास काय वावगे आहे ? Read also :
म्हणनच जागतिकीकरणाच्या स्पर्धेच्या प्रवाहात आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर, पदव्युत्तर शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरी हरकत नाही. इंग्रजी ही विश्वभाषा आहे. इंग्रजी वाङ्मय अभ्यासण्यापेक्षा भारतीय वाङ्मयाची ओळख इंग्रजीतून व्हावी. या प्रयत्नामधून नवीन अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास बहिणाबाईंच्या मराठी कविता आपल्याला इंग्रजीतून कळू शकतात अशी भाषांतरे उपलब्ध आहेत.
पण साहित्यनिर्मिती व ज्ञानाच्या निर्मितीमुळे भाषेचा विकास होत असला, तरी भाषेचे प्रमुख उद्दिष्ट हे संभाषण हेच आहे व याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षणमंडळाने तोंडी परीक्षा भाषाविषयांसाठी अनिवार्य केलेल्या आहेत. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. या अट्टाहासामुळे ज्ञानाच्या विस्तारित कक्षांपासून विद्यार्थी वंचित राहू नये. म्हणून, सध्याच्या स्पर्धायुगात जम बसवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS